Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२.२४
२.२१ धूमाच्छादिले-तत्करि अशी दोन शब्दाची संधि केलेली आढळते. २.२२ वेगळया परिच्छेदाची सूचना वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारे केली
आहे. आता आइकावे, परिसावे. २.२३ शब्दप्रयोग विस्कळित वाटतात. माध्यान दोन प्रहर रजनि.
एकाच गावाची भिन्न भिन्न नावे गजपुर हस्तनापुर, हस्तनागपुर. पांच चरणाची ओवी क्वचित् आढळते.
संस्कृत भाषेच्या अवनतीची परिसीमा आढळते. २.२७ अ, छ, भ, ज्ञ, ऋ, दू, स्थि, ण, द्र, च, कु, व, द्ध, तक, ष्ण, उ,
क्ष, गुं, ग्न, ख्य, द्व, ग, झ, क्ष, जे, ज्ज, ल, द्रय, श्र, श्रु, भ्र, ल्हे, म, ध्य, य्य ह्या शब्दांची लिहिण्याची घाटणी प्रचलित घाटणीपेक्षा किंचित वेगळी आहे.
२.२५
२.२६
३. ग्रंथांची परंपरा
३.२
आचार्य हरिषेणकृत (इ. स. ८३१) मध्ये लिहिलेला. संस्कृत भाषेतील पद्यामध्ये बृहत्कथाकोश हा पहिला कथाकोश दिसतो. आचार्य प्रभाचंद्र (९२५-१०२३) ह्यांनी संस्कृत भाषेत गद्यामध्ये कथाकोश लिहिला. ह्यावरच आधारित कथाकोश नेमिदत्ताने (१५१८) संस्कृत भाषेत लिहिला असा उल्लेख ह्या ग्रंथाच्या प्रारंभी आला आहे. त्यानंतर रत्नकीर्तिने शिष्य चंद्रकीर्तिने (इ. स. १८२५) मध्ये गुरू रत्नकीर्तिच्या आज्ञेवरून लिहिला. सध्याची प्रत ही त्यांनी आपल्या हातानी लिहिली असा उल्लेख ह्याच ग्रंथात आला आहे. ह्या ग्रंथाची सुरुवात कुठे झाली हे माहीत नाही. तथापि ग्रंथामध्ये १८२५ च्या चातुर्मासात ते उस्मानाबाद (धाराशिवी प्राचीन नाव- तेर येथे झाले व शेवट मुक्तागिरीत ( सध्या जि. बैतूल मध्यप्रदेश) झाला असे दिसते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org