Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ इंग्रजी भाषांतरात दिले आहेत. याचे कारण असे. अंतगडदसाओ ग्रंथाच्या तिसऱ्या वर्गात, ‘गयसुकुमाल' या कुमाराची कथा आहे. त्याच्या संदर्भात, त्याच्या शिक्षणापासून ते तो भोगसमर्थ' होईपर्यंतचे वर्णन हे मेह' माराप्रमाणे आहे असे म्हटले आहे (तए णं तस्य दारगस्स अमापियरो नामं करेंति गयसुकुमाले त्ति । सेसंजहा मेहे जाव भोसमत्थे जाए यावि होत्था ।) आता, या मेह कुमाराची कथा नायाधम्मकहाओमध्ये प्रथम येते. हा मेह ७२ कला शिकतो. त्यांची यादी नायामध्ये आहे. त्या ७२ कलांचा अर्थ बार्नेट देतो. बार्नेटने दिलेल्या अर्थांच्या बाबतीतही दोन गोष्टी येथे नमूद करावयास हव्यात :- (१) बार्नेटने 'विलेवणविहि'चे भाषांतर दिलेले नाही. (२) बार्नेटचे Rules of House Keeping हे शब्द मुळातील कोणत्याही शब्दासाठी नाहीत. तेव्हा नामामधील ‘वत्थविहि' ही कला ‘वत्थुविहि' अशी घेऊन, बार्नेटने हा अर्थ दिला की Rules of Besmearing असे त्याला म्हणावयाचे होते, हे काही सांगता येत नाही. वर उल्लेखिलेले सर्व अर्थ नेहमीच योग्य वाटत नाहीत, तसेच त्यांमध्ये सर्व १०६ कलांचा अर्थ आलेला नाही. म्हणून प्रस्तुत लेखात असे केले आहे :- वरील सर्व अर्थ एकत्र करून दिले आहेत, त्यात काही ठिकाणी अधिक माहिती पूरक म्हणून जोडली आहे. काहींचे नवीन अर्थ सुचविले आहेत. आणि ज्या कलांचे अर्थ पूर्वी येऊन गेलेले नाहीत, त्यांचा अर्थ दिलेला आहे. ___कलांचे अर्थ देताना, पुढील पद्धत स्वीकारली आहे :- (१) इंग्रजी अर्थांचे मराठी रूपांतर केले आहे, व मूळ इंग्रजी शब्द टीपांत दिले आहेत. (२) बहुतेक ठिकाणी गुजराथी अर्थ तसाच दिला आहे, तो कळण्यास फारशी अडचण येत नाही. (३) अर्थ ज्यांनी दिले आहेत, त्यांची आद्याक्षरे त्या त्या अर्थांपुढे कंसात ठेवली आहेत. (४) पूर्णार्घ्य ग्रंथात वर्गीकरण करून जसे अर्थ दिले आहेत, तसेच ते योग्य तेथे टीपांत दिले आहेत.(५) वर ज्या क्रमाने कलांचे परिगणन केले आहे त्याच क्रमाने त्यांचा अर्थ दिला आहे. सर्व कलांचे अर्थ (१) चारही ग्रंथांत समान असणाऱ्या कला (१) लेह (लेख) :- लेखन (बा.वै.उ.गु.) निरनिराळ्या लिपीतील व पदार्थांवरील आणि विषयांवरील लेखन, असा अर्थ अभयदेव देतो. त्याला धरून पूर्णाऱ्यामध्ये अर्थ दिला आहे (पृ.७८५). स्वामी, सेवक, पिता इत्यादींना उद्देशून करावयाचे पत्रलेखन२ असाही अर्थ अभयदेव देतो. (२) गणिय (गणित) :- संख्यान (अ), अंकगणित (बा.वै.), अंकगणित, बीजगणित व रेखागणित (=भूमिति) (उ)-मोठ्या संख्यांचा गुणाकार इत्यादि क्रिया तोंडी वा झटपट करणे (आ). (३) रूव (रूप) :- सोंग घेणे.२ (बा.वै.), रंगविणे (वै), नाणी पाडण्याची वा द्रव्यविनिमयाची कला (वै), रूप बदलण्याची कला (उ.गु.), मूर्तिकला व चित्रकला ४ (पू)-येथे रूवचा नाटक असा अर्थ घेण्याचे कारण नाही, कारण तो अर्थ पुढील नट्ट'मध्ये येतो. (४) नट्ट (नाट्य), :- नृत्य (बा.वै.उ.), नाटक (गु), नाट्यकला (अ) नाट्यकलेत नृत्यकलासुद्धा येते असे अभयदेव म्हणतो. तेव्हा नट्ट म्हणजे नाट्यकला वा अभिनयकला आणि नृत्यकला. (कधी गीत, नृत्य आणि वादिन या तीहींना मिळून नाट्य ही संज्ञा दिली जाते. कलानां तिसृणामासां नाट्यमेकीक्रियोच्यते । (जैनांचे) पद्मपुराण, प्रथम भाग (पृ.४७९). हा अर्थ येथे अभिप्रेत नाही. कारण पुढे गीत व वादित्त या कला स्वतंत्रपणे सांगितल्या आहेत.) (५) गीय (गीत) :- गायन (बा.वै.उ.गु.), ताल, सूर, इत्यादि सांभाळून करावयाचे गायन. (६) वाइय (वादित, वादित्र) :- वाद्यसंगीत५ (वै.उ.), संगीत वाद्ये वाजविणे (बा.वै.गु.), वाद्यकला (अ) वाद्ये ही तत (उदा. वीणा) अवनद्ध (उदा. मृदंग), सुषिर (उदा.पोवा), आणि घन (उदा.टाळ) अशी चार प्रकारची मानली जातात. ती वाद्ये वाजविण्याची कला.

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25