Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 18
________________ जोडून पुढील 'माण' घेतला, तर नाया, सम, औप यांमध्ये असणाऱ्या खंधावारमाणप्रमाणे, येथेही खंधावारमाण ही कला होते. ‘माणवार’ मधील 'माण' हा 'खंधावार'ला जोडून घेतल्यावर उरतो 'वार' शब्द. हा शब्द 'चार' शब्दाऐवजी लेखकाचा प्रमाद असावा. आणि तेथे 'चार' घेतल्यास, सध्याच्या राज / रायमध्ये न येणारी 'चार' ही कला आपोआपच येते (आ). माणवार असा स्वतंत्र शब्द पासममध्ये नोंदलेला नाही. त्याचा नक्की अर्थ काय असावा हे सांगता येत नाही. माण म्हणजे मन. माण शब्दाने चार प्रकारच्या मोजण्या सूचित होतात :- प्रस्थ, इत्यादि मापांनी मोजणे (मेयमान), हात इत्यादींनी मोजणे (देश - मान), शेर इत्यादि वजनांनी मोजणे ( तुलामान), आणि घटियंत्र इत्यादीवरून काल मोजणे (काल-मान). वार म्हणजे कुंभ, घडा (पासम). हे अर्थ घेऊन 'माणवार'चा अर्थ काय करायचा अस प्रश्न पडतो. आता, वार म्हणजे वासर आणि मान म्हणजे कालमान असे घेतल्यास, दिवस इत्यादि मोजणे असा काही तरी अर्थ होईल (आ). तथापि माणवार ही स्वतंत्र कला न घेता, वर सुचविल्याप्रमाणे खंधावारमाण व चार असे घेणे योग्य वाटते (आ). (३) जुद्धजुद्ध (युद्धयुद्ध) : - मागे आलेल्या 'जुद्धाजुद्ध' ऐवजी जुद्धजुद्ध हा लेखक-प्रमाद असावा. आणि तसे मानले नाही तरी जुद्धजुद्ध म्हणजे जोरदार युद्ध असा अर्थ होईल (आ). ८२ (४) खंधवार (स्कंधावार) :- ही कला वैप आणि उप मध्ये आहे. शिबिराची योजना २ (वै), छावणी ठोकण्याची योजना‘९ (3) . - सैन्याची छावणी, शिबिर वा तळ आखणे व ठोकणे (आ). (५) जणवय :- हा शब्द मागे आलेल्या 'जणवाय' ऐवजी लेखकदोष अथवा मुद्रणदोष असावा. तसे मानले नाही तर या शब्दाचा अर्थ असा होईल :- जणवय म्हणजे जनपद जनपद म्हणजे राष्ट्र, जमात, ग्रामीण भाग, जनता/प्रजा असे अर्थ आहेत (आपटे कोश ). मग, राष्ट्रात तसेच प्रजेत काय चालले आहे हे जाणून घेणे असा होईल. खेरीज, जणवय शब्दाच्या जन- वचस्, जन - वयस्, जनव्रत, आणि जनव्रज अशाही संस्कृत छाया होतात. त्यानुसार लोकसमूह काय बोलतो ; प्रजेचा आचार-विचार कसा आहे, जनतेतील वयोगट कसे आहेत हे जाणून घेणे. तसेच लोकसमूहावर नियंत्रण ठेवणे, त्याला अनुकूल करून घेणे, असाही अर्थ होतो (आ). (ख) औपमधील कला (१) संभव :- या शब्दाचे उत्पत्ति, शक्यता, ऐश्वर्य, परिचय, तुल्य प्रमापता इत्यादि अर्थ आहेत. ( गीलको) त्यातील ‘उत्पत्ति’ अर्थाला धरून 'प्रसूतिकर्म' करण्याची कला असा अर्थ होईल. 'शक्यता' या अर्थानुसार शक्यता वर्तविणे असा अर्थ होईल (आ). (२) मुत्ताखेड :- या शब्दाच्या संस्कृत छाया मुक्त-क्रीडा, मुक्तक क्रीडा, मूर्त-क्रीडा, आणि मुक्ताक्रीडा अशा होऊ शकतात. मुक्त म्हणजे आनंदित ( गीलको) मग आनंदाने / आनंदासाठी केलेली क्रीडा. मुक्तक म्हणजे फेकून मारण्याचे एक शस्त्र ( गीलको) मग गलोल, गोफण इत्यादि द्वारा फेकून मारण्याची क्रीडा. मूर्तक्रीडा म्हणजे (चारचौघात) उघडपणे / मोकळेपणाने करावयाची क्रीडा. मुक्ता म्हणजे मोती आणि वस्त्रविशेष ( गीलको) मग मोत्यांचा/मोत्यांशी खेळ, तसेच विशिष्ट प्रकारे हलवून वा फिरवून करावयाची क्रीडा (आ). मुत्ताखेड हा शब्द 'मुद्दा- खेड' (मुद्राक्रीडा) असा असण्याची शक्यता आहे. मुद्रा म्हणजे हातांचे/बोटांचे विशिष्ट आकार किंवा अवस्था, मग त्याद्वारे विशिष्ट सांकेतिक अर्थ प्रगट करण्याची कला असा अर्थ होईल (आ). (३) खुत्ताखेड :- कुत्त (देशी) म्हणजे कुतरा ( पासम). कुत्त चे वर्णान्तर खुत्त (जसे - कीलचे वर्णान्तर खील). मग कुत्र्याचे खेळ शिकणे, शिकवणे वा करून दाखविणे असा अर्थ होईल. खुत्त (देशी) म्हणजे पाण्यात बुडणे (पासम). मग पाण्यात बुडून राहण्याचा खेळ (आ). (येथे खत्तखेड आणि खित्त-खेड असे पाठ भेद घेता येतील. खत्त (देशी) म्हणजे खणणे ; मग विशिष्ट प्रकारचा वा प्रकाराने खड्डा खणण्याची क्रीडा (खित्तखेड्ड म्हणजे क्षेत्रक्रीडा म्हणजे मैदानी खेळ -आ).

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25