________________
१४
भोगतो त्याची चुक दादाश्री : त्याचा गुन्हा, मागच्या जन्मीचा हिशोब, तो आज पूर्ण झाला. कोणत्याही हिशोबा शिवाय कोणाला कोणतेही दुःख होत नाही. ही त्याच्यी हिशोब भरपाई करण्याची वेळ आली म्हणून तो पकडला गेला. नाहीतर एवढ्या मोठ्या दुनियेत दुसरा कोणी का नाही पकडला गेला. तुम्ही नीडर होऊन कसे फिरू शकता? तर म्हणे, जेव्हा आपला हिशोब असेल तेव्हा तसे घडेल. हिशोब बाकी नसेल तर काय होणार? असे म्हणतात ना, आपले लोक?
प्रश्नकर्ता : आपल्याला भोगावे लागणार नाही, ह्यासाठी उपाय काय?
दादाश्री : मोक्षात जायचे, किंचित्मात्र कोणाला दुःख द्यायचे नाही. कोणी आपल्याला दुःख दिले तर आपण जमा करून टाकायचे. म्हणजे आपले वहीखाते चोख होतील, आता पुन्हा कोणाला द्यायचे नाही, नवीन व्यापार सुरु करायचा नाही, आणि जुना हिशोब बाकी असेल तर मांडवली करुन टाकायची म्हणजे हिशोब पूर्ण होतो.
प्रश्नकर्ता : तर ज्याचा पाय मोडला आहे, त्या भोगत असलेल्या माणसाने असे समजावे कि ही माझीच चुक आहे, आणि म्हणून त्याने त्या स्कूटरवाल्या विरुद्ध काहीच करायला नको?
दादाश्री : काही करायचे नाही, असे नाही. आम्ही काय सांगतोय कि मानसिक परिणाम बदलायला नको. व्यावहारिक जे होत असेल ते होऊ द्यायचे, पण मानसिक राग-द्वेष व्हायला नको. ज्याला आपली चुक आहे, असे समजते त्याला राग-द्वेष होणार नाही.
व्यवहारात आपल्याला पोलीसवाला म्हणेल कि नांव सांगा तर आपण सांगायला हवे. व्यवहार सर्व करायला हवे, परंतु नाटकीय रित्या (ड्रामेटिक), राग-द्वेष करायचा नाही. आपल्याला आपली चुक आहे' असे समजल्यानंतर त्या स्कूटरवाल्या बिचाऱ्याचा काय दोष? हे जग तर उघड्या डोळ्याने पहात आहे, म्हणून त्याला पुरावा तर द्यावाच लागेल. परंतु आपल्याला त्याच्या