Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 352
________________ तरवार्थसार अधिकार ८ वा रत्नत्रयपरिणति क्रियेचे संप्रदान आत्माच आहे. यस्मै पश्यति ज्ञानाति स्वरूपाय चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव तन्मयः ।। ११ ॥ अर्थ- ज्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आत्मा श्रध्दान करतो, जाणतो व अनुचरण करतो ती स्वस्वरूपप्राप्ती आत्म्यालाच होते म्हणून दर्शन-ज्ञान चारित्र स्वरूप रत्नत्रय परिणतिचे संप्रदान तन्मय आत्माच आहे. ( तदर्थे संप्रदानं) रत्नत्रय परिणति क्रियेचे अपादन आत्माच आहे यस्मात् पश्यति जानाति स्वस्वरूपात् चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव तन्मयः ॥ १२ ॥ अर्थ - ज्या स्वस्वरूप शक्तीपासून आत्मा श्रध्दान करतो, जाणतो अनुचरण करतो. ते दर्शन-ज्ञान-चारित्ररूप रत्नत्रयमय परिणति क्रियेचे मूल उगम स्थान आत्माच आहे. तन्मय आत्माच अपादान आहे ( किया हेतुः अपादानं ) रत्नत्रय परिणति क्रियेचा संबंध आत्म्याशीच आहे. यस्य पश्यति ज्ञानाति स्वरूपस्य चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव तन्मयः ॥ १३ ॥ अर्थ- ज्या स्वस्वरूपाचे आत्मा श्रध्दान करतो, जाणतो, अन चरण करतो तो दर्श -ज्ञान-चारित्रमय आत्माच आहे. आत्म्याचा व आपल्या स्वरूपाचा तादाम्य संबंध आहे, (संबंध षष्ठी) रत्नत्रय परिणति क्रियेचे अधिकरण आत्माच आहे. यस्मिन पश्यति ज्ञानाति स्वस्वरूपे चरत्यपि । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव तन्मयः ॥ १४ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 350 351 352 353 354 355 356