Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
(१२)
५.८
कर्मयोग अनंतमती सारख्या स्त्रीजातीत जन्मलेल्या बाईने सिद्ध करावा हे कौतुकास्पद आहे. बाई हे संकट आहे. बाईवर व बाईमळे संकटाची परंपरा सुरू होते असे मानले तरी अत्यंत प्रतिकल परिस्थितीत जे टिकते ते खरे असे वाटते. सोन्याच्या जशा चार कसोटया असतात तशा माणसाची पारखहीं अनेक कसोटयानी होते. त्या प्रतिकूल परिस्थितीत एखादी व्यक्ती कशी वागते ह्याला फार महत्त्व आहे. अनंतमतीचा व्रतपालनाचा उत्साह, हरण झाल्यानंतरही संतुलन न खोवता ताठ राहण्याची भूमिका, जंगली मानसाशी सुसंस्कृतपणे राहण्याची वृत्ती, व्यापाऱ्यांच्या कपटाला समर्थपणे दिलेले तोंड, वेश्येच्या मोहजालातही न फसून त्यागी बनून ध्येयवेडेपणा सिद्ध केला हे अद्भुत आहे. अशी व्यक्ती जनमानसात उजळन न दिसली तर आश्चर्य. अवंतिराज उदयन
आजारपणात आपपर ओळख येतो. जो आजारात जवळ येतो तो आपला अशी व्याख्या केली तर धर्ममार्गात किळस येत नाही तो खरा धार्मिक म्हणावा लागेल. आजकालही 'महारोग्यांची सेवा' ही सेवकाची कसोटी मानली जाते. त्यामुळे कधी स्नान न करणाऱ्या, धुळीने साखलेल्या, जखमी अशा साधुसाध्वींची सेवा महाकठीण काम आहे. त्यासाठी मन मोडावे लागते. ते मन मोडले तो खरा माणूस होय. म्हणूनच असाधारण परिस्थितीत असलेल्या साधुपुरूषाच्या सेवेला इतिकर्तव्यता मानणाऱ्या व्यक्ती धर्मग्रंथात मर्धन्य स्थानी विराजमान होतात ह्यात आश्चर्य नाही. कोणत्याही धर्माला विश्वधर्माचे स्वरूप द्यावयाचे असल्यास अशा किळस न करता काम करणा-या सेवाभावी लोकांच्या सेनेची आवश्यकता आहे. रेवती राणी
नाणे सुरू झाले तसा खोटेपणा सुरू होतो. चांगल्या नाण्याबरोबर वाईट नाणे चालविण्याचा माणसाला व्यामोह पडतो.
५.९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org