Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
४.५
४.७
मध्यविभागातील अवंती, कासी, कुंतल, माणिवत्, मालव, वत्स, व-हाड ह्यांचा समावेश आहे. जैनधर्माचा प्रसार सर्व हिंदुस्थानात क्रमाक्रमाने कसा झाला हे दिसून येते. काही देशांची ओळख नक्की पटवता येत नाही. उतुखल, वरेंद्र, विनीता, विषयारम्य हे देश या यादीत टाकता येतील. नगर, नगरी, नेर, पुर, पुरी व महापुर इत्यादिकांच्या उल्लेखात ८० शहरांचा उल्लेख आहे. त्यात कुसुमपुर किंवा पाटलीपुत्राला महापुर म्हटले आहे. अयोध्या, काशी, वाराणशी, उज्जयिनी, द्वारका, उत्तर मथुरा, दक्षिणमथुरा, कांची करहाटक, काकंदी, कौशांवी, गिरिनगर, तेरपुर, दशपुरनगर, बेनातट (पवनी) राजगृह, शतद्वारनगर, हस्तनागपुर हे उल्लेख विशेष महत्त्वाचे आहेत, सिंधुतट उर्फ अटकचा उल्लेख असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही काही खेड्यांचा उल्लेख ग्राम किंवा खेट ह्या उपपदाने झाला आहे. त्यातील काही नावे उदा- सिरसगाव अजूनही चाल आहे. जेथून मोठमोठी जहाजे समुद्रात शिरतात अशा दोन पट्टनाचा उल्लेख आला आहे. शिखर पट्टन व गलग्रोद्रहपट्टन ही ती दोन पट्टने होत. आकार वा वर्णाहून पर्वतांना नावे दिली आहेत. छोटा असल्यास गिरि- मोठा असल्यास पर्वत म्हणतात. मध्ये खोल असणान्या पर्वताला द्रोण, मध्ये उभट असणाऱ्याला नितंब पर्वत, गाईच्या कानासारखा तो गोकर्ण, तर मुद्गलासारखा दिसणारा खाली लहान वर मोठा असावा असे वाटते. कृष्णामुळे गोवर्धन पर्वत प्रसिद्ध झाला आहे. अनेक गुंफात गिरनारजवळची चंद्रगुंफा व मथुरेजवळची क्षेत्रियगंफा स्मतीमध्ये शिल्लक राहली. शिखरामध्ये पलासकट, मेघकूट (पूर्वेकडचे) सिद्धकूट (मध्यभागातील) सम्मेदशिखर पूर्वेकडचे परिचित राहले.
४.८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org