________________
तत्वार्थसार
ज्ञान हे पदार्थाच्या विशेषाकाराला ज्ञेयाकाराला ग्रहण करते, जाणते म्हणून ते यद्यपि साकार म्हटले जाते तथापि ज्ञानाचे परिणमन ज्ञेयाकाररूप होत नाही. पदार्थाच्या विशेषाकाररूप ज्ञेयाकाराला जाणत असताना देखील ज्ञान ज्ञानाकाररूपच राहते. लोक- अलोकाला जाणणारे ज्ञान यद्यपि उपचाराने सर्वगत म्हटले जाते तथापि ते लोक, अलोकआकार परिणत होत नसून ज्ञान हे ज्ञानाकाररूप आत्मगत-स्वाकाररूपच असते.
५४
घटाला जाणणारे ज्ञान घटज्ञान, पटाला जाणणारे ज्ञान पटज्ञान याप्रमाणे ज्ञेयाकाराच्या ज्ञेय-ज्ञायक संबंधावरून यद्यपि ज्ञान साकार म्हटले जाते तथापि ज्ञान हे ज्ञेयाकाररूप परिणमन करीत नाही. पदार्थाचे ज्ञेयाकार ज्ञानामध्ये स्वयं प्रतिभासतात म्हणून ज्ञान साकार म्हटले जाते.
दर्शनोपयोग स्वरूप
यद्विशेषमकृत्वैव गृहीते वस्तुमात्रकं ।
निराकारं ततः प्रोक्तं दर्शनं विश्वदर्शिभिः ।। १२ ।।
-
अर्थ - पदार्थाच्या विशेषाकाराला ग्रहण न करता पदार्थाचे सत्तामात्ररूपाने जे सामान्यग्रहण त्याला सर्वदर्शी सर्वज्ञभगवंतानी दर्शन म्हटले आहे. दर्शनामध्ये पदार्थाचा सत्तामात्र सामान्यरूपाने प्रतिभास होतो, पदार्थाच्या आकार विशेषाचे ग्रहण होत नाही म्हणून दर्शनास निराकार म्हणतात.
दर्शनाची स्वसत्ता व पदार्थाची सामान्यसत्ता ही महासत्तारूपाने एक अभिन्न असते म्हणून ( कोणी आचार्य - पदार्थाच्या सामान्यसत्ता प्रतिभासाला दर्शन म्हणतात ) ( कोणी आचार्य ज्ञानाच्या स्व-प्र -प्रतिभासाला दर्शन म्हणतात )
छद्मस्थ जीवास प्रथम दर्शन होते नंतर ज्ञान होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org