Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 29
________________ 20 सेवा-परोपकार प्रश्नकर्ता : काही चांगले काम केले, तर आत मला अहंकार येतो मी केले म्हणून! दादाश्री : तो तर येणारच ना. प्रश्नकर्ता : मग ते विसरण्यासाठी काय करावे? दादाश्री : मी समाजसेवक आहे याचा अहंकार यायला नको, चांगले काम केले की त्याचा अहंकार होतो, तेव्हा एकच करायचे, आपले जे इष्टदेव आहेत किंवा ज्याला तुम्ही मानता त्यांना म्हणावे की, हे भगवंता, मला अहंकार करायचा नाही, तरी पण होत आहे, मला क्षमा करा! एवढेच करायचे, होईल एवढे ? प्रश्नकर्ता : होईल. दादाश्री : एवढे करा! समाजसेवेचा अर्थ काय? बऱ्याच प्रमाणात 'माय' तोडून टाकते. 'माय' (माझे) पूर्णपणे संपले तर तो स्वतः परमात्मा आहे. त्याला नंतर सुख मिळतेच! सेवेत अहंकार प्रश्नकर्ता : तर या जगासाठी आम्हाला काहीच करण्यासारखे रहात नाही का? दादाश्री : तुम्हाला करायचेच नाही. हा तर अहंकार उभा झालेला आहे. हे मनुष्य एकटेच अहंकार करतात, कर्तापणाचा. प्रश्नकर्ता : या ताई एक डॉक्टर आहेत. एक गरीब ‘पेशंट' आला, त्याच्यासाठी अनुकंपा येते. ते त्याची सुश्रुषा करतात. आपल्या सांगण्यानुसार अनुकंपा करण्याचा काही प्रश्नच येत नाही ना? दादाश्री : ती अनुकंपा सुद्धा नैसिर्गिक आहे. पण परत अहंकार

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50