Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
(१५)
५.१३ वज्रकुमार
समाज हा उत्सवप्रिय असतो. त्या उत्सवप्रियतेत माणसाची स्पर्धा सदैव चालू असते. त्यावेळी एखाद्या प्रसंगी समाजातील जास्तीत जास्त माणसे जास्तीत जास्त प्रकारे भाग घेतील अशी व्यवस्था समाजनेत्यांना करावी लागते. संघर्षात देखील आपण धर्माचे घोडे पुढे दामटले पाहिजे हे मनाला पटत नाही. तथापि मानवी मन देखील स्पर्धेमध्ये जसे सक्रिय राहते तसे स्पर्धाविरहित वातावरणात राहत नाही ही मानवी मनाची उणीव आहे. पण ज्ञानतेजाने आंतरविश्व उजळल्याशिवाय बाह्य जग उजळणे शक्य नाही ही वज्रकुमारच्या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे.
ह्या कथाकोशाची हस्तलिखित प्रत उपलब्ध करून दिल्याबद्दल बलात्कार दिगंबर जैन मंदिर, अमरावती ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे.
तसेच ग्रंथ लिहिते वेळी सगळ्या कुटुंबियांनी आत्मीयतेने मदत केली व हा ग्रंथ पूर्णत्वास नेला त्याबद्दल तेही अभिनंदनास पात्र आहेत. ___ग्रंथप्रकाशन अत्यंत महागडे असताना देखील जीवराज गौतम ग्रंथमालेच्या पदाधिकाऱ्यांनी हा ग्रंथ प्रकाशनासाठी निवडला त्याबद्दल मी त्या ग्रंथमालेच्या पदाधिकान्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे.
ग्रंथप्रकाशन उशीरा का होईना सुबक रीतीने करून दिल्याबद्दल नारायण मुद्रणालयाचे मधुसूदन बनहट्टी हे धन्यवादास पात्र आहेत.
नागपूर ३१-७-७८
शां. ज. किल्लेदार विभाग प्रमुख पाली आणि प्राकृत
ना. म. वि. नागपूर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org