Book Title: Sanmati Tirth Varshik Patrika
Author(s): Nalini Joshi
Publisher: Sanmati Tirth Prakashan Pune

View full book text
Previous | Next

Page 41
________________ सन्मति - तीर्थ पिछली सदी में जैनविद्या के अनुसंधान का स्वर कुछ इस प्रकार था - "जैन परंपरा हमेशा हिंदुओं से प्रभावित है । इस्लाम और ख्रिश्चनों से भी उसने तडजोड की है । हमेशा सिर झुकाया है ।" लेकिन मेरे प्यारे युवक-युवतियों, ईस्वी के इस तीसरे सहस्रक में जैनविद्या के अनुसंधान का रुख बदला हुआ है । अहिंसा, संयम, परिवर्तन, समन्वय, दान, शाकाहार, प्राणिरक्षा, शांततामय उल्लासपूर्ण सहजीवन, आदि अनेक मुद्दे सामने आ रहे हैं, जो जैन परंपरा का हृदय है, सारसर्वस्व है, जो हमें बरकरार रखकर अगली पीढीतक पहुँचाना है । क्षमापना - जय जिनेन्द्र ! जय हिन्द ! ... सन्मति-तीर्थ .५. श्रीकृष्ण : एक पराक्रमी, मुत्सद्दी तत्त्वज्ञ व्याख्यान : डॉ. सदानंद मोरे संकलन : डॉ. नलिनी जोशी पुणे विद्यापीठातील जैन अध्यासनातर्फे गेली ४ वर्षे विविध उपक्रम | राबवले जात आहेत. सन्मति- तीर्थच्या संपूर्ण सहयोगामुळे ते यशस्वी होत आहेत. अशा विविधांगी उपक्रमांपैकी एक म्हणजे - 'अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे आयोजन'. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वंकष अभ्यास असणारे डॉ. सदानंद मोरे यांचे उपरोक्त विषयावरील व्याख्यान, पूर्ण | कायापालट झालेल्या फिरोदिया होस्टेलवरील सुसज्ज ऑडिटोरियममध्ये | आयोजित करण्यात आले होते. अत्यंत जिज्ञासू असे सुमारे १२० श्रोते व्याख्यानास उपस्थित होते. आरंभी स्वागत-परिचयानंतर त्यांच्या हस्ते 'जैन तत्त्वज्ञान', 'जैनविद्येचे विविध आयाम' आणि 'अनोळखी गोष्टी (भाग ६) ' या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सर्व औपचारिक (बोअर ?) गोष्टींना रजा देऊन डॉ. मोरे यांचे दीड तासाचे प्रदीर्घ, अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. त्यातील काही महत्त्वपूर्ण मुद्यांचे शब्दांकन येथे देत आहोत. भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाचे स्थान काही आगळेवेगळे आहे. ते अत्यंत संमिश्र, संकीर्ण, जटिल आहे. 'कृष्णकारस्थान', 'कृष्णकृत्य' अशा आक्षेपार्ह पदावली त्याच्या संदर्भात वापरल्या जातात. ते काहीही असो, 'आकर्षण के केन्द्र कृष्ण है' हे निश्चित. चित्र, शिल्प, गायन, वादन या कलांमधून कृष्णाला ७४

Loading...

Page Navigation
1 ... 39 40 41 42 43 44 45 46 47 48