Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 14
________________ (४२) जुद्ध (युद्ध) :- झगडा/मारामारी“ (बा, वै, उ), सामान्य युद्ध (गु). प्रत्यक्ष शत्रूबरोबर युद्ध, झगडा, मारामारी, हाणामारी तसेच स्वतंत्रपणे प्रतिपक्षाबरोबर करता येणारी लठ्ठालठ्ठी वा मारामारी. (४३) निजुद्ध (नियुद्ध) - जोराची मारामारी (बा, वै), जवळून केलेली, वैयक्तिक मारामारी (उ), विशेष युद्ध (गु). निजुद्ध म्हणजे कुस्ती अथवा मल्लयुद्ध. हाच अर्थ जैन वाङ्मयात अन्यत्रही सापडतो. उदा. आख्यानमणिकोश, श्लोक १६ - १७, पृ. २६१ (आ). (४४) जुद्धाइजुद्ध (युद्धातियुद्ध) :- उच्च ५० मारामारी (बा, वै), भयंकर " मारामारी ( उ ), अत्यंत विशेष युद्ध ५१ (गु). (४५) मुट्ठिजुद्ध (मुष्टियुद्ध) • मुष्टि वापरून केलेली हाणामारी. (४६) बाहुजुद्ध (बाहुयुद्ध) :- कुस्ती ५२ (बा, वै), हातघाईची लढाई (उ), हातांचा वापर करून केलेली हाणामारी. (४७) ईसत्थ :- या शब्दाची 'इषु-अस्त्र' अशी संस्कृत छाया घेऊन, बाण सोडणे (बा, वै), धनुष्यबाणाचे शास्त्र (उ), असे अर्थ दिलेले आहेत. या शब्दाची 'ईषदर्थ' अशी संस्कृत छाया घेऊन, 'थोडाने घणुं अने घ थोडुं देखाडवानी कळा' (गु). असा अर्थ केलेला आहे. येथे, ईसत्थ शब्दात पहिला शब्द ईस (देशी) = खुंटा, खिळा, ईश=ईश्वर, आणि ईसा = नांगराचे एक काष्ठ आणि दुसरा शब्द शास्त्र किंवा अस्त्र, हे शब्द घेता येतात. त्यानुसार पुढील अर्थ होतात. खिळा Dart, तो फुंकून वा अन्य प्रकाराने मारण्याची कला, ईश्वराचे शास्त्र म्हणजे ईश्वरवादाचे ज्ञान, नांगराचे काष्ठ यावरून नांगरण्याची कला. एक नक्की की येथे 'बाण सोडणे वा धनुष्यबाणाचे शास्त्र' हे अर्थ घेता येणार नाहीत, कारण पुढे धनुर्वेद ही स्वतंत्र कला आली आहे (आ). (४८) छरुप्पवाय ( त्सरुप्रवाद) :- खड्ग पेलणे४/चालविणे (बा, वै), खड्गयुद्ध ४ ( उ ), खड्गनी मूठ बनावना विगेरेनी कळा (गु). त्सरु म्हणजे तरवार वा अन्य शस्त्र यांची मूठ असा अर्थ आहे. मग मूठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होतो (आ). येथे 'छरुप्पवाह' असाही पाठभेद आढळतो. प्रवाह म्हणजे 'उत्तम घोडा' असा अर्थ आहे (गीलको) तेव्हा छरुप्पवाह म्हणजे घोड्यावर बसून मूठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होईल (आ). (४९) धणुव्वेय (धनुर्वेद) धनुष्यविद्या ५५ (बा), धनुष्यबाणाचे ५ शास्त्र (वै), धनुष्यबाणशास्त्रावरील ५५ (वेद) ग्रंथ ( उ ), धनुष्यबाणनी ५६ कळा (गु). (५०) हिरण्णपाग (हिरण्यपाक ) :- अघडीव सोने मुशीत घालणे" (बा, वै), रुपे वितळविणे" (उ), रुपानो पाक बनाववानी कळा (गु). (५१) सुवण्णपाग (सुवर्णपाक) :- घडीव सोने मुशीत“ घालणे (बा, वै), सोने" वितळविणे (उ), सुवर्णनो पाक बनाववानी कळा (गु). येथे हिरण्ण आणि सुवण्ण असे स्वतंत्र शब्द वापरले असल्याने, त्यांचे भिन्न अर्थ घेणे आवश्यक ठरते. म्हणून हिरण्ण म्हणजे अघडीव सोने, रुपे, अथवा अन्य मौल्यवान् धातु, आणि सुवर्ण म्हणजे घडीव सोने असे अर्थ घ्यावे लागतात. : (५२) वट्टखेड :- या शब्दाची 'वृत्तक्रीडा' अशी संस्कृत छाया घेऊन, पुढील अर्थ दिलेले दिसतात. गोळ्यांशी खेळ (बा), गोट्यांशी खेळ" (वै), चेंडूंशी खेळ" (उ) येथे वृत्त म्हणजे गोलपदार्थ असा अर्थ आहे. गुजराती भाषांतरात 'क्षेत्र खंडवानी (= नांगरण्याची) कला' असा अर्थ आहे. आता वट्ट म्हणजे कासव (पासम) हा अर्थ घेतल्यास, ‘कासवांशी खेळ' असा अर्थ होईल (आ). वट्टखेड शब्दाची 'वर्त्मक्रीडा' अशीही संस्कृत छाया होते. मग, रस्त्यावर करावयाचा अथवा दाखवावयाचा खेळ, असा अर्थ होईल (आ). (५३) नालियाखेड :- या शब्दाची 'नालिका - क्रीडा' अशी संस्कृत छाया घेऊन, पुढील अर्थ दिले जातात :- कमळांच्या° देठांशी खेळ (बा, वै), कमळांचे देठ कापणे, कमळाच्या देठापासून बनविलेले वा कमळाच्या

Loading...

Page Navigation
1 ... 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25