Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 20
________________ (आ). (१५)-(१६) आससिक्खा (अश्वशिक्षा), हत्थिसिक्खा (हस्तिशिक्षा) :- घोडे व हत्ती यांना नानाप्रकारचे प्रशिक्षण देणे (आ). (१७) धम्मखेड (धर्मक्रीडा) :- धर्म या शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. त्यांमध्ये धनुष्य असा एक अर्थ आहे (गीलको). तो घेतल्यास धनुष्यक्रीडा असा अर्थ होईल. पण सममध्ये मागे धणुव्वेय, इसत्थ या कल आलेल्या आहेत. त्यामुळे हा अर्थ येथे योग्य वाटत नाहीत. तेव्हा धर्म म्हणजे वरवरचे, दांभिक धर्माचरण असा अर्थ घेता येईल. मनुस्मृति ७.१५४ मध्ये राजाच्या पाच प्रकारच्या गुप्तहेरांचा निर्देश येतो. त्यात खोटेखोटे धर्माचरण करणारा 'तापस' हेर आहे. तो येथे अभिप्रेत असावा (आ). शक्यता अशी वाटते की येथे धर्मक्रीडा असा शब्द नसूम घर्मक्रीडा असा शब्द असावा. आता धर्म म्हणजे उन्हाळा, उष्णता, घाम, कढई असे अर्थ आहेत (गीलको). मग कढई वापरून खेळण्याचा खेळ, उन्हाळ्यात खेळावयाचे खेळ, उन्हात खेळावयाचे खेळ, घाम फोडणारे खेळ, असे अर्थ होऊ शकतील (आ). (१८) चम्मखेड (चर्मक्रीडा) :- चर्म म्हणजे चामडे, ढाल.८६ ज्यात कातडे अगर ढाल वापरले जाते असे ढाल-तरवार, वेतचर्म, इत्यादि खेळ असा अर्थ होईल (आ). अन्य कलांशी तुलना ___या लेखाच्या प्रारंभी कुवलयमाला ग्रंथातील तसेच हिंदु आणि बौद्ध कला यांचा उल्लेख केला होता. त्या कलांशी जैनागमग्रंथातील कलांची तुलना आता संक्षेपाने केली आहे. कुवलयमालातील व जैनागमातील कला कुवलयमाला व जैनागम यांमध्ये पुढील ८ कला समान आहेत : (१) गणिय (२) गंधजुत्ति (३) गयलक्खण (हत्थीणं लक्खणं) (४) जूय (५) धणुव्वेय (६) नट्ट (७) पत्तच्छेज्ज, आणि (८) हयलक्खण (तुरयाणं लक्खणं). खेरीज गीय आणि गंधव्व, वत्थविहि आणि वत्थकम्म, आणि सयणविहि आणि सयनसंविहाण या तीन कलांतही साम्य दिसते. हिंदु आणि बौद्धकला व जैनकला (१) हिंदु, बौद्ध आणि जैन ग्रंथांत सापडणाऱ्या कलांमध्ये, या तिघांना समान अशा पाच कला पुढीलप्रमाणे आहेत :- (१) गंधजुत्ति (२) गीय (३) नट्ट (४) पत्तच्छेज्ज (५) वाइय. (२) हिंदुकला व जैनकला यांत समान पुढील पाच कला आहेत :-(१) जुद्ध (२) जूय (३) पहेलिया (४) वत्थुविज्जा (५) सुत्तखेड.. खेरीज आभरणविहि आणि भूषणयोजन, सयणविहि आणि शयनरचना, नालियाखेड (हातचलाखी) व हस्तलाघव, या तीन हिंदू व जैनकलांत साम्य दिसते. (३) बौद्ध आणि जैनकलांत समान असणाऱ्या दहा कला पुढीलप्रमाणे आहेत :- (१) इत्थिलक्खण (२) ईसत्थ (३) गयलक्खण (४) गोणलक्खण (५) धणुव्वेय (६) पुरिसलक्खण (७) मिंढयलक्खण (अजलक्षण) (८) रूप (९) सउणरुयं (शकुनिरुत), आणि (१०) हयलक्खण (अश्वलक्षण). खेरीज जूय आणि अक्षक्रीडा, अट्ठावय (अर्थशास्त्र) आणि अर्थविद्या या दोन बौद्ध आणि जैनकलांत साधर्म्य आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25