________________
१६
भोगतो त्याची चूक पूर्वी (मागच्या जन्मात) कोन्ट्रेक्ट (करार) झालेला आहे तर आता काय करु शकतो? तो पूर्ण केल्यावरच सुटका आहे.
ह्या जगात जर तुम्हाला कधी कोणाची चुक शोधून काढायची असेल तर जो भोगतो त्याची चुक आहे. सून सासूला दुःख देते किंवा सासू सूनेला दुःख देत आहे, ह्यात कोणाला भोगावे लागते? सासूला. तर सासूची चुक आहे. सासू सूनेला दुःख देत असेल, तर सूनेने एवढे समजायला हवे कि ह्यात माझीच चुक आहे. हे दादाजींच्या ज्ञानाच्या आधाराने समजायला हवे कि, चुक असेल, म्हणूनच ती शिव्या देते. अर्थात् सासूचा दोष काढायला जावू नये. त्या सासूचा दोष काढल्याने गुंता वाढतो. कॉम्प्लेक्स (गुंतागुंती) होत असते आणि सासूला सून त्रास देत असेल तर सासूने दादाजींच्या ज्ञानाने समजायला हवे कि भोगतो त्याची चुक. ह्या हिशोबाने मलाच निभावून घ्यायला हवे.
सासू सूनेशी भांडली असेल तरीसुद्धा सून सुखात असते आणि सासूलाच भोगावे लागते तेव्हा चुक सासूचीच! आपण जावेला सतावले आणि आपल्याला भोगावे लागले तर आपलीच चुक. आणि असे काही केले नसेल तरी ती भांडायला आली तर ते मागच्या जन्मीचे काही बाकी असेल, ते परत फेडण्यात आले. तेव्हा तुम्ही पुनः चुक करू नका, नाहीतर पुनः भोगावे लागेल! अर्थात् सुटका करून घ्यायची असेल तर जे जे काही कडूगोड येईल (शिव्या वगैरे) ते जमा करून टाका, म्हणजे तुमचा हिशोब पूर्ण होईल. ह्या जगात हिशोबा शिवाय दृष्टिला दृष्टि ही मिळत नाही! तर काय बाकी सगळे हिशोबा शिवाय होणार का? तुम्ही जेवढे-जेवढे ज्याला-ज्याला दिले असेल तेवढे-तेवढे ते तुम्हाला परत देतील. तेव्हा तुम्ही खुश होवून जमा करून टाका. आणि म्हणा बरं झालं! आता वहीखाता पूर्ण होईल! आणि जर चुक कराल तर परत भोगावे लागेलच!
आपण 'भोगतो त्याची चुक' हे सूत्र प्रकाशित केले आहे. लोकांनां खूप आश्चर्य वाटते कि, खरे संशोधन केले आहे हे.