Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 35
________________ 26 सेवा-परोपकार त्याचा इगोइज़म (अहंकार) आहे. आणि या भाऊला विचारले की, 'तुम्ही कोण आहात?' तर तो म्हणेल, बाहेर ओळखण्यासाठी मी चंदुभाऊ आहे आणि खरोखर तर मी शुद्धात्मा आहे.' तर त्यात इगोइजम नाही. विधाउट इगोइज़म! समाजसेवकाचा इगो(अहंकार) चांगल्या कार्यासाठी असला तरी आहे तर इगोच. वाईट कार्यासाठी इगो असेल तर 'राक्षस' म्हटला जाईल. चांगल्या कार्यासाठी इगो असेल तर देव म्हटला जातो. इगो म्हणजे इगो. इगो म्हणजे भटकत भटकत रहायचे आणि इगो संपला. मग येथेच मोक्ष होईल. 'मी कोण आहे' हे जाणणे, हाच धर्म प्रश्नकर्ता : प्रत्येक जीवाने काय करायला हवे, त्याचा धर्म काय आहे? दादाश्री : जे काही करत आहे, तो त्याचाच धर्म आहे. पण आपण म्हणतो की माझा धर्म, इतकेच. त्याचा आपण इगोइज़म करतो, की मी हे केले. म्हणून आता आपण काय करायला हवे की 'मी कोण आहे' हे जाणणे, त्यासाठी प्रयत्न करणे, तर मग सर्व पझल सॉल्व होऊन जातील. नतंर पझल उभे राहणार नाहीत आणि पझल उद्भवलेच नाही म्हणून तो स्वतंत्र व्हायला लागेल. लक्ष्मी, ती तर बाय प्रॉडक्शनमध्ये प्रश्नकर्ता : प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य मग तो वकील असो किंवा डॉक्टर असो, कर्तव्य तर हेच असते ना की मनुष्यजीवाचे भले करणे? दादाश्री : हो, पण 'भले करायचे आहे' हा निश्चय केल्याशिवायच करत राहतात. कोणताही डिसिज़न घेत नाही. कोणताही हेतू निश्चित केल्याशिवाय अशीच गाडी चालत राहते. कोणत्या गावी जायचे हे माहिती नाही. कोणत्या गावी उतरायचे याचा ठिकाणा नाही. वाटेत चहा-नाश्टा

Loading...

Page Navigation
1 ... 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50