Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
View full book text
________________
सेवा - परोपकार
म्हणजे जो समोरच्याचे सुख हिरावून घेतो, तो पाशवी वृत्तीचा असतो. जो स्वतः सुख देतो आणि सुख घेतो असा मानवीय व्यवहार करतो म्हणून तो मनुष्यात राहतो आणि जो स्वत:चे सुख दुसऱ्यांना उपभोगण्यासाठी देतो तो देवगतीत जातो, सुपर ह्युमन ! स्वतःचे सुख दुसऱ्यांना, एखाद्या दुःखी माणसला देतो तो देवगतीत जातो.
12
त्यात इगोइजम नोर्मल
प्रश्नकर्ता : परोपकाराबरोबर 'इगोइजम' ( अहंकाराची) ची सोबत असते का ?
दादाश्री : जो परोपकार करतो त्याचा 'इगोइजम' नेहमी नोर्मलच असतो. त्याचा ‘इगोइजम' वास्तविक असतो. आणि जो कोर्टात दिडशे रुपए फी घेऊन इतरांचे काम करतो त्याचा 'इगोइजम' खूप वाढलेला असतो.
या निसर्गाचा नियम काय आहे की तुम्ही तुमची फळे दुसऱ्यांना दिली तर निसर्ग तुम्हाला देईल. हेच गूढ सायन्स आहे. हा परोक्ष धर्म आहे. त्यानंतर प्रत्यक्ष धर्म येतो, आणि शेवटी आत्मधर्म येतो. मनुष्य जीवनाचा हिशोब एवढाच असतो. सार एवढेच की मन-वचन-काया इतरांसाठी उपयोगात आणा.
नवीन ध्येय आजचे, रिएक्शन मागचे
प्रश्नकर्ता : तर परोपकारासाठीच जगले पाहिजे ?
दादाश्री : हो, परोपकारासाठीच जगले पाहिजे. पण आता तुम्ही ही लाइन लगेच बदलली तर तसे केल्याने मागील रिएक्शन येतात, म्हणून मग तुम्ही कंटाळतात आणि वाटते की हे मला अजून सहन करावे लागते. पण थोड्या वेळेपुरतेच तुम्हाला सहन करावे लागेल. त्यानंतर मात्र तुम्हाला कोणतेही दुःख राहणार नाही. पण आता तर नवीन लाइन बांधताय म्हणून मागील रिएक्शन तर येणारच. आजपर्यंत जे उलटे कार्य केले होते त्याचे फळ तर येईलच ना ?