________________
तत्वार्थसार अधिकार २ ॥
करण्याची योग्यतारूप मनःक्रिया या सर्व शरीरपर्याप्तिच्या आधारावरच सुरू होतात.
कोणास किती पर्याप्ति असतात एकाक्षेषु चतस्रः स्युः पूर्वाःशेषेषु पंच ताः । सर्वा अपि भवन्त्येताः संज्ञिपंचेन्द्रियेषु षट् ॥ ३३ ॥
अर्थ- एकेंद्रियास ४ पर्याप्ति असतात. १ आहारपर्याप्ति २ शरीरपर्याप्ति, ३ इंद्रियपर्याप्ति, ४ प्राणापानपर्याप्ति.
द्वींद्रियापासून असंज्ञी पंचेद्रियापर्यंत वचनपर्याप्तिसहित वरील चार पर्याप्ति याप्रमाणे पाच पर्याप्ति असतात. संज्ञी पंचेन्द्रिय जीवाला मन.पर्याप्ति असतात.
प्राणाचे भेद
पंचेन्द्रियापि वाक कायमानसानां बलानिच । प्राणापानस्तथाऽऽयुश्च प्राणा: स्यु प्राणिनां दश ॥ ३४ ॥
अर्थ- प्राणाचे १० भेद आहेत. ५ इंद्रिय, ३ बल (मनोबल-वचनवल-कायवल) श्वासोच्छवास व आयु याप्रमाणे प्राणाचे १० भेद आहेत .
प्रश्न- पर्याप्ति व प्राण यात काय फरक आहे ?
उत्तर- पर्याप्ति ही पूर्णताहोण्याची योग्यतारूपशक्ति कारण आहे. ज्याची पर्याप्तिरूप योग्यताशक्ति असते तो जीव आपापल्या यथायोग्य दहा प्राणाच्या आधारावर जगतो जीवनअवस्था धारण करतो. प्राणाच्या वियोगात मरण अवस्था धारण करतो. पर्याप्ति शक्तिरूप कारण आहे. प्राण त्याचे कार्य आहे.
इंद्रिय पर्याप्ति पूर्ण असतानाच इंद्रियप्राणाचेद्वारे विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. शरीरपर्याप्ति पूर्ण असतानाच शरीराच्या द्वारे हलन-चलन क्रिया करण्याचे कायबल सामर्थ्य प्राप्त होते. भाषापर्याप्ति पूर्ण असतानाच वचनबल सामर्थ्य प्राप्त होते. मनःपर्याप्ति
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org