Book Title: Bhogte Tyachi Chuk
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 15
________________ भोगतो त्याची चुक मी म्हणालो त्याची चुक नाही, ही तुमचीच चुक आहे. तुम्ही मागच्या जन्मात त्याला लाडावून ठेवले म्हणून त्याचा परिणाम आहे हा. तुम्ही लाडावून ठेवले म्हणून तो ह्या जन्मी माल तुम्हाला परत करत आहे. ही दुसरी तीन मुलं चांगली आहेत, त्याचा आनंद तू का घेत नाही? ह्या सर्व आपणच निर्माण केलेल्या अडचणी आहेत. नीट समजून घेण्यासारखे आहे हे जग! त्या म्हाताऱ्या माणसाच्या मुलाला मी एक दिवस विचारले, 'अरे तुझ्या वडीलांना तुझ्या वागण्याने खूप दुःख होते आणि तुला त्या बद्दल काहीच वाटत नाही?' मुलगा म्हणाला मला कसले दुःख, वडील खूप पैसा कमावून बसले आहेत तेव्हा मला कसली चिंता? मी तर मजा करतोय. म्हणजे ह्या बाप आणि मुलात भोगतो कोण? बापच, म्हणजे बापाचीच चुक. 'भोगतो त्याची चुक.' हा मुलगा जुगार खेळत असेल, वाटेल ते करीत असेल. परंतु, त्याचे भाऊ तर आरामात झोपून जातात ना? त्याची आई पण शांत व्यवस्थित झोपली आहे ना! आणि हा कमनशीबी म्हातारा एकटाच का जागत असतो? म्हणून त्याची चुक. त्याची काय चुक? तर ह्या म्हाताऱ्याने ह्या मुलाला मागच्या जन्मी बिघडवले होते. म्हणून त्या मागच्या जन्माचे ऋणानुबंध झाले आहेत, म्हणून ह्या जन्मी त्याचा बदला घेतला जातो. असे भोग भोगावे लागतात आणि मुलगा त्याची चुक भोगेल जेव्हा त्याची चुक पकडली जाईल. ह्या दोघातून कोणाला त्रास होत आहे? ज्याला त्रास होतो त्याचीच चुक. हा इतका एकच कायदा समजून घेतला तर संपूर्ण मोक्षमार्ग मोकळा होईल! मग त्या बापाला मी म्हटले. आता तो नीट व्यवस्थित वागेल ह्यासाठी मार्ग काढायला हवा. त्याला कसा फायदा होईल व नुकसान होणार नाही असाच फायदाचा विचार करावा. आणि तसे वागावे मानसिक त्रास करून घ्यायचा नाही. त्यासाठी शारीरिक श्रम, ते सगळे करायचे, पैसे आपल्या जवळ असतील तर द्यावे, पण मानसिकतेला दुर्लक्ष करावे.

Loading...

Page Navigation
1 ... 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38