________________
चतुर्थ अधिकार
जनक कार्य करणे आवश्यकते पेक्षा जास्त भोग-उपभोग वस्तूचा संग्रह करणे, दुसन्यास दुष्टवचन बोलणे, कुत्सित चेष्टा करणे, प्रयोजन नसताना सारखी बडबड करीत राहणे हे पाच अनर्थदंडाचे अतीचार आहेत
सामायिक शिक्षावत अतीचार
त्रीणि दुःप्राणिधानानि वाङ्मन: काय कर्मणां ।
अनादरोऽनुपस्थानं स्मरणस्येति पंच ते ।।९।।
अर्थ- मन-वचन-काय यांची विषय-कपायाकडे प्रवृत्ति, वचनाने दुष्ट वचन बोलण, मात वाईट विचार आणणे, शरीराने कुचेष्टा करणे, सामायिक क्रियेमध्ये अनादर करणे, अन्य मनस्क होऊन सामायिक पाठ विसरण, हे पाच सामायिक व्रताचे अतीचार आहेत.
प्रोषधोपवास शिक्षाबत अतीचार संस्तरोत्सर्जनादानमसंदृष्टाप्रमाजितं । अनादरोऽनपस्थानं स्मरणस्येति पंच ते ॥ ९५॥
अर्थ- प्रमाद पूर्वक जीवजंतू न पाहतां न झाडतां बिछानाआसन-चटई वगैरे टाकणे, जीवजंतू न पाहतां मलमूत्र विसर्जन करणे, कोणतीही वस्तू उचलणे किंवा ठेवणे, प्रोषधोपवास क्रियेमध्ये अनादर करणे, पर्व दिवशी प्रोषधोपवासाचे विस्मरण होणे हे प्रोषधोपवास व्रताचे पाच अतीचार आहेत.
भोगोषभोग परिमाण व्रताचे अतीचार सचित्तस्तेन संबंधस्तेन संमिश्रित स्तथा। दुःपक्वोऽभिषवश्चैवमाहारा: पंच पंच ते ॥ ९६ ।।
अर्थ -- सचित्त हरित फळ भाजी खाणे, सचित्त पानावर ठेवलेला आहार घेणे, सचित्त पदार्थाचे मिश्रण केलेला आहार घेणे, अर्धवट शिजविलेला कच्चे अन्नाचा आहार घेणे, पौष्ठिक-गरिष्ट अन्नाचा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org