Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 20
________________ सेवा-परोपकार दादाश्री : परंतु ते ओब्लाइज केव्हा होईल? जर त्याचे 'व्यवस्थित' असेल तरच तसे आपल्याकडून होईल, नाहीतर होणारच नाही. आपण ओब्लाइजिंग नेचर ठेवायचा आहे. त्याने सर्व पुण्यच बांधली जातील म्हणून मग दुःख उत्पन्न होण्याचे साधनच उरले नाही. पैश्याद्वारे नाही तर त्याचे काम करुन देऊन, किंवा बुद्धि द्वारे समज देऊन (समजावून) जमेल त्या कोणत्याही मार्गाने ओब्लाइज करावे. परोपकार, परिणाम लाभच हे जीवन जर परोपकारासाठी जगले जाईल तर तुम्हाला कोणतीही कमतरता राहणार नाही. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतील आणि नुसत्या उड्याच माराल तर एकही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण की अशाने तर तुम्हाला झोपच येणार नाही. या श्रीमंत लोकांना तर झोप येतच नाही. तीन तीन, चार चार दिवस झोपूच शकत नाही, कारण ज्याची त्याची लूटमारच केलेली आहे त्यांनी. ___म्हणून ओब्लाइजिंग नेचर करा की रस्त्याने जाता-जाता शेजारीपाजारी कोणाला विचारुन घ्यावे की भाऊ, मी पोस्ट ऑफिसात जात आहे आपली काही टपाल टाकायची आहे का? असे विचारत जाण्यात काही हरकत आहे? कोणी म्हणेल की, माझा तुझ्यावर विश्वास नाही, तेव्हा म्हणावे, भाऊ, मी पाया पडतो. पण ज्यांना तुमच्यावर विश्वास असेल त्यांची टपाल तर घेऊन जा. हा तर माझ्या लहानपणापासूनचा गुण होता ते मी सांगतो. ओब्लाइजिंग नेचर आणि पंचवीस वर्षाचा झालो तेव्हा माझे सर्व मित्र मला सुपर ह्यमन म्हणत असत. ह्यमन (माणूस) कोणाला म्हटले जाईल की जो देतो आणि घेतो, समान भावाने व्यवहार करतो. ज्याने सुख दिले असेल त्याला सुख देतो, दुःख दिले असेल त्याला दुःख देत नाही. असा व्यवहार जो करतो त्याला मनुष्यपणा म्हटले जाते.

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50