Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाट चे मराठी No. 37
Arba 1163 घडणी रू. नं. ५६० मधील उतारा
श्री यादी दमाजी गाईकवाड याज कडील करार सन सलासांत माहाल सरकारांत घेतले होते त्याचा अमल दोन वर्षे सरकारांत होता त्याज वर सन सलासांत माघारे दिल्हे.
१ तेलाडी १ सत्रागांव १ मरोली १ मोहे १ वाघोडे १ बीसनपूर. १ गल्हे
पेशजीचा अमल गुजराथ व हाली सदरहू माहाल मसार निलेकडे द्यावे पांच हजार फौजेनिसी चाकरी करावी मसलत नाही तेव्हां हमेशा तीन हजार फौजेनिसी हुजूर चाकरी करावी आठ महिने चाकरी करावी चार महिने छावणीस राहावे.
खासे कदाचीत गुजराथेस गेले तर पुत्रानी फौजेसुद्धां राहावे. एक निष्टेने असावे म्हणजे कृपायुक्त चालेल येणे प्रमाणे
छ ३० रबीलाखर कार्तीकमास
No. 37 This paper is a memorandum of agreement concluded by Damaji Gaikwar with the Peshwa in the end of the year 1163 Arbe. It records, as below:
(1) The following Parganas:
(1) Teladi. (1) Sataragaon. (1) Marouli. (1) Mohe. (1) Baghode. (1) Bishanpur. (1) Galhe.
Total
7
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com