Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 19
________________ 4U सेवा-परोपकार सुद्धा घरी बोलवत. दोघांना बसवून समोपचाराने त्यांच्यातील भांडण मिटवत. ज्याचे पैसे फेडायचे असतील त्याला थोडे रोख मिळवून देऊन, बाकीचे हप्ते लावून देत आणि मग दोघांना म्हणत की, 'चला, माझ्या बरोबर जेवायला बसा.' दोघांना खाऊ घालून घरी पाठवत असत! आज आहेत का असे वकील? म्हणून समजून घ्या आणि वेळेनुसार चला. आणि जर स्वत:चे स्वतःसाठीच वापरले तर मृत्युसमयी दःखी व्हाल. बंगला गाडी सोडून जीव जाऊ शकत नाही! सल्लाचे पैसे त्यांच्याकडून मागत नव्हते. सहमतीने, असे तसे करुन मिटवले जात होते. स्वत:चे दोन हजार काढून देत असत. आणि आता सल्ला घ्यायला गेलो की सल्लाची फी शंभर रुपये घेतात! अरे, 'जैन आहात तुम्ही,' तेव्हा म्हणतात, 'जैन तर आहे पण व्यवसाय करायला हवा की नको आम्ही?' 'साहेब सल्ल्याची सुद्धा फी?' आणि तुम्ही जैन? देवालाही लाजवलेत? वीतरागांनाही लाजवलेत? नो-होऊची फी? हे तर कसले घोळ घातले आहेत? प्रश्नकर्ता : ही अतिरिक्त बुद्धिची फी, असेच म्हणता येईल ना! दादाश्री : कारण की बुद्धिचा विरोध नाही. ही बुद्धि विपरीत बुद्धि आहे. स्वत:चेच नुकसान करणारी बुद्धि आहे. विपरित बुद्धि ! देवाने बुद्धिला विरोध केलेला नाही. म्हणतात की, सम्यक बुद्धि सुद्धा असू शकते. ती बुद्धि वाढली तर मनातून चांगले विचार येतात की कोणाकोणाचे काम करु, कोणा-कोणाला मदत करु? कोणा-कोणाला नोकरी नाही त्यांना नोकरी मिळेल असे करु. ओब्लाइजिंग नेचर प्रश्नकर्ता : आता माझ्या दृष्टीने मी सांगतो की, एखादा कुत्रा आहे तो एखाद्या कबुतराला मारायला आला आणि आपण त्याला वाचवायला गेलो तर माझ्या दृष्टीने आपण ओब्लाईज केले, तर आपण 'व्यवस्थित शक्ती' च्या मार्गात आलो ना?

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50