Book Title: Sanmati Tirth Varshik Patrika
Author(s): Nalini Joshi
Publisher: Sanmati Tirth Prakashan Pune

View full book text
Previous | Next

Page 11
________________ ਸਰੇ-ਨੀਪ शरीराबरोबर आत्म्याचे विघटन झाले, नित्य असे काहीच नाही उरले, शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहे, हे न समजल्यामुळे तज्जीवतच्छरीरवादी बनले. आत्म्याचे अस्तित्व स्वीकारले, पण आत्म्याचे कर्तृत्व- भोक्तृत्व नाकारले, अज्ञानाच्या वाटेने निघाले अन् असत्याच्या अंधारात फसले, काय करावे, काय करू नये, हे न सुचल्यामुळे सारे ईश्वरीसत्तेवर सोडले, कर्मबंधाच्या भयाने क्रियांचेच निषेध केले, ते अकारक-अक्रियावादी ठरले. रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्काराला क्षणमात्र स्थिर रहाणारे स्कंध मानले, पृथ्वी, पाणी, तेज, वायु आदि धातूंनी, शरीरात परिणत होणाऱ्याला जीव समजले, दुःखातून मुक्त करणाऱ्या यतिधर्माला कधी न जाणले, जन्म-मरणाच्या चक्रात फिरतच राहिले, आत्म्याची सत्ता नाहीच असे मानणारे, अफलवादी, धातुवादी, क्षणिकवादी ठरले. पाच महाभूतांबरोबर सहावा आत्मा आणि लोक मानले, ईश्वरी सत्ता नाही, सुख-दुःख न स्वयंकृत, न अन्यकृत, जे घडले ते सारे नियतीनेच घडले, जे असत् ते कधीच उत्पन्न न झाले, जे सत् आहे तेच नित्य राहिले, आत्मा सहेतुक - अहेतुक दोन्ही प्रकाराने नाश पावत नाही, असे सांगणारे नित्यवादी, नियतिवादी ठरले. सन्मति - तीर्थ कर्म परिणामाची चिकित्सा न करता कर्मकांड अनुष्ठानाला महत्त्व दिले, कर्म बंधनाची तीन कारणे, कृत-कारित अनुमोदन मानले, भावाच्या विशुद्धीने कर्म तुटले, कर्मबंध नसल्याने मोक्षगामी झाले, ज्ञानाचा निषेध करून क्रियेनेच स्वर्ग-मोक्ष मानणारे क्रियावादी बनले. समीक्षा साऱ्या वादींचे मत जाणून भगवंतांनी सूक्ष्म समीक्षा केली आणि सरळ, सोप्या भाषेत दृष्टांत देऊन गहन अर्थाची शिदोरी दिली. १) अंधाच्या हातात दिवा दिला तर तो अंधाराशिवाय काय पहाणार ? तसेच अज्ञानाच्या अंधाराने घेरलेल्याला ज्ञानाची वाट कशी दिसणार ? २) बंधन आणि मुक्तीचे ज्ञान नसलेला मूर्ख हरीण जेथे नको तेथे अडकतो आणि दुःखाला आमंत्रण देतो. तसेच दहा प्रकारच्या धर्माला न जाणणारा, क्रोध, मान, माया, लोभ आणि कषायाच्या फाफट पसाऱ्यात अडकून दुःखाला ओढून घेतो. आंधळ्याच्या मागे आंधळा चालत राहिला तर इच्छित स्थानावर कधी पोहोचणार तसेच अधर्माच्या रस्त्याने जाणारा मोक्षाला कधी गाठणार ? ४) पिंजऱ्यातला पक्षी पिंजराच सोडत नाही तसे अज्ञानी आपल्या मिथ्यामान्यतेची कासच सोडत नाही आणि संसारातून मुक्त होण्याचा मार्गही पहात नाही. ५) जन्मांध मनुष्य छिद्र पडलेल्या नौकेत बसून नदी पर करण्याची इच्छा करतो परंतु मध्येच नौकेत पाणी भरल्याने डुबतो तसेच मिथ्यादृष्टी ३)

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48