________________
प्राकृत व्याकरणे
७
(अनु.) निर् आणि दुर् या (शब्दां) मधील अन्त्य व्यंजनाचा विकल्पाने लोप होतो.
उदा.निस्सह... दुहिओ.
(सूत्र) स्वरेन्तरश्च ।। १४।। (वृत्ति) अन्तरो निर्दुरोश्चान्त्यव्यञ्जनस्य स्वरे परे लुग् न भवति। अंतरप्पा।
निरन्तरं। निरवसेस। दुरुत्तरं । दुरवगाहं५। क्वचिद् भवत्यपि।
अन्तोवरि। (अनु.) अंतर् (हा शब्द, तसेच) निर् आणि दुर् यांतील अन्त्य व्यंजनापुढे स्वर
आला असताना, त्या अन्त्य व्यंजनाचा लोप होत नाही. उदा. अंतरप्पा...दुरवगाहं. (परंतु या अन्त्य व्यंजनाचा) क्वचित् लोप होतोही. उदा. अन्तोवरि.
(सूत्र) स्त्रियामादविद्युतः ।। १५।। (वृत्ति) स्त्रियां वर्तमानस्य शब्दस्यान्त्यव्यञ्जनस्य आत्वं भवति। विद्युच्छब्दं
वर्जयित्वा। लुगपवादः। सरित् सरिआ। प्रतिपद् पाडिवआ। सम्पद् संपआ। बहुलाधिकाराद् ईषत्स्पृष्टतरयश्रुतिरपि। सरिया। पाडिवया।
संपया। अविद्युत् इति किम् ? विजू। (अनु.) विद्युत् हा शब्द सोडून, इतर स्त्रीलिंगी शब्दांतील अन्त्य व्यंजनाचा आ
होतो. 'अन्त्य व्यंजनाचा लोप होतो' (१.११), या नियमाचा (अपवाद) प्रस्तुत नियम आहे. उदा. सरित्...संपआ. बहुलचा अधिकार असल्यामुळे, (येथे येणाऱ्या आ या स्वराच्या उच्चाराचा ध्वनि) किंचित् प्रयत्नाने उच्चारलेल्या य् व्यंजनाप्रमाणे सुद्धा होतो. उदा. सरिया...संपया. (सूत्रामध्ये) विद्युत् शब्द सोडून, असे का म्हटले आहे ? (कारण विद्युत् शब्दाच्या अन्त्य व्यंजनाचा आ न होता, लोप होतो. उदा.) विजू.
१ अन्तरात्मा ४ दुरुत्तर
२ निरन्तर ५ दुरवगाह
३ निरवशेष ६ अन्तर्-उपरि