Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 12
________________ चाचणी घेणे (उ), पाणी व माती यांच्या संयोगाने नवीन वस्तू बनविणे (गु) ; सजावट व निर्मितीच्या हेतूने पाण्यामध्ये मळलेल्या मातीच्या लगद्यापासून घर, मूर्ति, इत्यादि सुंदराकार वस्तू निर्माण करण्याची कला (पू).-येथे, पाण्यातून माती (=गाळ) बाजूला काढणे म्हणजे पाणी गाळण्याची (Filtering) कला, असाही अर्थ होऊ शकतो (आ). (१५) अन्नविहि (अन्नविधि) :- अन्नाचे नियम (बा,वै), अन्न घेण्याचे वा तयार करण्याचे नियम (उ), धान्य नीपजावनानी कळा (गु).-अन्न हे भक्ष्य, चोष्य, लेह्य व पेय असे चार प्रकारचे मानले जाते. त्यात कधी भोज्य हा प्रकार घालून अन्न हे पाच प्रकारचे मानले जाते. अन्न तयार करण्याची कला म्हणजे पाककला. याखेरीज भिन्न ऋतु आणि उपवासदिवस यावेळी कोणते अन्न कसे खावे याचे नियम (आ). (१६) पाणविहिः - या शब्दाची ‘पानविधि' अशी संस्कृत छाया घेऊन पुढे अर्थ दिले जातात :- पिण्याचे नियम२६ (बा,वै), पाणी पिणे अथवा२६ वापरणे यांचे नियम (उ), नवं (नवीन) पाणी उत्पन्न करवानी, संस्कारथी शुद्ध करवानी अने उनुं (=गरम) करवानी कळा (गु).-पान म्हणजे मद्यपान असाही अर्थ होतो. प्राचीन काळी मद्यपानाची प्रथा होतीच. तेव्हा पाणविहि म्हणजे मद्यपानाचे नियम (आ). खेरीज, पाणविहि शब्दाची ‘प्राणविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, देहातील प्राणक्रिया व्यवस्थित चालू ठेवण्याचे नियम असा अर्थ होतो (आ). (१७) वत्थविहि (वस्त्रविधि) :- पोशाखाचे नियम८ (वै), कपडे शिवणे, धुणे व अंगावर घालणे यांची कला२८ (उ),नवांवस्त्र बनाववानी, वस्त्र रंगवानी, वस्त्र शीववानी तथा पहेरवानी कळा (गु) ; विविध प्रकारची वस्त्रे विणण्याची व शिवण्याची कला (पू).-निरनिराळ्या प्रकारचे सूत काढून, विणून, रंगवून शिवणे आणि भिन्न ऋतु, प्रसंग इत्यादीमध्ये योग्य ती वस्त्रे वापरण्याची कला (आ). (१८) सयणविहि :- याची संस्कृत छाया ‘शयनविधि' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- शय्येचे नियम२९ (बा,वै), शय्या तयार करणे आणि वापरणे यांची कला (उ), शय्या बनाववानी, सुवानी युक्ति जाणवी विगेरेनी कळा (गु), शय्येची सजावट करण्याची कला (पू). भिन्न प्रकारच्या-पुष्पशय्या इत्यादि-शय्या तयार करणे, त्यांची सजावट करणे इत्यादि (आ). शयन म्हणजे निद्रा असाही अर्थ आहे. मग निद्रा आणण्याची कला असा अर्थ होईल (आ). तसेच, सयणविहि शब्दाची ‘सदनविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, घर सुशोभित करण्याची, घराची अंतर्बाह्य सजावट करण्याची कला, असा अर्थ होईल (आ). (१९) अज्जा (आर्या) :- आर्या छंदात रचना वा काव्यरचना (बा,वै,उ) ; संस्कृत तथा प्राकृत भाषांनी आर्या विगेरेना लक्षण जाणवा, बनाववानी कळा (गु). आर्या हे काव्यरचनेसाठीचे वृत्त आहे. (२०) पहेलिया (प्रहेलिका) :- कूट? (बा), कूटांची रचना (वै), कूटे३१ बनविणे आणि सोडविणे (उ), प्रहेलिका बांधवानी कळा (गु). प्रहेलिका हा चित्रकाव्याचा एक प्रकार आहे. त्यात दिलेल्या वर्णनावरून ते कशाचे वर्णन आहे हे शोधावयाचे असते. उदा. नरनारी समुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता । अमुखीकुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ।। (उत्तर-बोटांनी वाजविलेली चुटकी). (२१) मागहिया :- या शब्दाचा संबंध 'मगध' शब्दाशी जोडून पुढील अर्थ दिले जातात :- मागधी रचना (बा), मागधीची रचना३२ (वै), मागधी भाषेचे किंवा मगध देशाच्या इतिहासाचे ज्ञान (उ), मगध देशानी भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (ग). पासममध्ये 'मागहिआ' म्हणजे एक छंदविशेष असा अर्थ दिला आहे : तो घेतल्यास मागहिआ छंदातील काव्यरचना असा अर्थ होईल. खेरीज हा शब्द मागध (=भाट, स्तुतिपाठक) या शब्दापासूनही साधता येतो. मग, मागहिआ म्हणजे भाटांनी रचलेले स्तुतिगीत. व नंतर सामान्यपणे स्तुतिगीत वा स्तोत्र असा अर्थ होईल (आ). (२२) गाहा (गाथा) :- गाथा रचना२३ (बा), गाथेची रचना२३ (वै), गाथाछंदात काव्य रचना३ (उ), प्राकृत भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (गु). गाथा हा काव रचनेसाठीचा एक छंद आहे. (२३) सिलोग (श्लोक) :- श्लोक करणे३४ (बा). पद्यांची रचना३४ (वै). सामान्यपणे पद्ये करणे अथवा३४ अनुष्टुप् छंदात पद्ये करणे (उ), अनुष्टुप् श्लोक बनाववानी३५ कळा (गु), श्लोक म्हणजे सामान्यपणे पद्य अथवा

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25