________________
भोगतो त्याची चुक हा शब्द वेल्डिंग बरोबर च आहे त्याच्यावर एक मोठे पुस्तक लिहिले जाईल एवढे यात सार आहे!
___ 'भोगतो त्याची चुक' एवढेच म्हटले, तर एका बाजूचे संपूर्ण कोडे नाहीसे होते आणि दुसरे 'व्यवस्थित' म्हटले तर दुसऱ्या बाजूचे कोडे नाहीसे होते. जे स्वत:ला दुःख भोगावे लागते आहे त्यात त्याचा स्वत:चाच दोष आहे! दुसऱ्या कोणाचा दोष नाही. जो दुःख देतो त्याची चुक नाही. दुःख देतो त्याची चुक संसारात, आणि जो भोगतो त्याची चुक हे परमेश्वराच्या
कायद्यात.
प्रश्नकर्ता : दु:ख देणाऱ्याला तर भोगावे लागते ना?
दादाश्री : नंतर, तो जेव्हा भोगणार त्याचवेळी त्याची चुक गणली जाईल. परंतु आज तुमचीच चुक पकडली गेली.
चुक, वडीलांची कि मुलाची? एक बाप आहे, त्याचा मुलगा रात्री दोन वाजता आला. तशी पन्नास लाखाची पार्टी, एकूलता एक मुलगा? बाप आहे तो वाट पहात बसलेला कि, मुलगा आला कि नाही? आणि मुलगा येतो तेव्हा झोकांड्या खात घरात शिरतो. बाप पाच-सात वेळा सांगायला गेला तेव्हा तो ओरडला. त्यामुळे तो परत फिरला. मग आपल्या सारखे म्हणणार ना बोलू नका, त्याला राहू दे ना? तुम्ही तुमचे झोपून जा शांत. तर म्हणेल, 'मुलगा तर माझा ना'? जसा काही त्याच्या पोटातून निघाला आहे?!
त्यामुळे तो येऊन झोपतो. मग मी त्यांना विचारले 'मुलगा झोपून गेला कि मग तुम्ही झोपणार कि नाही?' तेव्हा म्हणतो 'मला कशी झोप येणार?' हा गधडा दारु पिऊन येवून झोपून जातो. मी काय त्याच्यासारखा मूर्ख आहे? मी म्हणालो 'तो तर शहाणा आहे' त्याला त्याचे काही दुःख होत आहे का? त्यानंतर मी त्यानां म्हटले 'जो भोगतो त्याची चुक' तो भोगतोय का तुम्ही भोगता? तेव्हा ते म्हणाले 'भोग तर मी च भोगतोय संपूर्ण रात्रभर जागून...'