Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 4
________________ आहे. 'शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा त-हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ण्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. हाताने काम व स्त्राने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की, 'हसंदिआ खेलंदिआ पैनंदिआ खावंदिआ विचे होवै मुकति ।' जीवन उत्साहाने जगण्याची शिखांची प्रवृत्तिपरकता या उद्गशातून स्पष्ट दिसते. ___शिखांचा इतिहास आणि जैनांचा इतिहास यात मूलगामी फरक आहे. जैनांच्या इतिहासात शांतता, अहिंसा आणि संयम यांचे साम्राज्य दिसते. सशस्त्र प्रतिकाराचा त्यांनी कधीही विचार केला नाही. याउलट शिखांच्या शेवटशेवटच्या गुरूंचा इतिहास हा लढाया, रक्तपात, साम्राज्य, बलिदान यांनी भरलेला दिसतो. भारताच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या या पंजाब प्रांताने इ.स.च्या ७-८ व्या शतकापासून ते थेट ब्रिटीश राजवटीपर्यंत अनेक परकीय आक्रमणे सोसली. अत्याचार सहन केले. धार्मिक जुलूमही अनुभवले. लढाऊ बाण्याच्या या समाजाने या सर्व अन्यायाचा प्रतिकार समर्थपणे केला. परकीय धर्म व राज्यकर्त्यांपुढे कधीही मान तुकविली नाही. अखेर अखेर तर सशस्त्र सैन्यदळेही उभी केली. ____स्वतंत्र खालसा राज्याच्या मागणीसाठी आजही गुरूद्वारांच्या आश्रयाने शस्त्र-साठा करण्याचा प्रसंग शिखांच्या इतिहासात येऊन गेला. कै. इंदिरा गांधींच्या राजवटीत 'ऑपरेशन ब्लू स्टार' करून हा प्रयत्न मोडून काढावा लागला. 'सच्चा डेरा सौदा' चळवळीमध्ये नुकताच रक्तपात झाल्याचे प्रसंगही घडले आहेत. त्यांच्या इतिहासाची समीक्षा करताना ही सर्व धार्मिक, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी बघणे अत्यंत गरजेचे आहे. एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी स्वत:च्या धर्माचा प्रसार मात्र कधीही तलवारीच्या बळावर केला नाही. गायन-भजन-सत्संग व उपदेश अशा सोप्या मार्गांनी त्यांनी शीखधर्माचा प्रसार केला. वाणीसंयम, मन:संयम, सत्संग, सेवा, ऐक्य, दया-क्षमा-संतोष, काम-क्रोध इ.चा त्याग, दानादि पुण्याचरण, स्वत:ची सुधारणा, सार्थक-निरर्थक विवेक आणि कृत्रिमतेचा निषेध हे सारे मुद्दे मात्र जैन व शीख या दोन्ही धर्मात समान दिसतात. ___ या तौलनिक निरीक्षणांचा उद्देश कोणाचीही श्रेष्ठता-कनिष्ठता ठरविणे हा नाही. जैनधर्म व शीखधर्म यांची पार्श्वभूमी, इतिहास, जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन या दृष्टीने त्यांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. **********

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25