Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
View full book text
________________
24
सेवा-परोपकार
याकरीता तुम्ही फक्त सेवाभावच नक्की केला तर बाय प्रॉडक्शनमध्ये लक्ष्मी अधिक प्रमाणात येते. म्हणजे लक्ष्मीला बाय प्रॉडक्टमध्येच ठेवली तर लक्ष्मी अधिक येते, परंतु येथे तर लक्ष्मीच्या हेतुनेच लक्ष्मीचे प्रॉडक्शन करतात म्हणून लक्ष्मी येत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की एकच हेतू ठेवा. 'निरंतर सेवाभाव' तर बाय प्रॉडक्ट आपोआप येत राहील. जसे बाय प्रॉडक्टमध्ये कोणतीही मेहनत करावी लागत नाही, खर्च करावा लागत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट मिळते. तसेच ही लक्ष्मी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळत जाते. तुम्हाला अशी लक्ष्मी पाहिजे की ऑनची (वर-खात) लक्ष्मी पाहिजे? ऑनची लक्ष्मी नको ना?! मग ठीक आहे! ती फ्री ऑफ कॉस्ट मिळाली तर किती चांगले!
म्हणून सेवाभाव नक्की करा, मनुष्यमात्रांची सेवा. कारण की आम्ही दवाखाना काढला याचा अर्थ आपल्याला जी विद्या अवगत आहे त्या विद्येचा सेवाभावात उपयोग करणे, हाच आपला हेतु असायला हवा. त्याच्या फळस्वरूप इतर गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळत राहतील. लक्ष्मीची कधीही कमी पडणार नाही. आणि जे केवळ लक्ष्मीसाठीच (पैश्यांसाठीच) करायला गेले, त्यांना तोटा झाला. हो, लक्ष्मीसाठी कारखाना काढला तर ते बाय प्रॉडक्ट राहिलेच नाही ना! कारण लक्ष्मीच बाय प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्शनची! म्हणजे आधी आपल्याला प्रॉडक्शन नक्की करायचे नंतर बाय प्रॉडक्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळत राहील.
जग कल्याण, हेच प्रॉडक्शन आत्मा प्राप्त करण्यासाठी जे केले जाते ते प्रॉडक्शन आहे आणि त्यामुळे बाय प्रॉडक्शन मिळत राहते. सांसारिक सर्व गरजा पूर्ण होत जातात. मी माझे एक प्रकारचे प्रॉडक्शन ठेवलेले आहे, 'हे जग परम शांती प्राप्त करो आणि कित्येक मोक्ष प्राप्त करो.' हे माझे प्रॉडक्शन आणि त्याचे बाय प्रॉडक्शन मला मिळतच राहते. हे चहा-पाणी आम्हाला तुमच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे मिळते त्याचे कारण काय आहे की तुमच्या तुलनेत माझे प्रॉडक्शन उच्च कोटीचे आहे. असेच तुमचे प्रॉडक्शन उच्च