________________
भोगतो त्याची चुक
प्रश्नकर्ता : सगळेच आहेत.
दादाश्री : पकडले जात नाही तोपर्यंत ते सावकार. निसर्गाचा नियम तर कोणी उघड केलाच नाही. निकाल तिथून च येणार ना! शॉर्ट कट! 'भोगतो त्याची चुक' हे एकच वाक्य समजल्याने संसाराचे ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते.
परमेश्वराचा कायदा तर काय म्हणतो कि ज्या क्षेत्रात, ज्या काळात जो भोगतो तो स्वत:च गुन्हेगार आहे. तेथे कोणाला, वकीलाला पण विचारण्याची आवश्यकता नाही. आता कोणाचा खिसा कापला गेला तर त्या कापणाऱ्याच्या आनंदाचा भाग असतो, तो तर मस्तपैकी जिलेबी खात असेल, हॉटेलात बसून चहापाणी आणि नाष्टा करीत असेल. आणि त्याच वेळी ज्याचा खिसा कापला गेला तो भोगत असेल. म्हणून ‘भोगतो त्याची चुक'. त्याने कधीतरी चोरी केली असणार म्हणून आज पकडला गेला म्हणून तो चोर आणि त्या चोराला, तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा त्याला चोर म्हणला जाईल.
मी तुमची चुक शोधण्यासाठी राहणारच नाही. संपूर्ण जग समोरच्याचीच चुक पहात असते. स्वतः भोगत असतो पण चुक समोरच्याचीच पहात असतो. त्यामुळे तर उलट गुन्हे दुप्पट होत राहतात आणि व्यवहारात गुंतागुंती पण वाढत जाते ही गोष्ट समजलात तर गुंता कमी होत जातो.
मोरबीचा पूर आला, काय कारण? मोरबीला पूर आला आणि जे काही झाले, ते कोणी केले? ते शोधून काढायला हवे? कोणी केले हे?
म्हणून एकच शब्द आम्ही लिहिला आहे कि, ह्या जगात चुक कोणाची आहे? हे स्वत:ला समजण्यासाठी एका वस्तुला दोन पद्धतिने समजायला हवे. 'भोगतो त्याची चुक.' ही गोष्ट भोगणाऱ्यानी समजायची