Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 05
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 8
________________ (ख) औप मध्ये पुढीलप्रमाणे कला आहेत :(१) संभव (२) मुत्ताखेड (सुऔ) (३) खुत्ताखेड्ड (अऔ) (ग) सम मध्ये असणाऱ्या कला पुढीलप्रमाणे आहेत : (१) मधुसित्थ (२) मिंढयलक्खण (३) चंदलक्खण (४) सूरचरिय (५) राहुचरिय (६) गहचरिय (७) सोभागकर (८) दोभागकर (९) विज्जागय (१०) मंतगय (११) रहस्सगय (१२) सभासा (१३) वत्थुमाण (१४) दंडजुद्ध (१५) आससिक्खा (१६) हत्थिसिक्खा (१७) धम्मखेड (१८) चम्मखेड वरील परिगणनाचा सारांश असा :(१) नाया, सम, राज । राय, औप या चारांतील कला (२) तीन ग्रंथांतील समान कला (अ) नाया, राय, औप (आ) नाया, सम, राय (इ) सम, राय, औप (ई) नाया, सम, औप Mrm ML (३) सम व औप या दोहोंतील कला (४) एकेका ग्रंथातील कला :(क) राय । राज (ख) औप (ग) सम 3 ॥ १०६ कला बहात्तर कशा होतील ? वर पाहिल्याप्रमाणे चार ग्रंथातील समान ५८ कला आणि (अ) मधील तीन ग्रंथांतील समान ११ कला मिळून ६९ कला होतात. आता, वरील (आ), (इ) आणि (ई) मध्ये तीन ग्रंथांना समान कला २,३,१ अशा आहेत : (१) अटिजुद्ध (१) चक्कलक्खण (२) सुत्तखेड (२) मणिपाग (१) खंधावारमाण (३) धातुपाग यातील कोणत्या तीन कला घेऊन ७२ ही संख्या साधावी, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर तीन प्रकारांनी देता येईल : (अ) अभयदेवाने सुचविल्याप्रमाणे, वरील २,३,१ कलांतील एक कला दुसऱ्या कलेत समाविष्ट करावयाचे ठरविले तर मागे आलेल्या 'हिरण्णपाग' मध्ये 'धातुपाग' आणि 'मणिपाग' या कला जातील, आणि 'नगरमाण'मध्ये 'खंधावारमाण' ही कला जाईल. मग (१) अट्ठिजुद्ध (२) सुत्तखेड, व (३) चक्कलक्खण या तीन कला उरतील. या तीन कला व पूर्वीच्या ६९ कला मिळून ७२ कला होतील (येथे पूर्वीच्या कोणत्या कलेत दुसरी कला घालावी याबद्दल मतभेद होण्याची शक्यता आहे). (आ) चार ग्रंथांना समान असणाऱ्या ५८ कला घेऊन, ७२ संख्या पुरी करण्यास तीन ग्रंथातील समान कलांमधून १४ कला पुढीलप्रमाणे निवडता येतील (येथेही निवडीबाबत मतभेद

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25