Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 14
________________ सेवा-परोपकार भावात तर शंभर टक्के कोणतेही झाड स्वत:ची फळे खातो? नाही. म्हणजे ही झाडे मनुष्याला उपदेश देतात, की तुम्ही तुमची फळे इतरांना द्या. तुम्हाला निसर्ग देईल. निंब कडु लागला तरी लोकं त्याला लावतातच कारण त्याचे इतरही लाभ आहेत, नाहीतर ते रोपटे उपटूनच टाकतील. परंतु ते दुसऱ्याप्रकारे लाभदायी आहे. ते गारवा देते, त्याचे औषध हितकारी आहे, त्याचा रस हितकारी आहे. सत्युगात लोकं समोरच्या व्यक्तिला सुख देण्याचाच प्रयोग करायचे. संपूर्ण दिवस 'कोणाला ओब्लाइज करावे' ह्याच्याच विचार त्यांना येत असे. बाहेरुन कमी प्रमाणात झाले तर हरकत नाही, पण आतून आपला भाव तर असलाच पाहिजे की माझ्याजवळ पैसे आहेत, तर मला इतरांचे दुःख कमी करायचे आहे. माझ्याजवळ अक्कल असेल तर कोणाची समजूत काढून पण त्याचे दु:ख कमी करायचे आहे. स्वतः जवळ जी शिल्लक असेल त्याच्याने मदत करणे. किंवा ओब्लाइजिंग नेचर तरी ठेवायलाच हवे. ओब्लाइजिंग नेचर म्हणजे काय? दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव! ओब्लाइजिंग नेचर असेल तर स्वभावही तितकाच चांगला असतो. फक्त पैसे देणे म्हणजे ओब्लाइजिंग नेचर, असे नाही. पैसे तर आपल्याजवळ असतील किंवा नसतीलही, परंतु आपली भावना, आपली इच्छा अशीच असायला हवी की कोणाला कशाप्रकारे मदत करु! आपल्या घरी कोणी आले असेल तर त्याला कोणती मदत करता येईल, अशीच भावना असायला हवी. पैसे देणे किंवा नाही देणे हे तुमच्या शक्तीनुसार आहे. केवळ पैश्यानेच ओब्लाइज करता येते असे काही नाही. ते तर देणाऱ्याच्या शक्तीवर निर्भर असते. फक्त मनापासून भावना असायला हवी की, कशाप्रकारे 'ओब्लाइज' करता येईल. हीच भावना सतत राहिल एवढेच बघायचे.

Loading...

Page Navigation
1 ... 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50