Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
View full book text
________________
सेवा-परोपकार
प्रश्नकर्ता : खालच्या वर्गाची माणसे असतील ते असे मानतील. दादाश्री : उच्च वर्गाचा माणूस असे मानतो की परक्यांना देऊ शकतो.
जीवन परोपकारासाठी याचे गुह्य सायन्स असे आहे की, जर मन-वचन-काया परोपकारासाठी वापरली तर तुमच्याजवळ प्रत्येक वस्तु असेल. परोपकारासाठी वापरले तर आणि जर फी घेऊन केले तर?
प्रश्नकर्ता : त्रास होईल.
दादाश्री : कोर्टात फी घेतात, शंभर रुपये लागतील, दिडशे रुपये लागतील. तेव्हा म्हणेल की, 'साहेब, दिडशे घ्या.' परंतु परोपकाराचा कायदा तर लागणार नाही ना!
प्रश्नकर्ता : पोटात आग लागली असेल तर असे म्हणावेच लागते ना?
दादाश्री : पोटात आग लागली आहे असा विचार करुच नका. कोणत्याही प्रकारचे परोपकार कराल ना तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता लोकांचे काय होते? तर अर्धवट समजून करायला जातात त्यामुळे उलटाच 'इफेक्ट' (परिणाम) येतो. म्हणून मग मनात श्रद्धा बसत नाही, उडून जाते. आजपासून परोपकार करायला लागेल तेव्हा दोन-तीन जन्मानंतर सर्व काही नीट होईल. हेच 'सायन्स' आहे.
चांगल्या-वाईटासाठी परोपकार एक सारखाच प्रश्नकर्ता : मनुष्य चांगल्यासाठी परोपकारी जीवन जगतो. लोकांना सांगतो देखील, परंतु तो जो भल्यासाठी सांगतो त्याला लोक 'माझ्या स्वतःच्या भल्यासाठीच सांगत आहे,' हे समजून घ्यायलाच तयार नसतात, त्याचे काय?
दादाश्री : असे आहे, की परोपकार करणारा समोरच्याची समज कशी आहे हे पाहत नाही. जर परोपकार करणाऱ्याने समोरच्याची समज