Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 326
________________ तस्वार्थसार अधिकार ७ वा निग्रंथ मुनीचे ५ प्रकार पुलाको बकुशो द्वेधा कुशीलो द्विविधस्तथा । निर्ग्रन्थः स्नातक श्चैव निर्ग्रन्थाः पंच कीर्तिताः ॥ ५८ ।। अर्थ- दिंगबर निग्रंथ मुनीचे ५ प्रकार आहेत. १ पुलाक मुनि- तुच्छ धान्याप्रमाणे ज्याचा संयम जघन्य असतो मलगुणाची विराधना असते. पण उत्तरगुणाचे जे निरतिचार पालन करू शकत नाहीत. त्यांना पुलाक मुनि म्हणतात. २ बकुश मुनिचे २ प्रकार आहेत- १ उपकरण बकुश, २ शरीर बकुश. जे मुनि उपकरण पिंछीकमंडलु याविषयी सूक्ष्म राग बुद्धी ठेवतात ते मलिन नसावे चांगला असावे अशी इच्छा करतात त्याना उपकरण वकुश म्हणतात जे मुनि शरीर हे घामाने-रजःकणाने मलीन झाले असताना शुद्ध करण्याची इच्छा करतात त्याना शरीर बकुश म्हणतात. ३ कुशील मुनीचे २ प्रकार आहेत . १ प्रतिसेवना कुशील, २ कषाय कुशील. ज मुनि आपल्या शिष्य परिवार मुनिची काळजी वाहतात त्याना प्रतिसेवना कुशील म्हणतात. जे मुनि तीव्र संज्वलन कषाय सहित असतात. त्याना कषाय कुशील म्हणतात. ४ निर्ग्रन्थ- क्षीण मोह गुणस्थानवती निर्ग्रन्थ मुनि होत. ५ स्नातक- घातिकर्माचा नाश करून केवलज्ञानो बनलेले मुनि स्नातक मुनि म्हटले जातात. मुनीमध्ये विशेषता संयमतलेश्याभिलिगेनप्रतिसेवया । तीर्थस्थानोपपादैश्च विकल्प्यास्ते यथागमं ।। ५९ ॥ अर्थ- संयम - श्रुत - लेश्या - लिंग - प्रतिसेवना - तीर्थ - स्थान व Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 324 325 326 327 328 329 330 331 332 333 334 335 336 337 338 339 340 341 342 343 344 345 346 347 348 349 350 351 352 353 354 355 356