Book Title: Sanmati Tirth Varshik Patrika
Author(s): Nalini Joshi
Publisher: Sanmati Tirth Prakashan Pune

View full book text
Previous | Next

Page 13
________________ अन्मति-तीर्थ भावना योगानेच समस्त कर्मांचा, अंत येतो साधता, अनुकूल वाऱ्याच्या संयोगाने नावेलाही, सहजपणे तीर येतो गाठता ।। पूर्वसंचित कर्मांचा क्षय, आणि नवीन कर्मांचे नाही बंधन, अशा मेधावी लोकांना, पुन्हा नाही जन्म आणि मरण ।। सिद्धस्वरूप अस्तित्वाला, कधीच धोका नाही संभवत, आजही अखंडपणे वाहत आहे, त्यांची ज्ञानधारा अविरत ।। असे द्रष्टा लोकच होतात, कामवासनेचे पारगामी, सूक्ष्म जाळे ओलांडून जाणाऱ्या वाऱ्यापेक्षा, कोणती बरे उपमा द्यावी ! अणाविल, छिन्नस्रोत दमनशील साधु, अन्नामध्ये गृद्ध नसतो, म्हणून तर तो मोक्षाशी, संधान जोडू शकतो ।। मन वचन कायेचा योग, ज्याला साधता येतो, तोच ज्ञानाराधनेमुळे सर्वांचा, चक्षुष्मान ठरतो ।। सन्मति-तीर्थ प्रतिपूर्ण धर्माची प्ररूपणा, व आचरणानेच होतात कर्मांचे अकर्ता, अशा वीतरागी महापुरुषांना, पुन्हा कसली हो जन्मकथा ।। पंडित वीर्याने युक्त असे पुरुष, 'महावीर'च असतात, पूर्वसंचित कर्मक्षयाने, शुद्ध आत्मस्वरूप प्राप्त करतात ।। एकाहून एक सुंदर, उपादेय, विचारांची आहे यात गुंफण, काव्यालंकाराने युक्त यमकबद्ध, असे हे आदानीय अध्ययन ।।

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48