Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 16
________________ (आ). ३. गीइया (गीतिका) :- पोवाडा६८ करणे (बा), भावगीते व पोवाडे यांची रचना (वै), गीति वृत्तात गाणी वा काव्य८ यांची रचना (उ), गीत बनाववानी कळा (गु)-गीति नामक वृत्तात पद्ये करणे वा गीते रचणे. ४. हिरण्णजुत्ति (हिरण्ययुक्ति) :- अघडीव सोने करण्याचा६९ उपाय (बा), अघडीव सोन्याचा शोध व काम (वै), रुपे वा अन्य मौल्यवान् धातु यांची चाचणी (उ) सुवण नq बनावउं तेना अलंकार विगेरे बनाववा तथा पहेरवा विगेरेनी कळा (गु). ५. सुवण्णजुत्ति (सुवर्णयुक्ति) :- घडीव सोने करण्याचा उपाय (बा), घडीव सोन्याचा शोध व काम (वै), सोन्याची शुद्धी आणि चाचणी०० (उ), रुघु नवु बनावउं तेना अलंकार विगेरे बनाववा तथा पहेरवा विगेरेनी कळा (गु). मागे पाहिल्याप्रमाणे, हिरण्य म्हणजे रुपे वा अन्य मौल्यवान् धातू. सुवर्ण म्हणजे सोने. सोने, रुपे आणि अन्य मौल्यवान् धातू असणारी खनिजे शोधणे, त्यातून धातू वेगळा काढणे, तो शुद्ध करून त्याचा, पत्रा, तार इत्यादि बनविणे, आवश्यकतेनुसार त्यांना छिद्रे पाडणे, त्यांचा कस ओळखणे, इत्यादि कला. खेरीज, युक्ती म्हणजे मिश्रण असाही अर्थ आहे (गीलको), त्यानुसार निरनिराळ्या धातूंच्या मिश्रणाने मिश्र धातू सिद्ध करणे, असाही अर्थ होतो (आ). ६. चुण्णजुत्ति (चूर्ण युक्ति) :- सुगंध आणि चूर्णे (बा), चूर्णाचा वापर (वै), पूड वा चूर्ण तयार करणे (उ) गुलाल अबील विगेरे चूर्ण बनाववानी तथा तेनो उपयोग करवानी कळा (गु) :-सुगंधी तसेच औषधी आणि खाण्यास योग्य अप डी) तयार करणे (आ). ७. वत्थुविज्जा (वास्तुविद्या) :- बांधणीची विद्या (बा), बांधणीचे शास्त्र (वै), वास्तुविद्या (उ), घर, दुकान विगेरेवास्तूशास्त्रनी विद्या (गु).-येथे वत्थुविज्जा शब्दाची संस्कृत छाया वस्तुविद्या' अशीही होते ; त्यमुसार पदार्थविज्ञानशास्त्र असा अर्थ होईल (आ). (८-९) चक्कवूह (चक्रव्यूह),ग़रुलवूह-गरुड्यूह) :- चक्र व गरुड यांच्या आकाराप्रमाणे सैन्याची मांडणी करणे. (१०) सगडवूह (शकटव्यूह) :- पाचरीप्रमाणे असणारी सैन्याची मांडणी (उ). पण शकटाच्या आकाराची सैन्याची मांडणी हा शब्दश: अर्थ आहे. काही व्यूहांच्या माहितीसाठी मनुस्मृति ७.१८७-१८८ वरील कुल्लूक इत्यादींची स्पष्टीकरणे पहावीत. (११) लयाजुद्ध (लतायुद्ध) :- शाखायुद्ध ५ (बा), वेत-युद्ध (वै), चाबकाने केलेले युद्ध (उ), लता वडे युद्ध (गु).-लता या शब्दाचे अर्थ चाबूक (आपटेकोश), यष्टि, छडी (पासम) असे आहेत. तेव्हा चाबकाने अथवा छडीने केलेली मारामारी असा अर्थ होतो. 'सो...दारगं लयाए हंतुं पयत्तो' (वसुदेवहिंडि, पृ.७५) मध्ये लता म्हणजे छडी असा अर्थ आहे. तसेच, समवायांगसूत्रात ‘दंडजुद्ध' हा शब्द आहे (आ). शी चणे-प जानाशपायजा - 1 (आ) नाया, सम, राय या तीन ग्रंथांतील समान कला (१) अट्ठिजुद्ध :- हा शब्द 'अस्थियुद्ध' असा घेऊन, अस्थियुद्ध ६ (बा,वै), हाडापासून बनवलेल्या शस्त्रांनी युद्ध (उ) ; अस्थि (अथवा) यष्टि वडे युद्ध (गु), असे अर्थ दिले जातात. अट्टि म्हणजे ज्यात बिया झालेल्या नाहीत अशी फळे असाही अर्थ आहे (पासम) मग, अशी हिरवी कठिण फळे फेकून केलेली मारामारी असा अर्थ होईल. अट्ठिजुद्ध हा शब्द ‘अट्ठिय-जुद्ध' असाही घेता येतो. मग एके ठिकाणी स्थिर न रहाता (अट्टिय=अ-स्थित) केलेले युद्ध, असा अर्थ होतो (आ). (२) सुत्तखेड (सूत्रक्रीडा) :- धाग्यांशी/सुतांशी खेळ (बा,वै) दोरांशी खेळ (उ), सुतर (सरळ)७८ छेदवानी कळा (गु)).-सूत वापरून भरतकाम/कशिदा करणे, लोकरीच्या धाग्यांनी हाताने विणकाम करणे, दोरीने

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25