Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 3
________________ - - दहाव्या गुरूंनंतर ते या ग्रंथालाच गुरुस्थानी ठेवतात. जैन लोक ज्ञानपंचमी अथवा श्रुतपंचमीला ग्रंथांची पूजा कीत असले तरी ते गुरुस्थानी मानीत नाही. उलट आगमग्रंथांचे ज्ञान प्रभावी उपाध्याय किंवा गुरूंकडूनच घेण्याचा प्रधात आहे. ग्रंथसाहिबात शीख धर्मातील गुरूंच्या पद्यरचनांबरोबरच जयदेव कवी, कबीर, नामदेव यांच्याही रचना सम्मीलि आहेत. यात दिसून येणारा उदारमतवाद आपल्याला ऋषिभाषितासारख्या एखाद्याच प्राचीन जैन ग्रंथात दिसतो. जैन धर्मात जसजसा कट्टरपणा वाढत गेला तसतशी इतरांची संभावना ते 'मिथ्यात्वी' अगर ‘पाखंडी' म्हणून करू लागले. अनेकान्तवादाशी विसंगत अशी ही गोष्ट हळूहळू या धर्मात शिरली. ___ एक परिपूर्ण दर्शन' या दृष्टीने विचार करता जैन धर्मातील सर्वात अधिक प्रमाणित संस्कृत सूत्रबद्ध ग्रंथ 'तत्त्वार्थसूत्र' याचा निर्देश करता येतो. तत्त्वज्ञान, वस्तुमीमांसा, आचरण, ज्ञानमीमांसा व अध्यात्म या सर्वांची सुरेख गुंफण या ग्रंथात दिसते. शीख धर्मात मात्र तत्त्वज्ञान व आचारविषयक मार्गदर्शन ग्रंथसाहिबातून विखुरलेल्या स्वरूपात आढळते व तेही शोधून काढावे लागते. तत्त्वज्ञानाची सुघट, तार्किक मांडणी हे जैन दर्शनाचे खास वैशिष्ट्य दिसते.तत्त्वज्ञान व आचार समजून सांगण्यासाठी जैनांनी विविध प्राकृत व संस्कृत भाषेत जी विपुल साहित्याची निर्मिती केली, तेही जैन धर्माचे वैशिष्ट्य आहे. ___ या दोन्ही धर्मातील तत्त्वज्ञानाचा ढाचाच वेगळा असल्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा करणे येथे उचित ठरणार नाही. मात्र दोन-तीन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. 'जग निर्मिण सामर्थ्यशाली सत-स्वरूप ईश्वरला संपूर्ण शरण जाणे' - हे शीख धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट जगत्का ईश्वराची सत्ता अमान्य करून जैनधर्म, कर्म आणि पुरुषार्थ याची सांगड घालतो. स्वत:ची आत्मिक शुद्धी सर्वोच्च मानून ईश्वर शरणागतीला स्थान देत नाही. तीर्थंकरांना सुद्धा जैनधर्म कवळ पूजनीयतेच्या स्थानावर ठेवतो. कोणाच्या कृपेने उद्धरून जाण्याची गोष्ट जैनधर्म मान्य करीत नाही. गुरुग्रंथसाहिबात कर्मगतीचा उल्लेख असला तरी कर्मसिद्धान्त त्यांनी विशेष स्पष्ट केलेला नाही. ___ शीखधर्म सृष्टीची उत्पत्ति ईश्वरकृत मानतो तर जैनधर्म सृष्टीला अनादिअनंत मानतो. शीख धर्मापेक्षा जैन धर्मातील स्वर्ग-नरक कल्पना तर्कदृष्ट्या अधिक सुसंगत व चतुर्गतींवर आधारित आहेत. दोन्ही धर्मांनी जातिवर्णभेदांचा निषेध केला आहे. शीख धर्माने सर्व जातिवर्णांच्या लोकांसाठी ‘लंगर प्रथा' चालू केली. आजही लंगर प्रथेत जातिवर्णभेद, उच्चनीच, रंकराव असे भेद केले जात नाहीत. सर्वजण एकत्र मिळूनच तेथे असलेली सर्व कामे करतात व एकत्र जेवतात. जैन धर्मात सिद्धान्तरूपाने जरी जातिवर्णभेद मान्य केला नसला तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मागील दाराने जातिवर्णव्यवस्था घुसलेली दिसते. ____ शीख धर्मातील दहा गुरूंनी तीर्थयात्रा करण्याचा निषेध केला असला तरी त्या-त्या गुरूंच्या नावाने तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आहेत. बदलत्या परिस्थितीत त्यात काही अनुचितही वाटत नाही. जैन धर्मात मात्र सात सुप्रधिद्ध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रचलित आहेत. ___मांसाहाराचा संपूर्णत: निषेध हे जैन धर्माचे एक विशेष लक्षण मानले जाते. त्या तुलनेत शीख गृहस्थ सामिष व निरामिष दोन्ही प्रकारचे आहार आपापल्या वैयक्तिक आवडीनुसार घेताना दिसतात. त्याबाबत त्यांना शीख धर्माचे कडक बंधन दिसत नाही. शीख समाजात नामकरण, विवाह, दीक्षा, मृत्यू इ. संस्कार अतिशय साधेपणाने साजरे केले जातात. त्यावेळी ग्रंथसाहिबातील पद्ये म्हटली जातात. जैन समाजात हे सर्व संस्कार व विशेषत: दीक्षा अतिशय थाटामाटात व डामडौलात होते. नामकरण, विवाह इ. प्रसंगी आगमातील पाठ वाचण्याचा प्रघात नाही. शिखांच्या धार्मिक चिह्नात कृपाण, कट्यार अथवा तलवारीचा समावेश असतो. याउलट जैन धर्मात ही सर्व हिंसेची उपकरणे मानून त्यांची देवघेव कटाक्षाने टाळली जाते. ___ अन्नपानाचे कडक नियम, कंदमुळांचे वर्जन, रात्रिभोजनाचा त्याग, उपवासाला दिलेले महत्त्व, परीषह सहन करण्याविषयीचे मार्गदर्शन ही सर्व जैन धर्माची वैशिष्ट्ये आहेत. याबाबतीत मात्र शीख धर्माची दृष्टी सर्वस्वी वेगळीPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25