Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
(११)
पहिल्या मगधसम्राटाचा राजपुत्र. आपल्या कर्तबगारीने इतर भाऊबंदांना डावलून गादीवर बसला. परधर्मी परंतु चलाख अशा चेलनेशी लग्न केले. ययातिप्रमाणे मुलाकडून आपल्या वासनापूर्तीची आवश्यकता परिपूर्ण केली. अशा कलंदर व्यक्तिमत्त्वाचा माणूस भगवंताच्या समवशरणात प्रश्न विचारण्यासाठी समोर बसलेला. त्यांच्या गुरुनेही गणधरानीही न कंटाळता उत्तरे दिली. काही प्रश्न अडचणीचे असतील नाही असे नाही. तथापि ते त्यांच्या गुरुशिष्य संबंधात बाधक ठरले ह्याची इतिहासात साक्ष नाही. जीवनकाळात ६०,००० प्रश्न त्याने विचारले. त्यातील एक प्रश्न 'शंकेबाबतचा' एखादा मार्ग स्वीकारल्यानंतर शंका नको. 'संशयात्मा विनश्यति' सतत शंका ठेवणारा माणूस नष्ट होतो, औरंगजेबाच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते. सात वेळा साधु होऊन सात वेळा गृहस्थपद स्वीकारणारा भर्तृहरि ह्याच मार्गातला. आणि शस्त्राने दोरी कापल्यावर खाली पडून घात झाला तर काय म्हणणारा सोमदत्त ह्यातीलच. त्यापेक्षा निःशंक होऊन कृती करणारा अंजनचोर यशस्वी झाला हे ह्यात ठसविले आहे. शंकेखोर माणसापेक्षा कृतीशर चांगला हे दाखविण्याचा स्पष्ट प्रयत्न येथे आहे. नि:शंकता ही सम्क्यत्वाची सुरुवात ही ह्या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे म्हणून कालौघात अंजनचोर अजरामर झाले.
अनंतमति _ 'कर्मफलाची इच्छा न ठेवता कर्म करा' 'निष्काम कर्मयोग' ही गीतेची शिकवण आहे. तीच निष्कांक्षितांगाचे रूपाने जैनग्रंथात प्रकट झाली आहे. काही फलाची इच्छा न ठेवता काम करणे किती कठीण आहे हे आपल्याला पदोपदी जाणवते. टिप हा प्रकार तर पाश्चात्यांत शिष्टाचारात मोडतो. येताजाता आभार मानण्याचे प्रकार युरोप अमेरिका खंडात दिसून येतात. अशा प्रकारे माणसांनाही पाळण्यास अवघड निष्काम
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org