Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
Catalog link: https://jainqq.org/explore/009845/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख) भाग - ५ * लेखन व संपादन * डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट २०११ Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ २१. जैनधर्म व शीखधर्म : काही तुलनात्मक निरीक्षणे (सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका, जून २००९) (ज्ञान व माहितीचा प्रसार हे एकविसाव्या शतकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व जग झपाट्याने जवळ येत आहे. सर्व धर्म व संप्रदायांच्या माणसांना फक्त आपला धर्म आणि संप्रदायापुरताच संकुचित विचार करून चालणार नाही. जगात शांतता आणि सलोखा नांदायचा असेल तर एकमेकांच्या धर्माचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जैन धर्मात तर इतरांच्या मतांचा आदर करणे हे तत्त्वत: अनेकान्तवाद आणि स्याद्वादाच्या रूपाने मान्यच केले आहे. याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन सन्मति-तीर्थ संस्थेत प्रगत अभ्यासक्रमाच्या रूपाने जगातल्या सर्व प्रमुख धर्मांची तोंडओळख विद्यार्थ्यांनी करून घेतली. २००८-२००९ या वर्षात शीखधर्माविषयी जे चिंतन केले त्यातून पुढील तौलनिक निरीक्षणे मांडली आहेत.) विश्वकोशातील माहितीप्रमाणे शीखधर्म हा जगातील पाचवा मोठा धर्म आहे. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू आणि शीख हा त्यांचा क्रम आहे. साहजिकच भारतात सर्वात उशिरा जन्माला आलेला हा धर्म आज संख्येच्या दृष्टीने जैनांपेक्षाही जास्त आहे. इ.स. च्या १५ व्या व १६ व्या शतकात शीखधर्माचा प्रारंभ व क्रमाक्रमाने विकास होऊ लागला. अभ्यासकांचा असा अंदाज आहे की जगभरात २ कोटी ३० लाख लोक शीखधर्मी आहेत. जैनधर्म परंपरेने अनादि मानला आहे. लेखी पुराव्यानुसार तो ऋग्वेदाहनही नक्की प्राचीन आहे. जैनधर्माचा इतिहास पाहू लागल्यास असे दिसते की स्थानकवासी संप्रदाय ज्या काळात निर्माण झाला साधारणत: त्याच काळात शीखधर्माचाही उदय झाला. उशिरा स्थापन होऊनही शीखधर्मीय संख्येने जास्त असण्याची कारणे नक्कीच त्या धर्माच्या वैशिष्ट्यांमध्ये सामावलेली आहेत. क्लिष्ट तत्त्वज्ञान, अवघड परिभाषा, आचाराचा कडकपणा, खाण्यापिण्यावरील निर्बंध आणि साधुवर्गाला पायीच विहार करून प्रसार करण्याचा असलेला नियम यामुळे जैनधर्माच्या प्रसाराला साहजिकच मर्यादा पडल्या. वरील सर्व बाबतीत शीखधर्म सहजसुलभ व उदारमतवादी दिसतो. शीख' हा जरी 'धर्म' म्हणून ओळखला जात असला तरी तो वस्तुत: हिंदूधर्माचा एक संप्रदायच आहे. गुरू नानकदेवांनी हिंदूधर्मातील अनिष्ट प्रथा व चालीरीतींमध्ये सुधारणा घडवून हा संप्रदाय स्थापला. शीख तत्त्वज्ञानावर सांख्य आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची असलेली छाप तसेच ब्रह्म, परमात्मा, जगत्, ईश्वर, प्रकृति, पुरुष, माया इ. परिभाषाही शिखांनी हिंदू धर्मातूनच घेतलेली दिसते. जैनधर्म हा वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू धर्माची शाखा अगर संप्रदाय नसून तो एक स्वतंत्र श्रमणधर्म आहे. त्याची मूळ तत्त्वे, सिद्धान्त, ईश्वराविषयीची मान्यता, अहिंसा-संयम-तप-वैराग्य यांना असलेले प्राधान्य, हे सर्व त्या धर्माची स्वतंत्रता सिद्ध करण्यास पुरेसे आहे. काळानुसार बाह्य परिवर्तने येऊनही जैन धर्माचा गाभा तोच राहिला. ___ दोन्ही धर्मांच्या धार्मिक ग्रंथांच्या स्वरूपातही मूलगामी भेद आढळतात. दोन्ही धर्मांचे ग्रंथ त्या-त्या काळात बोलीभाषेत असणे' हे साम्य मात्र त्यात दिसते. गरुग्रंथसाहिब या एकाच ग्रंथाला शीखधर्माने मळ आगमग्रंथाचा दर्जा दिला आहे. जैनांमध्ये श्वेतांबर संप्रदायाने ४५ अथवा ३२ अर्धमागधी आगमग्रंथ मानले आहेत. दिगंबरीय लोक शौरसेनी भाषेतील प्राचीन ग्रंथांना आगमग्रंथ मानतात. याचा अर्थ असा की जैन आगमग्रंथ विस्ताराने व संख्येने कितीतरी अधिक आहेत. ग्रंथसाहिबातील पद्यांच्या विभागणीचा मुख्य आधार ‘रागानुसारी रचना' हा आहे. शीखधर्मात एकंदरीतच गायन आणि वादनाला महत्त्व असल्यामुळे ग्रंथसाहिबातील पद्ये रागांवर आधारित, गेय, रसाळ व भक्तिरसपूर्ण आहेत. याउलट गायनवादन इ. सर्व कलाविष्कार जैन साधूंसाठी पापश्रुत व वर्जनीय मानले आहेत. त्यामुळे काही जैन आगम छंदोबद्ध असले तरी गायनवादनाला त्यात स्थान नाही. शिवाय 'गुरु मानियो ग्रंथ' असे म्हणून शिखांच्या Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ - - दहाव्या गुरूंनंतर ते या ग्रंथालाच गुरुस्थानी ठेवतात. जैन लोक ज्ञानपंचमी अथवा श्रुतपंचमीला ग्रंथांची पूजा कीत असले तरी ते गुरुस्थानी मानीत नाही. उलट आगमग्रंथांचे ज्ञान प्रभावी उपाध्याय किंवा गुरूंकडूनच घेण्याचा प्रधात आहे. ग्रंथसाहिबात शीख धर्मातील गुरूंच्या पद्यरचनांबरोबरच जयदेव कवी, कबीर, नामदेव यांच्याही रचना सम्मीलि आहेत. यात दिसून येणारा उदारमतवाद आपल्याला ऋषिभाषितासारख्या एखाद्याच प्राचीन जैन ग्रंथात दिसतो. जैन धर्मात जसजसा कट्टरपणा वाढत गेला तसतशी इतरांची संभावना ते 'मिथ्यात्वी' अगर ‘पाखंडी' म्हणून करू लागले. अनेकान्तवादाशी विसंगत अशी ही गोष्ट हळूहळू या धर्मात शिरली. ___ एक परिपूर्ण दर्शन' या दृष्टीने विचार करता जैन धर्मातील सर्वात अधिक प्रमाणित संस्कृत सूत्रबद्ध ग्रंथ 'तत्त्वार्थसूत्र' याचा निर्देश करता येतो. तत्त्वज्ञान, वस्तुमीमांसा, आचरण, ज्ञानमीमांसा व अध्यात्म या सर्वांची सुरेख गुंफण या ग्रंथात दिसते. शीख धर्मात मात्र तत्त्वज्ञान व आचारविषयक मार्गदर्शन ग्रंथसाहिबातून विखुरलेल्या स्वरूपात आढळते व तेही शोधून काढावे लागते. तत्त्वज्ञानाची सुघट, तार्किक मांडणी हे जैन दर्शनाचे खास वैशिष्ट्य दिसते.तत्त्वज्ञान व आचार समजून सांगण्यासाठी जैनांनी विविध प्राकृत व संस्कृत भाषेत जी विपुल साहित्याची निर्मिती केली, तेही जैन धर्माचे वैशिष्ट्य आहे. ___ या दोन्ही धर्मातील तत्त्वज्ञानाचा ढाचाच वेगळा असल्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा करणे येथे उचित ठरणार नाही. मात्र दोन-तीन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. 'जग निर्मिण सामर्थ्यशाली सत-स्वरूप ईश्वरला संपूर्ण शरण जाणे' - हे शीख धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट जगत्का ईश्वराची सत्ता अमान्य करून जैनधर्म, कर्म आणि पुरुषार्थ याची सांगड घालतो. स्वत:ची आत्मिक शुद्धी सर्वोच्च मानून ईश्वर शरणागतीला स्थान देत नाही. तीर्थंकरांना सुद्धा जैनधर्म कवळ पूजनीयतेच्या स्थानावर ठेवतो. कोणाच्या कृपेने उद्धरून जाण्याची गोष्ट जैनधर्म मान्य करीत नाही. गुरुग्रंथसाहिबात कर्मगतीचा उल्लेख असला तरी कर्मसिद्धान्त त्यांनी विशेष स्पष्ट केलेला नाही. ___ शीखधर्म सृष्टीची उत्पत्ति ईश्वरकृत मानतो तर जैनधर्म सृष्टीला अनादिअनंत मानतो. शीख धर्मापेक्षा जैन धर्मातील स्वर्ग-नरक कल्पना तर्कदृष्ट्या अधिक सुसंगत व चतुर्गतींवर आधारित आहेत. दोन्ही धर्मांनी जातिवर्णभेदांचा निषेध केला आहे. शीख धर्माने सर्व जातिवर्णांच्या लोकांसाठी ‘लंगर प्रथा' चालू केली. आजही लंगर प्रथेत जातिवर्णभेद, उच्चनीच, रंकराव असे भेद केले जात नाहीत. सर्वजण एकत्र मिळूनच तेथे असलेली सर्व कामे करतात व एकत्र जेवतात. जैन धर्मात सिद्धान्तरूपाने जरी जातिवर्णभेद मान्य केला नसला तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मागील दाराने जातिवर्णव्यवस्था घुसलेली दिसते. ____ शीख धर्मातील दहा गुरूंनी तीर्थयात्रा करण्याचा निषेध केला असला तरी त्या-त्या गुरूंच्या नावाने तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आहेत. बदलत्या परिस्थितीत त्यात काही अनुचितही वाटत नाही. जैन धर्मात मात्र सात सुप्रधिद्ध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रचलित आहेत. ___मांसाहाराचा संपूर्णत: निषेध हे जैन धर्माचे एक विशेष लक्षण मानले जाते. त्या तुलनेत शीख गृहस्थ सामिष व निरामिष दोन्ही प्रकारचे आहार आपापल्या वैयक्तिक आवडीनुसार घेताना दिसतात. त्याबाबत त्यांना शीख धर्माचे कडक बंधन दिसत नाही. शीख समाजात नामकरण, विवाह, दीक्षा, मृत्यू इ. संस्कार अतिशय साधेपणाने साजरे केले जातात. त्यावेळी ग्रंथसाहिबातील पद्ये म्हटली जातात. जैन समाजात हे सर्व संस्कार व विशेषत: दीक्षा अतिशय थाटामाटात व डामडौलात होते. नामकरण, विवाह इ. प्रसंगी आगमातील पाठ वाचण्याचा प्रघात नाही. शिखांच्या धार्मिक चिह्नात कृपाण, कट्यार अथवा तलवारीचा समावेश असतो. याउलट जैन धर्मात ही सर्व हिंसेची उपकरणे मानून त्यांची देवघेव कटाक्षाने टाळली जाते. ___ अन्नपानाचे कडक नियम, कंदमुळांचे वर्जन, रात्रिभोजनाचा त्याग, उपवासाला दिलेले महत्त्व, परीषह सहन करण्याविषयीचे मार्गदर्शन ही सर्व जैन धर्माची वैशिष्ट्ये आहेत. याबाबतीत मात्र शीख धर्माची दृष्टी सर्वस्वी वेगळी Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ आहे. 'शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा त-हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ण्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. हाताने काम व स्त्राने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की, 'हसंदिआ खेलंदिआ पैनंदिआ खावंदिआ विचे होवै मुकति ।' जीवन उत्साहाने जगण्याची शिखांची प्रवृत्तिपरकता या उद्गशातून स्पष्ट दिसते. ___शिखांचा इतिहास आणि जैनांचा इतिहास यात मूलगामी फरक आहे. जैनांच्या इतिहासात शांतता, अहिंसा आणि संयम यांचे साम्राज्य दिसते. सशस्त्र प्रतिकाराचा त्यांनी कधीही विचार केला नाही. याउलट शिखांच्या शेवटशेवटच्या गुरूंचा इतिहास हा लढाया, रक्तपात, साम्राज्य, बलिदान यांनी भरलेला दिसतो. भारताच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या या पंजाब प्रांताने इ.स.च्या ७-८ व्या शतकापासून ते थेट ब्रिटीश राजवटीपर्यंत अनेक परकीय आक्रमणे सोसली. अत्याचार सहन केले. धार्मिक जुलूमही अनुभवले. लढाऊ बाण्याच्या या समाजाने या सर्व अन्यायाचा प्रतिकार समर्थपणे केला. परकीय धर्म व राज्यकर्त्यांपुढे कधीही मान तुकविली नाही. अखेर अखेर तर सशस्त्र सैन्यदळेही उभी केली. ____स्वतंत्र खालसा राज्याच्या मागणीसाठी आजही गुरूद्वारांच्या आश्रयाने शस्त्र-साठा करण्याचा प्रसंग शिखांच्या इतिहासात येऊन गेला. कै. इंदिरा गांधींच्या राजवटीत 'ऑपरेशन ब्लू स्टार' करून हा प्रयत्न मोडून काढावा लागला. 'सच्चा डेरा सौदा' चळवळीमध्ये नुकताच रक्तपात झाल्याचे प्रसंगही घडले आहेत. त्यांच्या इतिहासाची समीक्षा करताना ही सर्व धार्मिक, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी बघणे अत्यंत गरजेचे आहे. एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी स्वत:च्या धर्माचा प्रसार मात्र कधीही तलवारीच्या बळावर केला नाही. गायन-भजन-सत्संग व उपदेश अशा सोप्या मार्गांनी त्यांनी शीखधर्माचा प्रसार केला. वाणीसंयम, मन:संयम, सत्संग, सेवा, ऐक्य, दया-क्षमा-संतोष, काम-क्रोध इ.चा त्याग, दानादि पुण्याचरण, स्वत:ची सुधारणा, सार्थक-निरर्थक विवेक आणि कृत्रिमतेचा निषेध हे सारे मुद्दे मात्र जैन व शीख या दोन्ही धर्मात समान दिसतात. ___ या तौलनिक निरीक्षणांचा उद्देश कोणाचीही श्रेष्ठता-कनिष्ठता ठरविणे हा नाही. जैनधर्म व शीखधर्म यांची पार्श्वभूमी, इतिहास, जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन या दृष्टीने त्यांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. ********** Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ २२. जैनांच्या आगमग्रंथांतील बहात्तर कला (विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, १९८६) प्राचीन भारतात अध्ययनाचे विषय म्हणून अनेक विद्या, कला, इत्यादींचा उल्लेख वाङ्मयात सापडतो. हिंदूंच्या ग्रंथात चौसष्ट कलांचा निर्देश येतो. या कलांचे परिगणन व अर्थ यांबाबत मतभेद दिसतो. तसेच कधी ६४ पेक्षा अधिक कलाही सांगितल्या गेल्या आहेत. ' बौद्धांच्या ललितविस्तर नामक ग्रंथात बोधिसत्त्व म्हणजे बुद्ध हा ९० पेक्षा अधिक कलांमध्ये पारंगत होता, असे म्हटले आहे. जैन धर्मीयांच्या ग्रंथात ७२ कला असा उल्लेख येतो. या ७२ कलांच्या सूची जैनांच्या आगमग्रंथात आढळतात. जैनांच्या आगमेतर ग्रंथात प्रायः अशा सूची नाहीत. तथापि उद्योतनसूरिकृत कुवलयमाला' या प्राकृत भाषेतील ग्रंथात ७२ कलांचे परिगणन आहे. पण त्या कला आगमग्रंथांतील कलांपेक्षा वेगळ्या आहेत. प्रस्तुत लेखात जैनांच्या आगम ग्रंथातील ७२ कलांचा विचार केला आहे. कला म्हणजे काय ? कला या शब्दाचे अनेक व्युत्पत्त्यर्थ तसेच प्रचलित अर्थ दिले जातात. त्यांमध्ये 'एखाद्या कामातील अपेक्षित अथवा आवश्यक चातुर्य, प्रावीण्य' असा एक अर्थ आहे. जैनांच्या आगमग्रंथावरील टीकाकार' अभयदेव हा 'कला:' म्हणजे 'विज्ञानानि' असा अर्थ देतो. त्याच्या मते, एखाद्या ज्ञेय विषयाचे विशेष ज्ञान म्हणजे कला होय आणि म्हणून 'कलनीयभेदाद् द्विसप्ततिः कलाः' असे तो सांगतो. जैन आगमग्रंथातील ७२ कला जैनांच्या आगमग्रंथांपैकी समवायांगसूत्र, ज्ञातृधर्मकथा (नायाधम्मकहाओ ), औपपातिकसूत्र आणि राजप्रश्नीयसूत्र (रायपसेणइयसुत्त किंवा पएसिकहाणय) या चार ग्रंथात ७२ कला दिलेल्या आहेत. या कलांमध्ये काही कला समान आहेत तर काही कला वेगळ्या आहेत. तसेच लक्षणीय गोष्ट अशी की काही ग्रंथात या कला ७२ पेक्षा जास्तच आहेत. एके ठिकाणी तर ७२ ही संख्या साधण्यास, अनेक कला एकाच क्रमांकाखाली दिलेल्या आहेत. हा सर्व तपशील पुढीलप्रमाणे सांगता येईल. (अ) नायाधम्मकहाओ या ग्रंथात कला बरोबर ७२ आहेत. (आ) समवायांगसूत्र-येथे क्रमांक देऊन ७२ कला दिलेल्या आहेत. परंतु कला क्रमांक ६७ खाली एकूण ३ कला, क्रमांक ६८ खाली एकूण ७ कला, क्रमांक ६९ खाली एकूण ५ कला, क्रमांक ७० खाली एकंदर २ कला, आणि क्रमांक ७१ खाली एकूण २ कला आहेत. आता, त्या त्या क्रमांकाखाली जर एकच कला ठेवली, तर एकूण चौदा कला - (३+७+५+२+२ = १९ ; १९-५ = १४) जास्त होतात. म्हणजे समवायांगसूत्रात एकूण कला ८६ (७२+१४) होतात. समवायांगसूत्रातील कलांच्या संदर्भात पुढील गोष्ट सांगणे आवश्यक आहे. भ.महावीर २५०० महानिर्वाण महोत्सव याप्रसंगी, पंडिता सुमतिबाई शहा यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या 'पूर्णार्घ्य' या ज्ञानकोशात्मक ग्रंथात, ‘समवायांगसूत्रामध्ये ७२ कलांची नामावली आहे.' (पृ.७८५) असे म्हणून पुढे यादी देताना मात्र प्रत्यक्षात ८५ कला दिलेल्या आहेत. आणि कलांची ८५ संख्या होण्याचे कारण असे की 'पोक्खच्च' ही कला या यादीतून गळली आहे ; ती धरली की समवायांगसूत्रातील कला ८६ होतात. म्हणजे ७२ म्हणून आपण ८५-८६ कला दे आहोत, हे या कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही. (तसेच, पूर्णार्घ्य मधील या यादीत Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ चमत्कारिक मुद्रणदोष झालेले आहेत. त्यांचा निर्देश पुढे केला आहे.) (इ) औपपातिकसूत्र-या सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या ७५ होते. प्रा. सुरू यांनी संपादित केलेल्या औपपातिक सूत्रात सहा कला कंसात ठेवलेल्या आहेत. त्या धरून एकूण ८0 कला होतात, त्या सोडल्यास कला ७४ होतात. प्रा. सुरूच्या पुस्तकात कंसात असणाऱ्या 'वत्थविहि' आणि 'विलेवणविहि' या कला पाथीमध्ये कंसरहित दिल्या आहेत. खेरीज, सुरू-संपादित पुस्तकातील संभव, मुठ्ठिन्जुद्ध, मणिपाग, आणि धाउपाग' या कला पोथीत नाहीत. __ येथेही पुढील गोष्ट लक्षात घ्यावी :- वर उल्लेखिलेल्या पूर्णार्घ्य' ग्रंथात म्हटले आहे. 'औपपातिकसूत्रामध्ये बहात्तर कलांची एक यादी दिलेली आहे. ती या यादीप्रमाणेच (म्हणजे समवायांगसूत्रातील यादीप्रमाणेच) असून केवळ काही नावांमध्ये फरक आहे.' (पृ.७८७) पण हे विधान संपूर्णपणे बरोबर नाही. कारण औपपातिकसूत्रातील पुढील ८ कला समवायांगसूत्रात नाहीतच. (१) पासक, (२) हिरण्णजुत्ति, (३) सुवण्णजुत्ति, (४) चुण्णजुत्ति, (५) चक्कवूह, (६) गरुलवूह, (७) सगडवूह आणि (८) लयाजुद्ध, म्हणजे येथेही कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाचा घोटाळा झालेला आहे. (ई) मलयगिरि या टीकाकाराच्या वृत्तीसह असणाऱ्या राजप्रश्नीय सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या ७३ आहे. पण श्री. दोशी यांनी संपादित केलेल्या रायपसेणइयसुत्तच्या मुद्रित पोथीत ७२ कला आहेत, कारण तेथे राज.च्या मुद्रित पोथीतील पडिवूह' ही कला गळलेली अथवा गाळलेली आहे. डॉ.प.ल.वैद्य आणि श्री.ए.टी.उपाध्ये यांनी संपादित केलेल्या 'पएसिकहाणय' ग्रंथात कलांची संख्या बरोबर ७२ आहे. तथापि वर उल्लेखिलेल्या पोथीतल काही कला येथे सापडत नाहीत. बहात्तर कलांची निश्चिती ____ वर पाहिल्याप्रमाणे कलांची संख्याभिन्नता अभयदेवसूरीसारख्या टीकाकाराच्या लक्षात आली नसती तरच नवल. या स्थितीत ७२ ही कलांची संख्या साधण्यास अभयदेव असे सुचवितो :- काही कलांचा अंतर्भाव अन्य कलांमध्ये होतो असे समजावे. (इहच द्विसप्ततिः इति कलासंख्या उक्ता, बहुतराणि च सूत्रे तन्नामानि उपलभ्यन्ते, तत्र कासांचित् कासुचिद् अंतर्भाव: अवगन्तव्यः ।) हे म्हणणे समाधानकारक वाटत नाही. तसेच, कलांचे वर्ग करून, एका वर्गात अनेक कला घातल्या तरी ७२ हा कलासंख्येचा प्रश्न सुटत नाही. या बाबतीत असे सुचविता येईल :- ज्याप्रमाणे एखाद्या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखितावरून पाठ निश्चित करताना जास्तीत जास्त हस्तलिखितात आलेला पाठ प्राय: स्वीकारला जातो. त्याप्रमाणे ७२ कलांच्या बाबतीत करावे. म्हणजे असे :- ७२ कला असणाऱ्या सर्व ग्रंथात ज्या कला समानपणे येतात, त्या सर्व घ्यावयाच्या याप्रमाणे क्रमाने करीत गेल्यास ७२ कला ठरविता येतील, ही दृष्टी पत्करून कलांचे परिगणन पुढीलप्रमाणे होईल. कलांचे परिगणन कलांच्या सूची एकूण चार ग्रंथांत आहेत. तेव्हा प्रथम चार ग्रंथांत, मग तीन ग्रंथांत, नंतर दोन ग्रंथांत समान असणाऱ्या कला, व शेवटी एकेका ग्रंथांत असणाऱ्या कलांचे निर्देश करता येतील. या संदर्भात पुढील बाबी लक्षात असाव्यात :- (१) ज्ञाताधर्मकथा आणि नायाधम्मकहाओ ही एकाच ग्रंथाची दोन नावे आहेत. (२) राजप्रश्नीय, रायपसेणइय आणि पएसिकहाणय ही एकाच ग्रंथाची नावे आहेत. (३) कलांची नावे प्राकृत भाषेत आहेत. तेव्हा कधी कलानामांची वर्णान्तरे भिन्न असली तरी कला मात्र एकच आहे. अशा कला देताना, वेगळे वर्णान्तर देणाऱ्या ग्रंथाचे नाव कंसात ठेवले आहे. (४) कला-नामांची संस्कृत छाया त्यांचे पुढे स्पष्टीकरण करताना दिली आहे. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ (१) नाया, सम, राज/राय, आणि औप. या ग्रंथातील समान कला अशा आहेत : (१) लेह (२) गणिय, गणित (अ औ) (३) रूव (४) नट्ट, णट्ट (औप) (५) गीय (६) वाइय (७) सरगय (८) पोक्खरगय (नाया, वैप), पुक्खरगय (९) समताल (१०) जूय (११) जणवाय (१२) अट्ठावय (१३) पोरेकच्च (१४) दगमट्टिया (१५) अन्नविहि, अण्णविहि (अ औ) (१६) पाणविहि (१७) वत्थविहि (१८) सयणविहि (१९) अज्जा (२०) पहेलिया (२१) मागहिया (२२) गाहा (२३) सिलोग, सिलोय (अ औ, ज्ञाता) (२४) आभरणविहि (२५) तरुणीपडिकम्म (२६) इथिलक्खण, इत्थीलक्खण (सम) (२७) पुरिसलक्खण (२८) हयलक्खण (२९) गयलक्खण (३०) गोणलक्खण (३१) कुक्कुडलक्खण (३२) छत्तलक्खण (३३) दंडलक्खण, डंडलक्खण (ज्ञाता) (३४) असिलक्खण (३५) मणिलक्खण (३६) कागिणिलक्खण (नाया). कागणिलक्खण (सम, राय, सुऔ, ज्ञाता), काकणिलक्खण (अऔ) (३७) नगरमाण, णगरमाण (राय, राज) (३८) वूह (३९) पडिवूह, परिवूह (ज्ञाता) (४०) चार (४१) पडिचार, परिचार (ज्ञाता) (४२) जुद्ध (४३) निजुद्ध, नियुद्ध (राय) (४४) जुद्धाइजुद्ध', जुद्धातिजुद्ध (ज्ञाता, अऔ) (४५) मुट्ठिजुद्ध (४६) बाहुजुद्ध (४७) ईसत्थ, इसत्थ (अऔ) (४८) छरुप्पवाय, छरुप्पवाह (अऔ) (४९) धणुव्वेय, धणुवेय (राज, राय) (५०) हिरण्णपाग, हिरन्नपाग (ज्ञाता) (५१) सुवण्णपाग, सुवन्नपाग (सम, ज्ञाता) (५२) वट्टखेड (नाया, सम, अऔ), वट्टखेड्ड (राम, राज), वत्तखेड्ड (सुऔ) (५३) नालियाखेड (नाया, सम, वैप), णालियाखेड (अ औ) णालिया खेड्ड (राय, राज, सुऔ) (५४) पत्तच्छेज्ज (५५) कडच्छेज्ज (नाया), कडगच्छेज्ज (ज्ञाता, सम, राय, राज, सुऔ), कडवच्छेज्ज (अऔ) (५६) सज्जीव, सजीव (सम, राज) (५७) निज्जीव (५८) सउणरुय. (२) (अ) नाया, राय, औप या तिन्हीतील समान कला अशा : (१) पासय (नाया), पासग (राज, राय), पासक (अ औ) (२) विलेवणविहि (३) गीइया (४) हिरण्णजुत्ति (५) सुवण्णजुत्ति, सुवन्न-जुत्ति (ज्ञाता) (६) चुण्णजुत्ति, चुन्नजुत्ति (ज्ञाता) (७) वत्थुविज्जा (८) चक्कवूह (९) गरुलवूह (१०) सगडवूह (११) लयाजुद्ध. (आ) नाया, सम आणि राय या तिन्हीतील समान कला अशा :(१) अट्ठिजुद्ध (२) सुत्तखेड, सुत्तखेड्ड (राय) (इ) सम, राय आणि औप या तिन्हीतील समान कला अशा :(१) चक्कलक्खण (२) मणिपाग (सुऔ) (३) धातुपाग (सुऔ) (ई) नाया, सम आणि औप या तिन्हीतील समान कला अशा :(१) खंधारमाण (नाया, सुऔ), खंधावारमाण (सम) (३) सम आणि औप या दोन ग्रंथांतील समान कला पुढीलप्रमाणे : (१) गंध जुत्ति (२) चम्मलक्खण (३) खंधावारनिवेस (सम), खंधारनिवेसण (सुऔ) (४) वत्थुनिवेस (सम)११, वत्थुनिवेसण (सुऔ) (५) नगरनिवेस (सम), नगरनिवेसण (सुऔ) (४) एकाच ग्रंथात आढळणाऱ्या कला अशा आहेत :(क) राय । राज मध्ये पुढील कला आहेत :(१) णिद्दाइय (णिद्दाइया) (२) माणवार (३) जुद्धजुद्ध (४) खंधवार, खंदवार (उप) (५) जणवय Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ (ख) औप मध्ये पुढीलप्रमाणे कला आहेत :(१) संभव (२) मुत्ताखेड (सुऔ) (३) खुत्ताखेड्ड (अऔ) (ग) सम मध्ये असणाऱ्या कला पुढीलप्रमाणे आहेत : (१) मधुसित्थ (२) मिंढयलक्खण (३) चंदलक्खण (४) सूरचरिय (५) राहुचरिय (६) गहचरिय (७) सोभागकर (८) दोभागकर (९) विज्जागय (१०) मंतगय (११) रहस्सगय (१२) सभासा (१३) वत्थुमाण (१४) दंडजुद्ध (१५) आससिक्खा (१६) हत्थिसिक्खा (१७) धम्मखेड (१८) चम्मखेड वरील परिगणनाचा सारांश असा :(१) नाया, सम, राज । राय, औप या चारांतील कला (२) तीन ग्रंथांतील समान कला (अ) नाया, राय, औप (आ) नाया, सम, राय (इ) सम, राय, औप (ई) नाया, सम, औप Mrm ML (३) सम व औप या दोहोंतील कला (४) एकेका ग्रंथातील कला :(क) राय । राज (ख) औप (ग) सम 3 ॥ १०६ कला बहात्तर कशा होतील ? वर पाहिल्याप्रमाणे चार ग्रंथातील समान ५८ कला आणि (अ) मधील तीन ग्रंथांतील समान ११ कला मिळून ६९ कला होतात. आता, वरील (आ), (इ) आणि (ई) मध्ये तीन ग्रंथांना समान कला २,३,१ अशा आहेत : (१) अटिजुद्ध (१) चक्कलक्खण (२) सुत्तखेड (२) मणिपाग (१) खंधावारमाण (३) धातुपाग यातील कोणत्या तीन कला घेऊन ७२ ही संख्या साधावी, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर तीन प्रकारांनी देता येईल : (अ) अभयदेवाने सुचविल्याप्रमाणे, वरील २,३,१ कलांतील एक कला दुसऱ्या कलेत समाविष्ट करावयाचे ठरविले तर मागे आलेल्या 'हिरण्णपाग' मध्ये 'धातुपाग' आणि 'मणिपाग' या कला जातील, आणि 'नगरमाण'मध्ये 'खंधावारमाण' ही कला जाईल. मग (१) अट्ठिजुद्ध (२) सुत्तखेड, व (३) चक्कलक्खण या तीन कला उरतील. या तीन कला व पूर्वीच्या ६९ कला मिळून ७२ कला होतील (येथे पूर्वीच्या कोणत्या कलेत दुसरी कला घालावी याबद्दल मतभेद होण्याची शक्यता आहे). (आ) चार ग्रंथांना समान असणाऱ्या ५८ कला घेऊन, ७२ संख्या पुरी करण्यास तीन ग्रंथातील समान कलांमधून १४ कला पुढीलप्रमाणे निवडता येतील (येथेही निवडीबाबत मतभेद Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ होण्याची शक्यता आहे) :- (१) पासय (२) विलेवणविहि (३) गीइया (४) हिरण्णजुत्ति (५) सुवण्णजुत्ति (६) चुण्णजुत्ति (७) वत्थुविज्जा (८) चक्कवूह (९) गरुलवूह (१०) सगडवूह (११) लयाजुद्ध (१२) सुत्तखेड (१३) चक्कलक्खण (१४) धातुपाग (इ) चार ग्रंथांतील समान ५८ कला घेऊन, ७२ संख्या पुरी करण्यास तीन, दोन व एका ग्रंथात येणाऱ्या कलांतून पुढील १४ कला निवडता येतील (येथेही निवडीबाबत मतभेद होईल) :-(१) हिरण्णजुत्ति (२) सुवण्णजुत्ति (३) चुण्णजुत्ति (४) वत्थुविज्जा (५) लयाजुद्ध (६) सुत्तखेड (७) धातुपाग (८) चम्मलक्खण (९) खंधावारनिवेस (१०) गहचरिय (११) विज्जागम (१२) आससिक्खा (१३) हत्थिसिक्खा (१४) चम्मखेड वरील चर्चेचा मथितार्थ असा होतो :- चार ग्रंथांतील समान अशा ५८ कला कळल्या तरी उरलेल्या १४ कला ठरविण्याबाबत मतभेद होईल. अशा स्थितीत '७२ कला याच' असे निश्चितपणे सांगणे शक्य होणार नाही, हे उघड आहे. ___ अशा स्थितीतही अभयदेवाच्या म्हणण्याप्रमाणे, ठरवलेल्या ७२ कलांत, बहात्तर सोडून उरलेल्या ३४ कला कशाबशा बसविल्या. उदाहरणार्थ - चुण्णजुत्तिमध्ये गंधजुत्ति (१) जुद्धमध्ये अट्ठिजुद्ध (२) व जुद्धजुद्ध (३) असिलक्खणमध्ये चक्कलक्खण (४) धातुपागमध्ये माणिपाग (५) वत्थुविज्जामध्ये खंधारमाण (६) माणवार (७) खंधावारनिवेस (८) वत्थुनिवेस (९) नगरनिवेस (१०) खंधवार (११) वत्थुमाण (१२) लयाजुद्धमध्ये दंडजुद्ध (१३) जणवायमध्ये जणवय (१४) वट्टखेडमध्ये मुत्ताखेड (१५) चम्मखेड (१६) धम्मखेड (१७) पोक्खरगयमध्ये खुत्ताखेड (१८) गोणलक्खणमध्ये मिंढयलक्खण (१९) तरुणीपडिकम्ममध्ये मधुसित्थ (२०) निज्जीवमध्ये णिद्दाइया (२१) सउणरुयमध्ये सभासा (२२) हयलक्खणमध्ये आससिक्खा (२३) गयलक्खणमध्ये हत्थिसिक्खा (२४) असे केले तरीसुद्धा सममधील पुढील दहा कला कोणत्या अन्य कलांत अंतर्भूत करता येतील हा प्रश्नच आहे. (१) संभव (२) चंदलक्खण (३) सूरचरिय (४) राहुचरिय (५) गहचरिय (६) सोभागकर (७) दोभागकर (८) विज्जागय (९) मंतगय (१०) रहस्सगय. आता, वर्गीकरण करून ७२ कला ठरवाव्यात, असे म्हटले तरी कलांची संख्या १०६ च रहाणार आणि कलांचेच ७२ वर्ग करून त्यांमध्ये १०६ कला बसवाव्यात असे म्हटले तरी वर्ग म्हणून कोणती कला घ्यावी व तीच का घ्यावी, हा प्रश्न निर्माण होतोच. अशा स्थितीत ७२ कलांची निश्चिती करणे हे काम सोडून देणेच योग्य वाटते. त्यापेक्षा जैनागमांत आढळणाऱ्या १०६ कलांचे अर्थ जाणून घेणे हेच अनेक दृष्टींनी योग्य वाटते. कलावाचक शब्दांचे अर्थ जैनांच्या ज्या चार आगमग्रंथांत कलांच्या सूची आहेत, त्या ग्रंथांवरील प्राचीन टीकाकारांनी त्यांचे स्पष्टीकण दिलेले नाही. याला थोडासा अपवाद अभयदेव हा आहे. समवायांगसूत्रावरील आपल्या टीकेत त्याने लेह, गणिय, रूव, नट्ट, आणि वाइय या शब्दांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. उरलेल्या कलांच्या बाबतीत, 'इत्यादिक: कलाविभागो लौकिकशास्त्रेभ्य: अवसेय:' (पृ.८३ब) असे म्हणून तो मोकळा होतो. त्यामुळे हे आगमग्रंथ संपादित करणाऱ्या आधुनिक विद्वानांनी दिलेल्या अर्थांकडे आपणांस वळावे लागते. त्याची माहिती अशी : (अ) डॉ.प.ल.वैद्य आणि श्री.ए.टी.उपाध्ये यांनी स्वतंत्रपणे ‘पएसिकहाणय' संपादित केले आहे. त्यांमध्ये ७२ कलांचे अर्थ इंग्रजी भाषेत आहेत.(आ) समवायांगसूत्रातील काही कलांचे मराठीत वर्गीकरण तसेच स्पष्टीकरण 'पूर्णार्घ्य' ग्रंथात सापडते. (इ) ज्ञाताधर्मकथासूत्राच्या मुद्रित आवृत्तीत कलांचे अर्थ गुजराथी भाषेत आहेत. खेरीज नायाधम्मकहाओमधील कलांचे अर्थ एल्.डी.बार्नेट या पंडिताने आपल्या अंतगडदसाओ' या अन्य जैनागमग्रंथाचा Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ इंग्रजी भाषांतरात दिले आहेत. याचे कारण असे. अंतगडदसाओ ग्रंथाच्या तिसऱ्या वर्गात, ‘गयसुकुमाल' या कुमाराची कथा आहे. त्याच्या संदर्भात, त्याच्या शिक्षणापासून ते तो भोगसमर्थ' होईपर्यंतचे वर्णन हे मेह' माराप्रमाणे आहे असे म्हटले आहे (तए णं तस्य दारगस्स अमापियरो नामं करेंति गयसुकुमाले त्ति । सेसंजहा मेहे जाव भोसमत्थे जाए यावि होत्था ।) आता, या मेह कुमाराची कथा नायाधम्मकहाओमध्ये प्रथम येते. हा मेह ७२ कला शिकतो. त्यांची यादी नायामध्ये आहे. त्या ७२ कलांचा अर्थ बार्नेट देतो. बार्नेटने दिलेल्या अर्थांच्या बाबतीतही दोन गोष्टी येथे नमूद करावयास हव्यात :- (१) बार्नेटने 'विलेवणविहि'चे भाषांतर दिलेले नाही. (२) बार्नेटचे Rules of House Keeping हे शब्द मुळातील कोणत्याही शब्दासाठी नाहीत. तेव्हा नामामधील ‘वत्थविहि' ही कला ‘वत्थुविहि' अशी घेऊन, बार्नेटने हा अर्थ दिला की Rules of Besmearing असे त्याला म्हणावयाचे होते, हे काही सांगता येत नाही. वर उल्लेखिलेले सर्व अर्थ नेहमीच योग्य वाटत नाहीत, तसेच त्यांमध्ये सर्व १०६ कलांचा अर्थ आलेला नाही. म्हणून प्रस्तुत लेखात असे केले आहे :- वरील सर्व अर्थ एकत्र करून दिले आहेत, त्यात काही ठिकाणी अधिक माहिती पूरक म्हणून जोडली आहे. काहींचे नवीन अर्थ सुचविले आहेत. आणि ज्या कलांचे अर्थ पूर्वी येऊन गेलेले नाहीत, त्यांचा अर्थ दिलेला आहे. ___कलांचे अर्थ देताना, पुढील पद्धत स्वीकारली आहे :- (१) इंग्रजी अर्थांचे मराठी रूपांतर केले आहे, व मूळ इंग्रजी शब्द टीपांत दिले आहेत. (२) बहुतेक ठिकाणी गुजराथी अर्थ तसाच दिला आहे, तो कळण्यास फारशी अडचण येत नाही. (३) अर्थ ज्यांनी दिले आहेत, त्यांची आद्याक्षरे त्या त्या अर्थांपुढे कंसात ठेवली आहेत. (४) पूर्णार्घ्य ग्रंथात वर्गीकरण करून जसे अर्थ दिले आहेत, तसेच ते योग्य तेथे टीपांत दिले आहेत.(५) वर ज्या क्रमाने कलांचे परिगणन केले आहे त्याच क्रमाने त्यांचा अर्थ दिला आहे. सर्व कलांचे अर्थ (१) चारही ग्रंथांत समान असणाऱ्या कला (१) लेह (लेख) :- लेखन (बा.वै.उ.गु.) निरनिराळ्या लिपीतील व पदार्थांवरील आणि विषयांवरील लेखन, असा अर्थ अभयदेव देतो. त्याला धरून पूर्णाऱ्यामध्ये अर्थ दिला आहे (पृ.७८५). स्वामी, सेवक, पिता इत्यादींना उद्देशून करावयाचे पत्रलेखन२ असाही अर्थ अभयदेव देतो. (२) गणिय (गणित) :- संख्यान (अ), अंकगणित (बा.वै.), अंकगणित, बीजगणित व रेखागणित (=भूमिति) (उ)-मोठ्या संख्यांचा गुणाकार इत्यादि क्रिया तोंडी वा झटपट करणे (आ). (३) रूव (रूप) :- सोंग घेणे.२ (बा.वै.), रंगविणे (वै), नाणी पाडण्याची वा द्रव्यविनिमयाची कला (वै), रूप बदलण्याची कला (उ.गु.), मूर्तिकला व चित्रकला ४ (पू)-येथे रूवचा नाटक असा अर्थ घेण्याचे कारण नाही, कारण तो अर्थ पुढील नट्ट'मध्ये येतो. (४) नट्ट (नाट्य), :- नृत्य (बा.वै.उ.), नाटक (गु), नाट्यकला (अ) नाट्यकलेत नृत्यकलासुद्धा येते असे अभयदेव म्हणतो. तेव्हा नट्ट म्हणजे नाट्यकला वा अभिनयकला आणि नृत्यकला. (कधी गीत, नृत्य आणि वादिन या तीहींना मिळून नाट्य ही संज्ञा दिली जाते. कलानां तिसृणामासां नाट्यमेकीक्रियोच्यते । (जैनांचे) पद्मपुराण, प्रथम भाग (पृ.४७९). हा अर्थ येथे अभिप्रेत नाही. कारण पुढे गीत व वादित्त या कला स्वतंत्रपणे सांगितल्या आहेत.) (५) गीय (गीत) :- गायन (बा.वै.उ.गु.), ताल, सूर, इत्यादि सांभाळून करावयाचे गायन. (६) वाइय (वादित, वादित्र) :- वाद्यसंगीत५ (वै.उ.), संगीत वाद्ये वाजविणे (बा.वै.गु.), वाद्यकला (अ) वाद्ये ही तत (उदा. वीणा) अवनद्ध (उदा. मृदंग), सुषिर (उदा.पोवा), आणि घन (उदा.टाळ) अशी चार प्रकारची मानली जातात. ती वाद्ये वाजविण्याची कला. Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ (७) सरगय-या शब्दाची संस्कृत छाया ‘स्वरगत' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- मौखिक संगीत १६ (वै), आवाजाने संगीत करणे (बा), संगीतातील स्वर ओळखणे (उ.गु.)-सरगय शब्दाची संस्कृत छाया 'शरगत’ आणि ‘स्मरगत' अशीही होते. शरगत म्हणजे बाणविद्या ही पुढे धनुर्वेद या नावाने येते. स्मर म्हणजे मदन, काम. तेव्हा स्मरगत म्हणजे कामकला, प्रेमकला, कामशास्त्र असा अर्थ होतो (आ). (८) पोक्खरगय (पुष्करगत) :- ड्रमने संगीत करणे (बा), ड्रम वाजविणे (वै), पुष्कर हे संगीताचे वाद्य वाजविणे (उ), वाजिव समारवानी कळा (गु). वाद्य ही कला मागे येऊन गेली आहे. तेव्हा पुष्कर वाद्याचे वादन असा अर्थ घेण्यात औचित्य वाटत नाही. म्हणून पुढील अर्थ योग्य वाटतो. पुष्कर म्हणजे पाणी (गीलको), मग पुष्करगत म्हणजे जलतरण, पोहण्याची कला (आ). (९) समताल (समताल) :- झांज/टाळ' यांचे संगीत (वै), झांज/टाळ८ वाजविणे (बा), संगीतातील१८ कालाचे नियमन (उ), समान ताल जाणण्याची कला (गु). मागे वाइय येऊन गेल्याने, झांज/टाळ वाजविणे ही कला स्वतंत्र सांगण्याची जरूरी दिसत नाही. त्यामुळे हाताच्या टाळीने ठेका देणे, अनेक वाद्यांचा समताल९ साधणे/ ओळखणे हा अर्थ बरा वाटतो. (१०) जूय (द्यूत) :- द्यूत (बा,वै,उ,गु) जुगार. (११) जणवाय :- या शब्दाची ‘जनवाद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- लोकांशी वा लोकांना आवडेल असे संभाषण (बा), समाजातील वक्तृत्व (वे), संभाषण (उ), लोकांबरोबर वादविवाद (गु). ही कला नाम, सम, औप आणि वैप/उपमध्ये आहे, पण राज/राय यांत ‘जणवय' असे आहे. शक्यता अशी वाटते की 'जणवय' हा मुद्रणदोष असावा. तथापि जणवय ही स्वतंत्र कला घेतल्यास काय अर्थ होईल हे पुढे सांगितले आहे. येथे जणवाय शब्दाची ‘जनव्रात' अशी संस्कृत छाया होऊ शकते ; त्याचा अर्थ जनसमूह. तेव्हा लोकसमूहावर नियंत्रण ठेवण्याची कला, लोकांचे नेतृत्व करण्याची कला असा अर्थ होतो (आ). (१२) अट्ठावय: - या शब्दाची ‘अष्टापद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- आठ चौरस२१ असणाऱ्या पटाचा खेळ (बा), आठ चौरसांचा खेळ१ (वै), बुद्धिबळाचा खेळ२९ (वै), आठ चौरस२१ असणारा फाशांचा पट (उ), सोंगट्यांचा पट२२ (चोपाट) (गु) - अट्ठावय शब्दाची संस्कृत छाया ‘अर्थपद' अशी होऊ शकते. त्या शब्दाचा अर्थ 'अर्थशास्त्र' होऊ शकतो. तेव्हा कौटिलीय अर्थशास्त्र सारख्या शब्दांत अर्थशास्त्र शब्दाचा जो अर्थ तोच अर्थ येथे आहे (आ). (१३) पोरेकच्च, पोक्खच्च :- पोरेकच्च हा शब्द नाया, वैप/उप, आणि औप यांत आहे. वैपमधील टीपांत 'पोरेकत्त' असाही शब्द दिलेला आहे. राज/रायच्या दोन पोथ्यांत पारेकव्व' असा शब्द आहे. सम.मध्ये पोक्खच्च असा शब्द आहे. आता, पारेकव्व आणि पोक्खच्च हे दोन्हीही शब्द पासममध्ये आढळत नाहीत. पुरस्कृत्य वा पौरस्कृत्य या संस्कृत शब्दांची वर्णान्तरे प्राकृतमध्ये पोरेकत्त, पोरेकच्च आणि पोक्खच्च अशी होऊ शकतात. म्हणून येथे पोरेकच्च व पोक्खच्च ही एकाच कलेची नावे मानलेली आहेत. 'पारेकव्व' हा शब्द मात्र लेखक-प्रमाद किंवा मुद्रणदोष असावा. पोरेकच्च शब्दाचे असे अर्थ दिलेले आहेत :- नगररक्षक२३ (बा), नगररक्षकाची२३ कर्तव्ये (?) (वै), नगररक्षणाचे२३ कर्तव्य अथवा नगररक्षक३-कर्तव्ये (उ), नगररक्षण (गु), या अर्थांमध्ये पौरकृत्य अशी संस्कृत छाया घेतलेली दिसते. परंतु ती घेऊनही पुढील अर्थ होऊ शकतो :- पौरकृत्य म्हणजे नागरिकांची कार्ये म्हणजे त्यांचे कज्जे, तक्रारी इत्यादि सोडविणे म्हणजे न्याय देण्याची कला असा अर्थ होतो (आ). पुरस्कृत्य अशी छाया घेतल्यास, सन्माननीय/माननीय व्यक्तीचा आदरसत्कार/मानसन्मान करण्याचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (१४) दगमट्टिया (उदकमृत्तिका) :- मातीबरोबर पाणी मिसळणे (बा,वै), पाणी व माती यांच्या गुणांची Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ चाचणी घेणे (उ), पाणी व माती यांच्या संयोगाने नवीन वस्तू बनविणे (गु) ; सजावट व निर्मितीच्या हेतूने पाण्यामध्ये मळलेल्या मातीच्या लगद्यापासून घर, मूर्ति, इत्यादि सुंदराकार वस्तू निर्माण करण्याची कला (पू).-येथे, पाण्यातून माती (=गाळ) बाजूला काढणे म्हणजे पाणी गाळण्याची (Filtering) कला, असाही अर्थ होऊ शकतो (आ). (१५) अन्नविहि (अन्नविधि) :- अन्नाचे नियम (बा,वै), अन्न घेण्याचे वा तयार करण्याचे नियम (उ), धान्य नीपजावनानी कळा (गु).-अन्न हे भक्ष्य, चोष्य, लेह्य व पेय असे चार प्रकारचे मानले जाते. त्यात कधी भोज्य हा प्रकार घालून अन्न हे पाच प्रकारचे मानले जाते. अन्न तयार करण्याची कला म्हणजे पाककला. याखेरीज भिन्न ऋतु आणि उपवासदिवस यावेळी कोणते अन्न कसे खावे याचे नियम (आ). (१६) पाणविहिः - या शब्दाची ‘पानविधि' अशी संस्कृत छाया घेऊन पुढे अर्थ दिले जातात :- पिण्याचे नियम२६ (बा,वै), पाणी पिणे अथवा२६ वापरणे यांचे नियम (उ), नवं (नवीन) पाणी उत्पन्न करवानी, संस्कारथी शुद्ध करवानी अने उनुं (=गरम) करवानी कळा (गु).-पान म्हणजे मद्यपान असाही अर्थ होतो. प्राचीन काळी मद्यपानाची प्रथा होतीच. तेव्हा पाणविहि म्हणजे मद्यपानाचे नियम (आ). खेरीज, पाणविहि शब्दाची ‘प्राणविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, देहातील प्राणक्रिया व्यवस्थित चालू ठेवण्याचे नियम असा अर्थ होतो (आ). (१७) वत्थविहि (वस्त्रविधि) :- पोशाखाचे नियम८ (वै), कपडे शिवणे, धुणे व अंगावर घालणे यांची कला२८ (उ),नवांवस्त्र बनाववानी, वस्त्र रंगवानी, वस्त्र शीववानी तथा पहेरवानी कळा (गु) ; विविध प्रकारची वस्त्रे विणण्याची व शिवण्याची कला (पू).-निरनिराळ्या प्रकारचे सूत काढून, विणून, रंगवून शिवणे आणि भिन्न ऋतु, प्रसंग इत्यादीमध्ये योग्य ती वस्त्रे वापरण्याची कला (आ). (१८) सयणविहि :- याची संस्कृत छाया ‘शयनविधि' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- शय्येचे नियम२९ (बा,वै), शय्या तयार करणे आणि वापरणे यांची कला (उ), शय्या बनाववानी, सुवानी युक्ति जाणवी विगेरेनी कळा (गु), शय्येची सजावट करण्याची कला (पू). भिन्न प्रकारच्या-पुष्पशय्या इत्यादि-शय्या तयार करणे, त्यांची सजावट करणे इत्यादि (आ). शयन म्हणजे निद्रा असाही अर्थ आहे. मग निद्रा आणण्याची कला असा अर्थ होईल (आ). तसेच, सयणविहि शब्दाची ‘सदनविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, घर सुशोभित करण्याची, घराची अंतर्बाह्य सजावट करण्याची कला, असा अर्थ होईल (आ). (१९) अज्जा (आर्या) :- आर्या छंदात रचना वा काव्यरचना (बा,वै,उ) ; संस्कृत तथा प्राकृत भाषांनी आर्या विगेरेना लक्षण जाणवा, बनाववानी कळा (गु). आर्या हे काव्यरचनेसाठीचे वृत्त आहे. (२०) पहेलिया (प्रहेलिका) :- कूट? (बा), कूटांची रचना (वै), कूटे३१ बनविणे आणि सोडविणे (उ), प्रहेलिका बांधवानी कळा (गु). प्रहेलिका हा चित्रकाव्याचा एक प्रकार आहे. त्यात दिलेल्या वर्णनावरून ते कशाचे वर्णन आहे हे शोधावयाचे असते. उदा. नरनारी समुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता । अमुखीकुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ।। (उत्तर-बोटांनी वाजविलेली चुटकी). (२१) मागहिया :- या शब्दाचा संबंध 'मगध' शब्दाशी जोडून पुढील अर्थ दिले जातात :- मागधी रचना (बा), मागधीची रचना३२ (वै), मागधी भाषेचे किंवा मगध देशाच्या इतिहासाचे ज्ञान (उ), मगध देशानी भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (ग). पासममध्ये 'मागहिआ' म्हणजे एक छंदविशेष असा अर्थ दिला आहे : तो घेतल्यास मागहिआ छंदातील काव्यरचना असा अर्थ होईल. खेरीज हा शब्द मागध (=भाट, स्तुतिपाठक) या शब्दापासूनही साधता येतो. मग, मागहिआ म्हणजे भाटांनी रचलेले स्तुतिगीत. व नंतर सामान्यपणे स्तुतिगीत वा स्तोत्र असा अर्थ होईल (आ). (२२) गाहा (गाथा) :- गाथा रचना२३ (बा), गाथेची रचना२३ (वै), गाथाछंदात काव्य रचना३ (उ), प्राकृत भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (गु). गाथा हा काव रचनेसाठीचा एक छंद आहे. (२३) सिलोग (श्लोक) :- श्लोक करणे३४ (बा). पद्यांची रचना३४ (वै). सामान्यपणे पद्ये करणे अथवा३४ अनुष्टुप् छंदात पद्ये करणे (उ), अनुष्टुप् श्लोक बनाववानी३५ कळा (गु), श्लोक म्हणजे सामान्यपणे पद्य अथवा Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ अनुष्टुप् छंदातील पद्य असा अर्थ आहे. श्लोक या शब्दाला म्हण किंवा वाक्प्रचार असा एक अर्थ आहे (गोलको), तो घेतल्यास म्हणी तयार करणे व त्यांचा अर्थ जाणून घेणे असा अर्थ होतो. तो अर्थ बरा वाटतो, कारण आत्तापर्यंत आर्या, गाथा या रचनांचा निर्देश झाला आहे (आ). (२४) आभरणविहि (आभरणविधि) :- अलंकाराचे नियम६ (बा,वै), आभूषण तयार करणे व वापरणे (उ.गु.), निरनिराळी-फूल इत्यादींची-आभरणे तयार करणे, माहीत असणे, व ती कशी कशी वापरावीत, यांचे ज्ञान म्हणजे आभरणविधि (आ). (२५) तरुणीपडिकम्म (तरुणीप्रतिकर्म) :- स्त्रियांची वेषभूषा (वा), तरुण कुमारीची वेषभूषा (वै), तरुण स्त्रियांचे प्रसाधन (उ), तरुणीनी सेवा८ (गु), तरुणीला स्नान घालणे, तिचे केस विंचरणे, केसांना सुगंधी धूर देणे, केसांची विविध रचना करणे, तिचे अन्य शरीरसंस्कार, वेषभूषा व अलंकारभूषा यांचा समावेश तरुणीपडियममध्ये होतो (आ). (२६-३६) इत्थिलक्खण (स्त्रीलक्षण), पुरिसलक्खण (पुरुषलक्षण) हयलक्खण (हयलक्षण), गयलक्खण (गजलक्षण), गोणलक्खण (गोलक्षण), कुक्कुडलक्खण (कुक्कुटलक्षण), छत्तलक्खण (छत्रलक्षण), दंडलक्खण (दंडलक्षण), असिलक्खण (असिलक्षण), मणिलक्खण (मणिलक्षण), कागिणिलक्खण (काकिनीलक्षण) :(२६-३६) या कलांमध्ये क्रमाने स्त्री, पुरुष, घोडा (हय), हत्ती (गय), गाय/बैल (गोण), कोंबडा (कुक्कुड), छत्री/छत्र (छत्त), दंड, तरवार (असि), मणि, आणि कागिणी नावाचे रत्न यांचे लक्षण जाणणे, अशा कला सांगितलेल्या आहेत. लक्षण म्हणजे खाणाखुणा (बा), खुणा व चिह्ने९ (वै,उ), गुण३९ (उ), लक्षण (गु), असे अर्थ दिलेले आहेत. तेव्हा, येथे सांगितलेले पदार्थ आणि प्राणी हे बरे-वाईट, सदोष-निर्दोष, शुभ-अशुभ इत्यादि आहेत. हे ओळखण्याच्या त्यांच्या ठिकाणच्या विशिष्ट खुणा, आकृति, चिह्न इत्यादि होत (आ). येथे, दंड म्हणजे शस्त्र म्हणून वापरावयाची काठी, सोटा, गदा (उ), असा अर्थ दिलेला आहे. साधा दांडका वा दंडुका असाही अर्थ होईल (आ). कागिणि हे एक प्रकारचे १ रत्न आहे. ___ (३७) नगरमाण (नगरमान) :- नगराचे मोजमाप (बा), नगरींची यो जना वा आखणी (वै), नगरयोजना (वै), नगरयोजना (उ), नवूनगर वसाववानुं प्रमाण विगेरे (गु). नवीन नगर वसविताना अथवा जुन्या नगरीला जोडून नवीन नगर वसविताना करावयाची मोजणी, आखणी योजना इत्यादि. (३८) वूह (व्यूह) :- सैन्याची विशिष्ट रचना२ (बा), सैन्याची विशिष्ट २ उडती/हलती रचना (वै), सैन्याची मांडणी (उ) व्यूह युद्धनी रचना (गु). संचलन वा युद्ध यांसाठी करावयाची सैन्याची विशिष्ट रचना अथवा मांडणी. __ (३९) पडिवूह (प्रतिव्यूह) :- (समोरील सैन्याच्या") विरोधी अशी सैन्याची विशिष्ट रचना (बा), सैन्याची विशिष्ट (विरूद्ध) उडती/हलती रचना (वै), (प्रतिपक्षाच्या सैन्या-)विरुद्ध सैन्याची मांडणी (उ), सामावाळाला (=समोरील) सैन्य सन्मुख स्वसैन्य राखवानी कळा (गु), प्रतिपक्ष वा शत्रु समोर असताना, स्वसंरक्षण करण्यास अथवा शत्रूला शह देण्यास, त्याला विरोधी होईल, अशी सैन्याची विशिष्ट प्रकारची व्यवस्था, मांडणी किंवा रचना. (४०) चार (चार) :- (सैन्याची) उडती/हलती४५ मांडणी (बा), सैन्याची मांडणी (वै), सैन्यगणनेचा ६ अंदाज (उ), सैन्य चलाववानी कळा (गु). (४१) पडिचार (प्रतिचार) :- (सैन्याची) हलती प्रति-मांडणी (बा), प्रति ६–मांडणी (वै), सैन्य मांडणीची कला (उ), सैन्यने सामा सैन्यनी सन्मुख चलाववानी कळों (गु). चार आणि पडिचार म्हणजे सैन्याची हालचाल व शत्रूची चाल पाहून त्याविरुद्ध आपल्या सैन्याची हालचाल, हे अर्थ ठीक आहेत. तथापि येथे पुढील अर्थही लागू पडणारे आहेत :- चार म्हणजे हेर, गुप्तहेर. तेव्हा, चार म्हणजे पूर्व पहाणी वा पहाणी (Reconnaissance) वा हेरगिरि करण्याची कला. आणि मग प्रतिचार म्हणजे शत्रूच्या हेरगिरी विरुद्धची हेरगिरी, असा अर्थ होतो (आ). Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ (४२) जुद्ध (युद्ध) :- झगडा/मारामारी“ (बा, वै, उ), सामान्य युद्ध (गु). प्रत्यक्ष शत्रूबरोबर युद्ध, झगडा, मारामारी, हाणामारी तसेच स्वतंत्रपणे प्रतिपक्षाबरोबर करता येणारी लठ्ठालठ्ठी वा मारामारी. (४३) निजुद्ध (नियुद्ध) - जोराची मारामारी (बा, वै), जवळून केलेली, वैयक्तिक मारामारी (उ), विशेष युद्ध (गु). निजुद्ध म्हणजे कुस्ती अथवा मल्लयुद्ध. हाच अर्थ जैन वाङ्मयात अन्यत्रही सापडतो. उदा. आख्यानमणिकोश, श्लोक १६ - १७, पृ. २६१ (आ). (४४) जुद्धाइजुद्ध (युद्धातियुद्ध) :- उच्च ५० मारामारी (बा, वै), भयंकर " मारामारी ( उ ), अत्यंत विशेष युद्ध ५१ (गु). (४५) मुट्ठिजुद्ध (मुष्टियुद्ध) • मुष्टि वापरून केलेली हाणामारी. (४६) बाहुजुद्ध (बाहुयुद्ध) :- कुस्ती ५२ (बा, वै), हातघाईची लढाई (उ), हातांचा वापर करून केलेली हाणामारी. (४७) ईसत्थ :- या शब्दाची 'इषु-अस्त्र' अशी संस्कृत छाया घेऊन, बाण सोडणे (बा, वै), धनुष्यबाणाचे शास्त्र (उ), असे अर्थ दिलेले आहेत. या शब्दाची 'ईषदर्थ' अशी संस्कृत छाया घेऊन, 'थोडाने घणुं अने घ थोडुं देखाडवानी कळा' (गु). असा अर्थ केलेला आहे. येथे, ईसत्थ शब्दात पहिला शब्द ईस (देशी) = खुंटा, खिळा, ईश=ईश्वर, आणि ईसा = नांगराचे एक काष्ठ आणि दुसरा शब्द शास्त्र किंवा अस्त्र, हे शब्द घेता येतात. त्यानुसार पुढील अर्थ होतात. खिळा Dart, तो फुंकून वा अन्य प्रकाराने मारण्याची कला, ईश्वराचे शास्त्र म्हणजे ईश्वरवादाचे ज्ञान, नांगराचे काष्ठ यावरून नांगरण्याची कला. एक नक्की की येथे 'बाण सोडणे वा धनुष्यबाणाचे शास्त्र' हे अर्थ घेता येणार नाहीत, कारण पुढे धनुर्वेद ही स्वतंत्र कला आली आहे (आ). (४८) छरुप्पवाय ( त्सरुप्रवाद) :- खड्ग पेलणे४/चालविणे (बा, वै), खड्गयुद्ध ४ ( उ ), खड्गनी मूठ बनावना विगेरेनी कळा (गु). त्सरु म्हणजे तरवार वा अन्य शस्त्र यांची मूठ असा अर्थ आहे. मग मूठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होतो (आ). येथे 'छरुप्पवाह' असाही पाठभेद आढळतो. प्रवाह म्हणजे 'उत्तम घोडा' असा अर्थ आहे (गीलको) तेव्हा छरुप्पवाह म्हणजे घोड्यावर बसून मूठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होईल (आ). (४९) धणुव्वेय (धनुर्वेद) धनुष्यविद्या ५५ (बा), धनुष्यबाणाचे ५ शास्त्र (वै), धनुष्यबाणशास्त्रावरील ५५ (वेद) ग्रंथ ( उ ), धनुष्यबाणनी ५६ कळा (गु). (५०) हिरण्णपाग (हिरण्यपाक ) :- अघडीव सोने मुशीत घालणे" (बा, वै), रुपे वितळविणे" (उ), रुपानो पाक बनाववानी कळा (गु). (५१) सुवण्णपाग (सुवर्णपाक) :- घडीव सोने मुशीत“ घालणे (बा, वै), सोने" वितळविणे (उ), सुवर्णनो पाक बनाववानी कळा (गु). येथे हिरण्ण आणि सुवण्ण असे स्वतंत्र शब्द वापरले असल्याने, त्यांचे भिन्न अर्थ घेणे आवश्यक ठरते. म्हणून हिरण्ण म्हणजे अघडीव सोने, रुपे, अथवा अन्य मौल्यवान् धातु, आणि सुवर्ण म्हणजे घडीव सोने असे अर्थ घ्यावे लागतात. : (५२) वट्टखेड :- या शब्दाची 'वृत्तक्रीडा' अशी संस्कृत छाया घेऊन, पुढील अर्थ दिलेले दिसतात. गोळ्यांशी खेळ (बा), गोट्यांशी खेळ" (वै), चेंडूंशी खेळ" (उ) येथे वृत्त म्हणजे गोलपदार्थ असा अर्थ आहे. गुजराती भाषांतरात 'क्षेत्र खंडवानी (= नांगरण्याची) कला' असा अर्थ आहे. आता वट्ट म्हणजे कासव (पासम) हा अर्थ घेतल्यास, ‘कासवांशी खेळ' असा अर्थ होईल (आ). वट्टखेड शब्दाची 'वर्त्मक्रीडा' अशीही संस्कृत छाया होते. मग, रस्त्यावर करावयाचा अथवा दाखवावयाचा खेळ, असा अर्थ होईल (आ). (५३) नालियाखेड :- या शब्दाची 'नालिका - क्रीडा' अशी संस्कृत छाया घेऊन, पुढील अर्थ दिले जातात :- कमळांच्या° देठांशी खेळ (बा, वै), कमळांचे देठ कापणे, कमळाच्या देठापासून बनविलेले वा कमळाच्या Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ देठाचा आकार असणारे वाद्य वाजविणे, एक प्रकारचे द्यूत (उ), कमळना नाळ छेदवानी कळा (गु). नाली म्हणजे तालवाद्य असा अर्थ आहे (गीलको), पण मागे ‘वाइय' येऊन गेले असल्याने, तो अर्थ येथे घेण्याचे कारण नाही. नालीक म्हणजे भाला (गीलको), आणि ‘णालिआ' म्हणजे आपल्या शरीरापेक्षा चार बोटे लांब काठी (पासम), असे अर्थ आहेत. हे दोन अर्थ लक्षात घेऊन, नालियाखेडचे पुढील अर्थ होतात. भाल्याचा खेळ, भाला फेकण्याचा खेळ ; लहान भाल्याच्या टोकाला दोरी बांधून कसरत दाखविण्याचा खेळ ; बोथाटीचा खेळ. तसेच, नालिया शब्दाची संस्कृत छाया 'नाडिका' अशीही होते. नाडिका म्हणजे हातचलाखी, शरीरातील नाडी (आपटे कोश), असा अर्थ आहे. त्याला धरून, हातचलाखीचा खेळ, अथवा शरीरातील विशिष्ट नाड्या दाबण्याची कला, असेही अर्थ होतात (आ). (५४) पत्तच्छेज्ज (पत्रच्छेद्य) :- पानांवरील कोरीव काम (बा), पानांप्रमाणे आकृत्या६१ काढणे (वै), बाणाने झाडांवरील१ पानांचा वेध करणे (उ), पत्र छेदवानी कळा (गु)-पत्र म्हणजे झाडाचे पान तसेच धातु इत्यादीचा पत्रा असाही अर्थ आहे. ते लक्षात घेतल्यास पुढील अर्थ होतात. पाने इत्यादी कापून वेगळ्या आकृत्या तयार करणे, वस्त्र इत्यादीवर विविध पानांच्या आकृत्या काढणे ; धातूंचे पत्रे कापणे ; तसेच धातु इत्यादींच्या पत्र्यांवर काम करणे (आ). (५५) कडच्छेज्ज/कडगच्छेज्ज (कट-/कटक-च्छेद्य) :- बांगड्यांवर५२/कांकणावर कोरीव काम करणे (बा), वर्तुळाकार आकृति काढणे (वे), बांगडीतून/कंकणातून/कड्यामधून बाण सोडणे (3), कडा, १२चूडी, कुंडळ छेदवानी कळा (गु).-कट म्हणजे गवत, बांबूचा पदार्थ, फळी/तक्ता असे अर्थ आहेत (गीलको). कड म्हणजे तासलेले लाकूड, पर्वताचा एक भाग, आणि कडा, असे अर्थ आहेत (पासम). यांना अनुसरून पुढील अर्थ होतात :- गवत कापणे, बांबू छिलणे, फळ्या कापणे, लाकूड तासणे, पर्वताचा एकादा भाग फोडणे. (पर्वताच्या कड्यावर चढणे-उतरणे हा अर्थ होईल काय ?) (आ). (५६) सज्जीव (सजीव) :- जीवन६४ देणे (बा,वै), मृत माणसांना जिवंत करण्याच्या मंत्रांचे ज्ञान (उ), मरेलाने (मूर्छा पासेलाने) मंत्रादिक वडे जीवतो करवानी कळा (गु).-बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्याची कला. (शरण आलेल्याला जीवदान देणे असा अर्थ होईल काय ? (आ)). (५७) निज्जीव (निर्जीव) :- जीवित५ घेणे (बा), जीवित५ काढून घेणे (वै), सोन्यासारख्या धातूंना औषध या स्वरूपात वापरण्यास योग्य करण्याची कला (उ), जीवताने मंत्रादिक वडे मरेला जेबो करवानी कळा (गु).-येथे निर्जीव हा शब्द बेशुद्धी व मरण या दोन अर्थांनी घेता येईल. मरण हा अर्थ घेतल्यास :- शिरच्छेद, फास, सूळ, जाळणे, बुडविणे, तरवार/भाला खुपसणे, गदा इत्यादींनी मस्तक फोडणे, गळा दाबणे, नाकतोंड दाबो इत्यादींनी जीव घेणे. बेशुद्धी असा अर्थ घेतल्यास :- पीडा/मार, मोहिनी विद्या, मंत्र, औषध इत्यादींनी बेशुद्ध करणे (आ). (५८) सउणरुय (शकुन रुत) पक्ष्यांचे ओरडणे (बा), पक्ष्यांचे आवाज (वै), भिन्न भिन्न पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची कला (उ), कागडा, घुबड, विगेरे पक्षीओना शब्द जाणवानी कळा (गु).-तसेच, निरनिराळ्या पक्ष्यांप्रमाणे स्वत:च्या तोंडातून आवाज काढण्याची कला (आ). (२) तीन ग्रंथांत समान असणाऱ्या कला (अ) नाया, राम, औप यांत समान असणाऱ्या कला : १. पासय (पाशक) :- फाशांनी खेळणे (बा,वै,उ,गु). याच्या जोडीने फास किंवा जाळे तयार करण्याची अथवा फाशी देण्याची कला, असा अर्थ घेता येतो (आ). २. विलेवणविहि विलेपनविधि :- सुगंधी पेस्टचे नियम (वै), विलेपनाची कळा (उ), विलेपननी वस्तु जाणवी, तैयार करवी चोळवी विगेरेनी कळा (गु).-सुवासिक वा औषधी विलेपने तयार करणे आणि वापरणे Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ (आ). ३. गीइया (गीतिका) :- पोवाडा६८ करणे (बा), भावगीते व पोवाडे यांची रचना (वै), गीति वृत्तात गाणी वा काव्य८ यांची रचना (उ), गीत बनाववानी कळा (गु)-गीति नामक वृत्तात पद्ये करणे वा गीते रचणे. ४. हिरण्णजुत्ति (हिरण्ययुक्ति) :- अघडीव सोने करण्याचा६९ उपाय (बा), अघडीव सोन्याचा शोध व काम (वै), रुपे वा अन्य मौल्यवान् धातु यांची चाचणी (उ) सुवण नq बनावउं तेना अलंकार विगेरे बनाववा तथा पहेरवा विगेरेनी कळा (गु). ५. सुवण्णजुत्ति (सुवर्णयुक्ति) :- घडीव सोने करण्याचा उपाय (बा), घडीव सोन्याचा शोध व काम (वै), सोन्याची शुद्धी आणि चाचणी०० (उ), रुघु नवु बनावउं तेना अलंकार विगेरे बनाववा तथा पहेरवा विगेरेनी कळा (गु). मागे पाहिल्याप्रमाणे, हिरण्य म्हणजे रुपे वा अन्य मौल्यवान् धातू. सुवर्ण म्हणजे सोने. सोने, रुपे आणि अन्य मौल्यवान् धातू असणारी खनिजे शोधणे, त्यातून धातू वेगळा काढणे, तो शुद्ध करून त्याचा, पत्रा, तार इत्यादि बनविणे, आवश्यकतेनुसार त्यांना छिद्रे पाडणे, त्यांचा कस ओळखणे, इत्यादि कला. खेरीज, युक्ती म्हणजे मिश्रण असाही अर्थ आहे (गीलको), त्यानुसार निरनिराळ्या धातूंच्या मिश्रणाने मिश्र धातू सिद्ध करणे, असाही अर्थ होतो (आ). ६. चुण्णजुत्ति (चूर्ण युक्ति) :- सुगंध आणि चूर्णे (बा), चूर्णाचा वापर (वै), पूड वा चूर्ण तयार करणे (उ) गुलाल अबील विगेरे चूर्ण बनाववानी तथा तेनो उपयोग करवानी कळा (गु) :-सुगंधी तसेच औषधी आणि खाण्यास योग्य अप डी) तयार करणे (आ). ७. वत्थुविज्जा (वास्तुविद्या) :- बांधणीची विद्या (बा), बांधणीचे शास्त्र (वै), वास्तुविद्या (उ), घर, दुकान विगेरेवास्तूशास्त्रनी विद्या (गु).-येथे वत्थुविज्जा शब्दाची संस्कृत छाया वस्तुविद्या' अशीही होते ; त्यमुसार पदार्थविज्ञानशास्त्र असा अर्थ होईल (आ). (८-९) चक्कवूह (चक्रव्यूह),ग़रुलवूह-गरुड्यूह) :- चक्र व गरुड यांच्या आकाराप्रमाणे सैन्याची मांडणी करणे. (१०) सगडवूह (शकटव्यूह) :- पाचरीप्रमाणे असणारी सैन्याची मांडणी (उ). पण शकटाच्या आकाराची सैन्याची मांडणी हा शब्दश: अर्थ आहे. काही व्यूहांच्या माहितीसाठी मनुस्मृति ७.१८७-१८८ वरील कुल्लूक इत्यादींची स्पष्टीकरणे पहावीत. (११) लयाजुद्ध (लतायुद्ध) :- शाखायुद्ध ५ (बा), वेत-युद्ध (वै), चाबकाने केलेले युद्ध (उ), लता वडे युद्ध (गु).-लता या शब्दाचे अर्थ चाबूक (आपटेकोश), यष्टि, छडी (पासम) असे आहेत. तेव्हा चाबकाने अथवा छडीने केलेली मारामारी असा अर्थ होतो. 'सो...दारगं लयाए हंतुं पयत्तो' (वसुदेवहिंडि, पृ.७५) मध्ये लता म्हणजे छडी असा अर्थ आहे. तसेच, समवायांगसूत्रात ‘दंडजुद्ध' हा शब्द आहे (आ). शी चणे-प जानाशपायजा - 1 (आ) नाया, सम, राय या तीन ग्रंथांतील समान कला (१) अट्ठिजुद्ध :- हा शब्द 'अस्थियुद्ध' असा घेऊन, अस्थियुद्ध ६ (बा,वै), हाडापासून बनवलेल्या शस्त्रांनी युद्ध (उ) ; अस्थि (अथवा) यष्टि वडे युद्ध (गु), असे अर्थ दिले जातात. अट्टि म्हणजे ज्यात बिया झालेल्या नाहीत अशी फळे असाही अर्थ आहे (पासम) मग, अशी हिरवी कठिण फळे फेकून केलेली मारामारी असा अर्थ होईल. अट्ठिजुद्ध हा शब्द ‘अट्ठिय-जुद्ध' असाही घेता येतो. मग एके ठिकाणी स्थिर न रहाता (अट्टिय=अ-स्थित) केलेले युद्ध, असा अर्थ होतो (आ). (२) सुत्तखेड (सूत्रक्रीडा) :- धाग्यांशी/सुतांशी खेळ (बा,वै) दोरांशी खेळ (उ), सुतर (सरळ)७८ छेदवानी कळा (गु)).-सूत वापरून भरतकाम/कशिदा करणे, लोकरीच्या धाग्यांनी हाताने विणकाम करणे, दोरीने Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ आणि दोरीवरून उड्या मारणे हा खेळ, ताणलेल्या दोरावरून चालणे, उभ्या दोरावर हाताच्या उपयोगाने चढणे आणि उतरणे, दोऱ्यांनी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणे, हेही अर्थ होतात (आ). (इ) सम, राय, व औप या तिन्हीतील समान कला (१) चक्कलक्खण (चक्रलक्षण) :- मागे लक्षण' चा अर्थ आलेला आहे. चक्र म्हणजे चाक. हे चाक रथ, गाडी, कुंभार, पवनचक्की इत्यादींचे असू शकेल. तसेच, चक्र हे फेकून मारण्याचे एक शस्त्रही होते (आ). (२) मणिपाग (मणिपाक) :- मागे 'पाक' शब्दाचा अर्थ येऊन गेला आहे. त्याला धरून, वाटोळा पदार्थ (मणि) तयार करण्यास काचेसारखी वस्तू वितळविणे असा अर्थ होईल. मणि म्हणजे रत्न, मोती, स्फटिक, लोहचुंक, काच इत्यादींचा वाटोळा पदार्थ असे अर्थ आहेत (गीलको) ; आणि पाक म्हणजे पक्वता, पक्ति, पूर्णता असाही अर्थ आहे. मग रत्नमणि इत्यादींना पूर्णता आणणे असा अर्थ होईल (आ). (३) धातुपाग (धातुपाक) :- धातू म्हणजे खनिज धातू (गीलको), शिसे, जस्त हे धातू (पासम), असे अर्थ आहेत. खनिजे व शिसासारखे धातू वितळविणे, ते शुद्ध करणे व त्यांच्या वस्तू तयार करणे असा अर्थ होतो. (आ). (ई) नाया, सम, औप या तिन्हीतील समान कला (१) खंधावारमाण (स्कंधावार-मान) :- शिबिराचे मोजमाप (बा), सैन्यना पडावनु प्रमाण विगेरे (गु).-जवळ पाणवठा इत्यादि तसेच सुरक्षित जागा पाहून, सैन्याच्या संख्येप्रमाणे छावणीची आखणी करणे (आ). (३) दोन ग्रंथांत समान असणाऱ्या कला सम आणि औप या दोहोंतील समान कला (१) गंधजुत्ति (गंधयुक्ति) :- ही विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्यांच्या रासायनिक संयोगापासून नवनवीन सुगंधी द्रव्य निर्माण करण्याची कला आहे (पू). गंध म्हणजे सुगंधी पदार्थ. निरनिराळी अत्तरे, सुगंधी तेले, उटणी इत्यादि तयार करण्याची युक्ति वा कौशल्य (आ). (२) चम्मलक्खण (चर्मलक्षण) :- लक्षणचा अर्थ मागे आला आहे. चर्म म्हणजे कातडे अथवा ढाल (आ). __ (३)-(५) खंधावारनिवेस/खंधावारनिवेसण (स्कंधावारनिवेश/स्कंधावारनिवेशन), वत्थुनिवेस/वत्थुनिवेसण (वस्तु-वास्तु-निवेश/निवेशन), नगरनिवेस/नगरनिवेसण (नगरनिवेश/नगरनिवेशन) :- निवेश आणि निवेशन हे शब्द समानार्थी आहेत. निवेश म्हणजे वसविणे, स्थापना. स्कंधावार म्हणजे छावणी, शिबिर, वस्तु म्हणजे एखादा पदार्थ, वास्तु म्हणजे इमारत इत्यादि. नगर म्हणजे शहर. तेव्हा, आराखडा अथवा आखणी करून सैन्यासाठी वा प्रवाशांसाठी छावणी ठोकणे, इमारतींची बांधणी करणे, नगर वसविणे असे अर्थ होतात. वस्तु म्हणजे कट्टा, पार, समाधि, स्तंभ यांसारखा पदार्थ बांधणे वा स्थापन करणे (आ). (४) एका ग्रंथातील कला (क) राय/राजमधील कला (१) णिद्दाइय (णिद्दाइया) (निद्रायित) :- निद्रा म्हणजे झोप. हवे त्यावेळेस वाटेल त्या ठिकाणी झोपी जाणे, झोप सावध ठेवणे, इतरांना झोप आणणे (आ). येथे, णिद्दा/णिद्दाया असा देशी शब्द मूळ घेतल्यास, त्याचा अर्थ 'विशिष्ट वेदना' (पासम) आहे. मग, स्वत:मध्ये अथवा इतरांमध्ये विशिष्ट वेदना निर्माण करणे, असा अर्थ होईल (आ). (२) माणवार :- या राय/राज ग्रंथात ‘खंधवार माणवार' असे शब्द क्रमाने येतात. आता, खंधवार शब्दाला Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ जोडून पुढील 'माण' घेतला, तर नाया, सम, औप यांमध्ये असणाऱ्या खंधावारमाणप्रमाणे, येथेही खंधावारमाण ही कला होते. ‘माणवार’ मधील 'माण' हा 'खंधावार'ला जोडून घेतल्यावर उरतो 'वार' शब्द. हा शब्द 'चार' शब्दाऐवजी लेखकाचा प्रमाद असावा. आणि तेथे 'चार' घेतल्यास, सध्याच्या राज / रायमध्ये न येणारी 'चार' ही कला आपोआपच येते (आ). माणवार असा स्वतंत्र शब्द पासममध्ये नोंदलेला नाही. त्याचा नक्की अर्थ काय असावा हे सांगता येत नाही. माण म्हणजे मन. माण शब्दाने चार प्रकारच्या मोजण्या सूचित होतात :- प्रस्थ, इत्यादि मापांनी मोजणे (मेयमान), हात इत्यादींनी मोजणे (देश - मान), शेर इत्यादि वजनांनी मोजणे ( तुलामान), आणि घटियंत्र इत्यादीवरून काल मोजणे (काल-मान). वार म्हणजे कुंभ, घडा (पासम). हे अर्थ घेऊन 'माणवार'चा अर्थ काय करायचा अस प्रश्न पडतो. आता, वार म्हणजे वासर आणि मान म्हणजे कालमान असे घेतल्यास, दिवस इत्यादि मोजणे असा काही तरी अर्थ होईल (आ). तथापि माणवार ही स्वतंत्र कला न घेता, वर सुचविल्याप्रमाणे खंधावारमाण व चार असे घेणे योग्य वाटते (आ). (३) जुद्धजुद्ध (युद्धयुद्ध) : - मागे आलेल्या 'जुद्धाजुद्ध' ऐवजी जुद्धजुद्ध हा लेखक-प्रमाद असावा. आणि तसे मानले नाही तरी जुद्धजुद्ध म्हणजे जोरदार युद्ध असा अर्थ होईल (आ). ८२ (४) खंधवार (स्कंधावार) :- ही कला वैप आणि उप मध्ये आहे. शिबिराची योजना २ (वै), छावणी ठोकण्याची योजना‘९ (3) . - सैन्याची छावणी, शिबिर वा तळ आखणे व ठोकणे (आ). (५) जणवय :- हा शब्द मागे आलेल्या 'जणवाय' ऐवजी लेखकदोष अथवा मुद्रणदोष असावा. तसे मानले नाही तर या शब्दाचा अर्थ असा होईल :- जणवय म्हणजे जनपद जनपद म्हणजे राष्ट्र, जमात, ग्रामीण भाग, जनता/प्रजा असे अर्थ आहेत (आपटे कोश ). मग, राष्ट्रात तसेच प्रजेत काय चालले आहे हे जाणून घेणे असा होईल. खेरीज, जणवय शब्दाच्या जन- वचस्, जन - वयस्, जनव्रत, आणि जनव्रज अशाही संस्कृत छाया होतात. त्यानुसार लोकसमूह काय बोलतो ; प्रजेचा आचार-विचार कसा आहे, जनतेतील वयोगट कसे आहेत हे जाणून घेणे. तसेच लोकसमूहावर नियंत्रण ठेवणे, त्याला अनुकूल करून घेणे, असाही अर्थ होतो (आ). (ख) औपमधील कला (१) संभव :- या शब्दाचे उत्पत्ति, शक्यता, ऐश्वर्य, परिचय, तुल्य प्रमापता इत्यादि अर्थ आहेत. ( गीलको) त्यातील ‘उत्पत्ति’ अर्थाला धरून 'प्रसूतिकर्म' करण्याची कला असा अर्थ होईल. 'शक्यता' या अर्थानुसार शक्यता वर्तविणे असा अर्थ होईल (आ). (२) मुत्ताखेड :- या शब्दाच्या संस्कृत छाया मुक्त-क्रीडा, मुक्तक क्रीडा, मूर्त-क्रीडा, आणि मुक्ताक्रीडा अशा होऊ शकतात. मुक्त म्हणजे आनंदित ( गीलको) मग आनंदाने / आनंदासाठी केलेली क्रीडा. मुक्तक म्हणजे फेकून मारण्याचे एक शस्त्र ( गीलको) मग गलोल, गोफण इत्यादि द्वारा फेकून मारण्याची क्रीडा. मूर्तक्रीडा म्हणजे (चारचौघात) उघडपणे / मोकळेपणाने करावयाची क्रीडा. मुक्ता म्हणजे मोती आणि वस्त्रविशेष ( गीलको) मग मोत्यांचा/मोत्यांशी खेळ, तसेच विशिष्ट प्रकारे हलवून वा फिरवून करावयाची क्रीडा (आ). मुत्ताखेड हा शब्द 'मुद्दा- खेड' (मुद्राक्रीडा) असा असण्याची शक्यता आहे. मुद्रा म्हणजे हातांचे/बोटांचे विशिष्ट आकार किंवा अवस्था, मग त्याद्वारे विशिष्ट सांकेतिक अर्थ प्रगट करण्याची कला असा अर्थ होईल (आ). (३) खुत्ताखेड :- कुत्त (देशी) म्हणजे कुतरा ( पासम). कुत्त चे वर्णान्तर खुत्त (जसे - कीलचे वर्णान्तर खील). मग कुत्र्याचे खेळ शिकणे, शिकवणे वा करून दाखविणे असा अर्थ होईल. खुत्त (देशी) म्हणजे पाण्यात बुडणे (पासम). मग पाण्यात बुडून राहण्याचा खेळ (आ). (येथे खत्तखेड आणि खित्त-खेड असे पाठ भेद घेता येतील. खत्त (देशी) म्हणजे खणणे ; मग विशिष्ट प्रकारचा वा प्रकाराने खड्डा खणण्याची क्रीडा (खित्तखेड्ड म्हणजे क्षेत्रक्रीडा म्हणजे मैदानी खेळ -आ). Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ येथे मुत्ताखेड्ड आणि खुत्ताखेड्ड हे स्वतंत्र शब्द कलासूचक मानून होणारे अर्थ वर दिले आहेत. तथापि हे दोनशब्द म्हणजे इतर ग्रंथात आढळणाऱ्या 'सुत्तखेड्ड' ऐवजी लेखनदोष असण्याची शक्यता वाटते. (ग) सममध्ये असणाऱ्या कला (१) मधुसित्थ (मधुसिक्थ) :- हा शब्द पूर्णाऱ्या मध्ये पृ.७८६ वर मधुसिक्भ असा मुद्रित आहे ; तो उघड उघड मुद्रणदोष आहे. मधुसिक्थ म्हणजे तळहात, पाय रंगविण्यासाठी लागणारी मेंदी तयार करण्याची कला' आहे (पू), हा अर्थ 'स्त्रियांच्या पायाला लावण्याची मेंदी वगैरे' या पासमने दिलेल्या अर्थाला धरून आहे. तसेच, महुसित्थ म्हणजे मेण (पासम) ; मग मेण व मेणाचे पदार्थ तयार करणे. खेरीज, मधुसिक्थक म्हणजे एक प्रकारचे विष (आपटेकोश) मग विष तयार करण्याची कला असा अर्थ होईल (आ). __ हा शब्द मधु आणि सित्थ असाही घेता येईल. मधु म्हणजे मध, मद्य, मेण, साखर, असे अर्थ आहेत (गीलको), आणि सिक्थ म्हणजे भाताचे शीत, घास (गीलको), धान्यकण, धनुष्याची दोरी (पासम) असे अर्थ आहेत. त्यानुसार धनुष्याच्या दोरीला मेणाची पुटे चढविणे, साखर घालून साखरभात करणे, धान्यापासून मद्य तयार करणे, असेही अर्थ होऊ शकतील (आ). (२) मिंढयलक्खण :- मिंढय म्हणजे मेंढा (मिंढय म्हणजे मेढ़क (=शिश्न) असाही अर्थ आहे). (३) चंदलक्खण (चंद्रलक्षण) :- चंद्र म्हणजे आकाशातील चंद्र, कापूर, पाणी, लाल मोती, छत, एलची असे अर्थ आहेत (गीलको). ___मागील मेंढयलक्खण'च्या साहचर्याने चंदलक्खण शब्द झाला असावा. पुढील (४)-(६) मधील कलांप्रमाणे येथे चंदचरिय' असे असण्याची शक्यता वाटते. तसे घेतल्यास चंद्राच्या गतीचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (४)-(६) सूरचरिय (सूर्यचरित) राहुचरिय (राहुचरित) गहचरिय (ग्रहचरित) :- सूर्य, राहू, व अन्य मंगळ, शनि इत्यादि ग्रहांच्या गती इत्यादींचे ज्ञान (आ). (७)-(८) सोभागकर (सौभाग्यकर), दोभागकर (दुर्भाग्यकर) :- बरे वाईट घडवून आणणाऱ्या शंख, रत्ने इत्यादि विशिष्ट वस्तूंचे ज्ञान किंवा मंत्र तंत्राचे ज्ञान (आ). (९) विज्जागय (विद्यागत) :- बहात्तर कलांच्या यादीत येणाऱ्या धनुर्विद्या इत्यादि सोडून, उरलेल्या करपल्लवी विद्या, योगविद्या इत्यादींचे ज्ञान असा अर्थ होईल (आ) येथे विज्जागम शब्दाची 'वैद्यगत' अशी संस्कृत छाया घेऊन वैद्याप्रमाणे औषधांचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (१०) मंतगय (मंत्रगत) :- बहात्तर कलांमधील काहींमध्ये मंत्राचे ज्ञान अपेक्षित आहे. ते सोडून गारूडमंत्र, वशीकरणमंत्र, इत्यादि मंत्रांचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (११) रहस्सगय (रहस्यगत) :- रहस्य म्हणजे गुप्त, झाकलेली गोष्ट. तेव्हा, आपले व दुसऱ्याचे रहस्य गुप्त ठेवणे, दुसऱ्यांची रहस्ये जाणून घेणे, झाकलेल्या गोष्टी ओळखणे, गुप्त गोष्टींचा अर्थ लावणे, गुप्त किंवासांकेतिक गोष्टी तयार करणे व इतरांच्या ओळखणे, असे अर्थ होतील (आ). (१२) सभासा :- या शब्दाच्या संस्कृत छाया समभासद, सभाष्यक, आणि स्वभाषा अशा होऊ शकतात. मग त्यांचे अर्थ असे :- सभेतील सदस्य या नात्याने काही गोष्टी गुप्त ठेवणे, विशिष्ट नियम पाळणे, नियमानुसर भाषण करणे, इत्यादींचे ज्ञान. स्पष्टीकरणात्मक भाष्यग्रंथांसह निवडलेल्या मूलभूत पुस्तकांचे अध्ययन करणे. स्व चे सर्वांगीण ज्ञान करून घेणे ; म्हणजे आपल्या भाषेचे उपभाषांसह तत्सदृश अन्य भाषांचे ज्ञान असणे. उदा. प्राकृतचे ज्ञान म्हणजे संस्कृतसह प्राकृत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भाषांचे ज्ञान होय (आ). (१३) वत्थुमाण (वस्तुमान, वास्तुमान) :- वस्तुमान म्हणजे वस्तूचे मोजमाप. वास्तुमान म्हणजे वास्तुविद्या अथवा सिद्ध असणाऱ्या वास्तूंचे मोजमाप काढता येणे (आ). (१४) दंडजुद्ध (दण्डयुद्ध) :- छडी, दंडुका, काठी, सोटा, गदा अशासारख्या वस्तूंनी केलेली हाणामारी Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ (आ). (१५)-(१६) आससिक्खा (अश्वशिक्षा), हत्थिसिक्खा (हस्तिशिक्षा) :- घोडे व हत्ती यांना नानाप्रकारचे प्रशिक्षण देणे (आ). (१७) धम्मखेड (धर्मक्रीडा) :- धर्म या शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. त्यांमध्ये धनुष्य असा एक अर्थ आहे (गीलको). तो घेतल्यास धनुष्यक्रीडा असा अर्थ होईल. पण सममध्ये मागे धणुव्वेय, इसत्थ या कल आलेल्या आहेत. त्यामुळे हा अर्थ येथे योग्य वाटत नाहीत. तेव्हा धर्म म्हणजे वरवरचे, दांभिक धर्माचरण असा अर्थ घेता येईल. मनुस्मृति ७.१५४ मध्ये राजाच्या पाच प्रकारच्या गुप्तहेरांचा निर्देश येतो. त्यात खोटेखोटे धर्माचरण करणारा 'तापस' हेर आहे. तो येथे अभिप्रेत असावा (आ). शक्यता अशी वाटते की येथे धर्मक्रीडा असा शब्द नसूम घर्मक्रीडा असा शब्द असावा. आता धर्म म्हणजे उन्हाळा, उष्णता, घाम, कढई असे अर्थ आहेत (गीलको). मग कढई वापरून खेळण्याचा खेळ, उन्हाळ्यात खेळावयाचे खेळ, उन्हात खेळावयाचे खेळ, घाम फोडणारे खेळ, असे अर्थ होऊ शकतील (आ). (१८) चम्मखेड (चर्मक्रीडा) :- चर्म म्हणजे चामडे, ढाल.८६ ज्यात कातडे अगर ढाल वापरले जाते असे ढाल-तरवार, वेतचर्म, इत्यादि खेळ असा अर्थ होईल (आ). अन्य कलांशी तुलना ___या लेखाच्या प्रारंभी कुवलयमाला ग्रंथातील तसेच हिंदु आणि बौद्ध कला यांचा उल्लेख केला होता. त्या कलांशी जैनागमग्रंथातील कलांची तुलना आता संक्षेपाने केली आहे. कुवलयमालातील व जैनागमातील कला कुवलयमाला व जैनागम यांमध्ये पुढील ८ कला समान आहेत : (१) गणिय (२) गंधजुत्ति (३) गयलक्खण (हत्थीणं लक्खणं) (४) जूय (५) धणुव्वेय (६) नट्ट (७) पत्तच्छेज्ज, आणि (८) हयलक्खण (तुरयाणं लक्खणं). खेरीज गीय आणि गंधव्व, वत्थविहि आणि वत्थकम्म, आणि सयणविहि आणि सयनसंविहाण या तीन कलांतही साम्य दिसते. हिंदु आणि बौद्धकला व जैनकला (१) हिंदु, बौद्ध आणि जैन ग्रंथांत सापडणाऱ्या कलांमध्ये, या तिघांना समान अशा पाच कला पुढीलप्रमाणे आहेत :- (१) गंधजुत्ति (२) गीय (३) नट्ट (४) पत्तच्छेज्ज (५) वाइय. (२) हिंदुकला व जैनकला यांत समान पुढील पाच कला आहेत :-(१) जुद्ध (२) जूय (३) पहेलिया (४) वत्थुविज्जा (५) सुत्तखेड.. खेरीज आभरणविहि आणि भूषणयोजन, सयणविहि आणि शयनरचना, नालियाखेड (हातचलाखी) व हस्तलाघव, या तीन हिंदू व जैनकलांत साम्य दिसते. (३) बौद्ध आणि जैनकलांत समान असणाऱ्या दहा कला पुढीलप्रमाणे आहेत :- (१) इत्थिलक्खण (२) ईसत्थ (३) गयलक्खण (४) गोणलक्खण (५) धणुव्वेय (६) पुरिसलक्खण (७) मिंढयलक्खण (अजलक्षण) (८) रूप (९) सउणरुयं (शकुनिरुत), आणि (१०) हयलक्खण (अश्वलक्षण). खेरीज जूय आणि अक्षक्रीडा, अट्ठावय (अर्थशास्त्र) आणि अर्थविद्या या दोन बौद्ध आणि जैनकलांत साधर्म्य आहे. Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ समारोप जैनागमातील वर उल्लेखिलेल्या कला मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि राजकीय जीवनाशी कमीजास्त प्रमाणात संबंधित असल्याने त्यावरून तत्कालीन सामाजिक जीवनाची थोडीफार कल्पना येऊ शकते. टीपा १. भासंको, खंड २, प्रथमावृत्ती, पुणे १९६४, पृ.१६१-१६२ ; श्रीमद्भागवत, भाग ७, प्र. यंदे मुंबई, १९२८, शेवटचे पृष्ठ ; लोकप्रभा साप्ताहिक, मुंबई, २७ नोव्हेंबर, १९७७, पृ.४४ २. ललितविस्तर, सं.डॉ.प.ल.वैद्य, दरभंगा १९५८, पृ.१०८ ३. या कलांच्या सूची स्थलाभावी दिल्या नाहीत. ४. भासंको, खंड २, प्रथमसवृत्ती, पुणे १९६४ ५. अभयदेव, समवायांगसूत्र मुद्रित पोथी, पृ.८३अ-८३ब ६. ही कला राज/राय पोथ्यांत नाही पण वैप आणि उप यांत आहे. ७. ही कला दोरा मध्ये नाही. ८. 'चार' ही कला राज/राय मध्ये नाही. ९. जुद्धाइजुद्ध हा सम च्या मुद्रित पोथीत मुद्रणदोष आहे. १०. चक्कलक्खण ही कला वैपमध्ये नाही. ११. निवेस आणि निवेसण या दोन शब्दांच्या अर्थांत फरक नसल्याने, या शब्दांनी बोधित होणारी कला एकच आहे. १२. लेखनं अक्षरविन्यासः । सलेखः द्विधा लिपिभेदात्... तथाविधविचित्र-उपाधि-भेदतः वा पत्र-वल्क-काष्ठ दन्त-लोह-ताम्र-रजतादयो अक्षराणां आधारः । विषयापेक्षया अपि अनेकधा स्वामिभृत्य-पितृ-पुत्रगुरूशिष्य-भार्या-पति-शत्रु-मित्रादीनां लेखविषयाणां अपि अनेकत्वात् । अभयदेव १३. Impersonation, painting, art of coinage or money changing art of changing appearances. १४. लेप्य-शिला-सुवर्ण-मणि वस्त्र, चित्तादिषु रूपनिर्माणम् अभयदेव. 84. Instrumental music, making music with instruments or playing upon musical instruments. १६. Vocal music, making music with voice. १७. Making music with the drum, playing upon drums. १८. Music of cymbals, making music with cymbals, regulating musical time. १९. नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत, पुष्करगत, समताल या सर्व कलांचा विषय संगीत आहे. (पू, पृ.७८६) २०. Popular conversation, public oratory. २१. Play of the eight-square board, play ofeight squares, board of chase, a dice-board having eight squares. डॉ. वैद्यांच्या भाषांतरातील chase ही चूक असून, तो शब्द chess असा हवा. २२. द्यूत, जनवाद, पोक्खच्च व अष्टापद ह्या कला द्यूतक्रीडेचे प्रकार होत (पू, पृ.७८६). येथे उल्लेखिलेली पोक्खच्च ही कला पृ.७८५ वरील कलांच्या यादीत दिलेली नाही हे लक्षात घ्यावे. तसेच, जणवाय आणि पोक्खच्च यांना द्यूतक्रीडेचे प्रकार' मानता येईल का हे शंकास्पद आहे. २३. City police, duties of city police (?), duty of protecting a city, police duties. २४. Mixing of water with clay, testing the qualities of water and soil. २५. Rules of food, rules of taking or preparing food. २६. Rules of drink, rules about drinking or using water. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ २७. अन्नविधी व पानविधी ह्या निरनिराळ्या प्रकारांचे खाद्य, स्वाद्य, लेह्य व पेय पदार्थ तयार करण्याच्या कला __ आहेत (पू, पृ.७८६). २८. Rules of dress,art of sewing, washing and putting on clothes. २९. Rules of bed, art of making and using a bed. 30. Arya verses, composition in arya metre. ३१. Riddling ; composition of riddles, making and solving riddles. ३२. Magadhi composition, composition of magadhi, knowledge of magadhi language or of the history of magadha country. 33. Gatha composition, composition of gatha, composing poetry in gatha metre. 38. Slolka-making, composition of verses, composing verses in general or verses in anushtup metre. ३५. आर्या, प्रहेलिका, मागधिका, गाथा व श्लोक या याच नावाच्या छंदांविषयी व काव्यरीतीसंबंधी रचनाविषयक कला आहेत (पू, पृ.७८६). ३६. Rules of ornament, making and putting on ornaments. ३७. Attiring of damsels, attiring of young maids, adorning young women. ३८. आभरणविधी व तरुणी प्रतिकर्म ह्या आभूषणे, अलंकार व तरुणीच्या अंतरंगांसंबंधीच्या कला आहेत (पू, पृ.७८६). येथे 'अंतरंगासंबंधीच्या' हा शब्द 'अलंकारासंबंधीच्या' या शब्दाऐवजी मुद्रण दोष असावा असे वाटते. ३९. Points, marks and signs; characteristics, qualities. ४०. Stick, club or mace used as weapon. ४१. स्त्रीलक्षण ते चर्मलक्षण पर्यंतच्या १४ कला स्त्री, पुरुष, व इतर वस्तू यांची शुभाशुभ लक्षणे जाणण्यासाठी व __ त्यांच्यातील गुणदोष ओळखण्यासाठी उपयोगी पडतात (पू, पृ.७८६). ४२. Measurement of cities, planning of cities, townplanning 83. Column, flying column, marshalling an army. 88. Counter-column, flying counter-column, arranging the army against an army. 84. Flying column, columns of army, estimating the strength of an army. ४६. Flying counter-column, counter-columns, art of arranging an army. ४७. चार, प्रतिचार, व्यूह व प्रतिव्यूह या चार संग्रामविद्या आहेत. आघाडीवर फौजेचा मोहरा बदलणे, शत्रु सैन्याचा हल्ला निष्फळ करण्यासाठी उपयुक्त अशी आपल्या सैन्याची रचना बदलणे, चक्रव्यूह पद्धतीने सैन्यरचना करणे, व शत्रुसैन्याची व्यूहरचना फोडण्यासाठी व्यवस्था करणे इत्यादि कलांचा यात समावेश होतो (पू, पृ.७८६). ४८. Fighting. ४९. Heavy fighting, close fight, personal struggle. ५०. Supreme fighting, fierce fighting. ५१. युद्ध, निर्युद्ध व जुद्दाइजुद्ध हे युद्धकलेचे प्रकार होत (पू, पृ.७८७) येथे जुद्दाइजुद्ध हा जुद्धाइजुद्ध ऐवजी मुद्रणदक्षे आहे. पूर्णार्घ्य पुढे सांगतो :- अश्वशिक्षा ते मुष्टियुद्ध कला होत्या (पृ.७८७). ५२. Wrestling, hand to hand fight. 43. Arrow-shooting, arrow-throwing, science of archery. 48. Wielding the sword, fencing. ५५. Lore of the bow, science of archery, the work (veda) on the science of archery. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६. ईसत्थ, छरुण्यवाय :- सुरी, कट्यार, खड्ग इत्यादि निर्मितीच्याही कला असत (पू, पृ.७८७) येथे छरुण्यवाय हा मुद्रणदोष आहे. ५७. Casting of unwrought gold, melting silver. ५८. Casting of wrought gold, melting gold. ५९. Play with cells, play with pebbles, play with balls. ६०. Play with lotus-stalks, cutting of lotuses, playing on a wind-instrument made of or having the shape of a lotus-stalk, or a kind of gambling. ६१. Engraving leaves, drawing leaf-like figures, piercing leaves of trees with an arrow. ६२. Engraving bracelets, drawing circular figures, discharging an arrow through a bracelet. ६३. पद्मच्छेद्य व कटकच्छेद्य :- पाने व गवत यांचा छेद करून त्यापासून सुंदर वस्तू बनविण्यासंबंधीच्या या कला होत्या (पू, पृ.७८७) येथे पत्रच्छेद्य ऐवजी पद्मच्छेद्य हा मुद्रणदोष आहे. ६४. Giving, life, knowledge of charms to revive dead persons. ६५. Taking life, taking away life, art of making metals (such as gold) fit to be used as medicines. ६६. Birds cries, cries of birds, art of recognising the notes of different birds. ६७. Rules of scented paste, art of anointing ६८. Ballad-making, compositions of lyrics or ballada, composing songs or poetry of giti metre. ६९. Means of preparing unwrought gold, metallurgy of unwrought gold, testing silver or any precious metal. ७०. Means of preparing wrought gold, metallurgy of wrought gold, testing and purifying gold. ७१. येथे गुजराती भाषांतरात हिरण्यसाठी सुवर्ण आणि सुवर्णसाठी 'रुपु' असे शब्द वापरले आहेत. पण मागीलप्रमाणे येथेही हिरण्यासाठी रुपु आणि सुवर्णसाठी सुवर्ण असे शब्द वापरावयास हवे होते. ७२. Perfumes and powders, use of powders, preparing powders. ७३. Lore of building, science of building, art of architecture. ७४. A form of military array resembling a wedge. ७५. Branch-fighting, cane-fighting, fighting with a whip. ७६. Bone-fighting, fighting with weapons made of bones. ७७. Play with threads, play with ropes. ७८. सूत्रक्रीडा, वृत्तक्रीडा, धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). ७९. Measurement of camps. ८०. स्कंधावारमान ते नगरनिवेश ह्या सहा कलांत सैन्याचा तळ उभारणे, त्यासाठी योग्य भूमी, (व) किल्ला इत्यादीसठि भूमी निश्चित करणे इत्यादींचा समावेश होतो (पू, पृ.७८७). ८१. युक्तिरेषा तु कौशलम् । रविषेणकृत पद्मपुराण, खंड १, पृ.४८. ८२. Planning of camps, planning of encampments. ८३. चंद्रलक्षण ते ग्रहचरित या चार कला ज्योतिषशास्त्रासंबंधीच्या आहेत (पू, पृ.७८६). ८४. सौभाग्यकर ते मंत्रगत या चार कला मंत्रतंत्रविषयक आहेत (पू, पृ.७८६). ८५. आससिक्खा ते मुष्टियुद्ध कला होत्या (पू, पृ.७८७). ८६. धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). ८७. प्रस्तुत लेखाचा विस्तार वाढेल या भीतीने या विषयाची चर्चा येथे केलेली नाही. Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ ग्रंथसूची १. औपपातिकसूत्र, अभयदेवसूरिकृत वृत्तिसह (मुद्रितपोथी), प्रकाशक-भुरालाल कालिदास, द्वितीय आवृत्ती, सुरत, वि.सं. १९९४ २. औपपातिकसूत्र, संपादक - एन्. जी. सुरू, पुणे १९३१ ३. कुवलयमाला, (उद्योतनकृत) सं . ए. एन्. उपाध्ये, मुंबई १९५९ ४. गीर्वाणलघुकोश, संपादक - ज. वि. ओक, पुणे, शके १८३७ ५. ज्ञाताधर्मकथांगसूत्र, प्रथम विभाग, (मुद्रित पोथी), गुजराती भाषांतरासह, भावनगर, ६. नायाधम्मकहाओ, संपादक - एन्. व्ही. वैद्य, पुणे १९४० ७. पएसिकहाणय, संपादक - डॉ.प.ल. वैद्य, पुणे १९३४ ८. पएसिकहाणय, संपादक - ए. टी. उपाध्ये, बेळगाव, १९३६ ९. पद्मपुराण (रविषेणकृत), प्रथमभाग, संपादक - पन्नालाल जैन, काशी, १९५८ १०. पाइद्यसद्दमहण्णव, संपादक-सेठ, कलकत्ता, संवत् १९८५ ११. पूर्णार्घ्य, संपादक-सुमतिबाई शहा, सोलापूर, वीरनिर्वाण संवत् २५०४ १२. राजप्रश्नीय, मलयगिरिकृत वृत्तिसह, (मुद्रित पोथी), अहमदाबाद, (प्रकाशन वर्ष दिले नाही). १३. रायपसेणइयसूत्र, संपादक- दोशी, मुद्रित पोथी, अहमदाबाद, वि.सं. १९९४ १४. ललितविस्तर, संपादक - डॉ.प.ल. वैद्य, दरभंगा, १९५८ १५. वसुदेवहिंडि (संघदासकृत), प्रथम खंड, भावनगर, १९३१ १६. समवायांगसूत्र, अभयदेवसूरिकृत विवरणासह, (मुद्रित पोथी) (प्रकाशनस्थळ व वर्ष देणारे पान उपलब्ध पोथीत फाटले होते). १७. संस्कृत-इंग्लिश-कोश, संपादक - व्ही. एस्. आपटे, दिल्ली १९५९ ल ल ल अ औ आपटेकोश उ उप औप गु ज्ञाना नाया प पासम पू बा राज राय संक्षेप अभयदेव, समवायांगसूत्रावरील वृत्ती • अभयदेवकृत वृत्तिसह औपपातिकसूत्र आपटे के.वा. आपटे व्ही.एस्. संपादित संस्कृत-इंग्लिश-कोश उपाध्ये ए.टी. उपाध्ये ए.टी. संपादित पएसिकहाणय • औपपातिकसूत्र - गुजराती भाषांतर, ज्ञानाधर्मकथांगसूत्राचे - ज्ञानाधर्मकथांगसूत्र नायाधम्मकहाओ - • पएसिकहाणय वि.सं. १९८५ - पाइय-सद्द - महण्णव - पूर्णार्ध्य बार्नेट - राजप्रश्नीय - रायपसेणइयसुत्त Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ - वैद्य प.ल. - वैद्य प.ल. संपादित पएसिकहाणय - समवायांगसूत्र - सुरु-संपादित औपपातिकसूत्र सम सुऔ **********