Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
View full book text
________________
सेवा-परोपकार
कारण एकदा भगवंताचे दर्शन झाल्यावर देवाला कोण सोडेल? लोकसेवा एवढ्यासाठी करायची की भगवंताचे दर्शन होतील. लोकसेवा हृदयापासून व्हायला हवी. हृदयापासून असेल तर सर्वत्र पोहचेल. लोकसेवा आणि प्रसिद्धी दोन्ही एकत्र झाली तर अडचण येईल माणसानां. प्रसिद्धीशिवाय लोकसेवा असेल तर ती खरी. प्रसिद्धी तर मिळेलच म्हणा. परंतु प्रसिद्धीची अपेक्षा नसावी, असे असायला पाहिजे.
लोकं जनसेवा करतील असे नाहीत. हे तर आतमध्ये कीर्तिचा लोभ आहे, मानाचा लोभ आहे, सगळे वेगवेगळे लोभ आहेत ते त्यांच्याकडून करवून घेतात. जनसेवा करणारे लोक कसे असतात? ते अपरिग्रही पुरुष असतात. हे तर सगळे नांव कमविण्यासाठी आहेत. 'हळूहळू कधीतरी मंत्री बन' या अपेक्षेने जनसेवा करतात. दानत चोर आहे म्हणून जर बाहेरच्या अडचणी, व्यर्थ परिग्रह हे सर्व बंध केले तर सर्वकाही ठीक होईल. येथे तर एका बाजूने परिग्रही, संपूर्ण परिग्रही रहायचे आणि दुसऱ्या बाजूने जनसेवा करायची. हे दोन्ही कसे शक्य आहे ?
प्रश्नकर्ता : सध्या तर मी मानवसेवा करत आहे. घरो-घरी भीख मागून मी गरिबांना देतो. एवढे मी करतो सध्या.
दादाश्री : ते सर्व तुमच्या वही खात्यात जमा होईल. तुम्ही जे देतात ना... नाही, नाही तुम्ही जे त्या दोघांमध्ये करता, त्याची रक्कम काढली जाईल. अकरा पटीने रक्कम करुन, मग त्याची जी दलाली आहे, ती तुम्हाला मिळेल. पुढच्या जन्मी दलाली मिळेल आणि त्याची तुम्हाला शांती राहील. हे चांगले काम करता म्हणून शांती राहते आणि भविष्यातही राहील. हे काम चांगले आहे.
बाकी, सेवा तर त्यास म्हणावी की तू काम करत असशील पण मला ते माहित सुद्धा पडणार नाही, त्याला सेवा म्हणतात, मूक सेवा. माहित पडते ती सेवा म्हटली जात नाही.
सुरतमधील एका गावात आम्ही गेलो होतो. एक माणूस म्हणाला,