Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
५.५
५.६
(१०)
बरोबरच्या संघर्षात ते विजयी झाले. त्यांनी आपल्या विहाराने कांची, पुंड्रोड्र, दशपुर, वाराणसी, पाटलीपुत्र, माळवा, सिंधु, टक्क, करहाटक इत्यादी स्थानांना पुनीत केल्याची साक्ष इतिहासात आहे. म्हणूनच इतिहासात त्यांची ठळक नोंद.
संजयंत
काही नीच लोक विघ्नाच्या भयाने सत्कार्याचा आरंभ करीत नाहीत. काही मध्यम प्रवृत्तीचे लोक शुभकार्याला प्रारंभ केल्यानंतर अडचणी उत्पन्न झाल्या की त्याला मध्येच सोडतात. परंतु विघ्नानी पुनः पुनः चाल केली तरी न डगमगता शेवटपर्यंत बालेकिल्ला लढवत राहणारे संजयंत मुनीसारखा एखादाच. अशाची गणना जैन वाङमयात अंतकृत् केवली ह्या नावाने केली आहे. त्यांना देहाचा त्याग करावा लागतो, पण ते ध्येयाचा त्याग करीत नाहीत. ३५१ ओव्यांमध्ये सांगितलेल्या ह्या लांबलचक कथेत निदान आहे, तप आहे, उपसर्ग आहे, भवावळीचे वर्णन आहे, समुद्रगमन आहे, मंत्रसाधना आहे, काट्याने काटा काढण्याची युक्ती आहे, न्यायनिवाडा डोळसपणे न्याय करणारा राजा आहे, तिर्यंचाशी माणसासारखा व्यवहार ठेवण्याची शिकवण आहे, हस्तीदंताचा लळा व मुक्ताहाराच्या आवडीपासून वेगळे करण्याचे कसब आहे. ह्या वैशिष्ट्यपूर्ण व्वक्तित्वामुळे संजयंत मुनीचे पुण्यस्मरण पुण्यास्रव कथाकोशात झाले आहे. बराच काळ लोटून गेल्यानंतरही काही काही घटना मानवी मनात कशा घर करून राहतात ह्याची ' हिमवत्' पर्वताची आठवण ही साक्ष आहे. संन्याशी होऊन हिमालयात जायचे आहे का हा वाक्प्रचार अजूनही घरोघरी आढळेल. त्याचे मूळ अशा प्रकारच्या कथांमध्ये आहे.
श्रेणिक व चेलना
श्रेणिक व चेलना ह्यांच्या उल्लेखाशिवाय कोणताही कथाकोश पूर्ण होत नाही. श्रेणिक हा बिंबिसाराचा कर्तृत्ववान राजपुत्र,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org