Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 4
________________ प्रस्तावना पुणे विद्यापीठातील सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्राध्यापिका डॉ. श्रीमती नलिनी जोशी यांचा ‘जैनविद्येचे विविध आयाम' हा प्रस्तुत लेखसंग्रह (खंड - १) मला अनेक कारणांसाठी महत्वाचा वाटतो. मुळात जैन धर्म आणि तत्त्वज्ञान अत्यंत प्राचीन काळापासून किमान वेदकाळापासून कदाचित् वेदपूर्व काळापासून सुद्धा अस्तित्वा आहे. त्याने मानवी जीवनाच्या व संस्कृतीच्या अनेक अंगोपांगांना नुसता स्पर्श केला असे नसून त्यात प्रविष्ट हेऊन आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यामुळे अभ्यासकांना 'जैनविद्या' नावाची स्वतंत्र विद्याशाखाच निर्माण करावी लागली. डॉ. जोशी यांनी शोधबुद्धीने व चौकसपणाने जैनविद्येच्या या बहुविध आयामांचा धांडोळा घेत जैन धर्म, तत्त्वज्ञान आणि आचार यांचे विविध पैलूंचे दर्शन या लेखांमधून घेतलेले आहे. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वालाही, त्यांची मदत घेत पुरेसा वाव दिला आहे. डॉ. के.वा. आपटे यांच्या जैनांच्या बहात्तर कला (किंवा अधिक) कलांवर प्रकाश टाकणाऱ्या दीर्घ लेखाचा समावेश करून जैनविद्येला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, हे औचित्यपूर्णच म्हणावे लागेल. दुसरे असे की या लेखांमधील विवेचनामुळे जैन धर्माचे पालन करणाऱ्यांना मार्गदर्शन होऊ शकते तसेच जैनेतर बांधवांच्या जैनधर्मासंबंधीच्या जिज्ञासेचे समाधानही होऊ शकते. अर्थात् याचा अर्थ हे केवळ माहिती देणारे, प्राथमिक व बोळबोध लेखन आहे असा मात्र नाही. डॉ. जोशी યાંના સન્મતિ-તીર્થ વ માંડારા પ્રાવિદ્યા સંસ્થા યેથીહ શોધાર્યાના પ્રદ્દીર્ધ અનુમવ આહે. ત્યામુઝે ત્યાંવ્યા लेखांतून संशोधनाचे नवेनवे मुद्दे ठायीठायी डोकावताना दिसतात. त्यांनी फक्त त्याचे अवडंबर माजवण्याचे व संशोधकीय शिस्तीच्या नावाखाली क्लिष्टता आणण्याचे कटाक्षाने टाळले आहे. मध्यपूर्वेतील यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तीन धर्म एकाच सेमिटिक परंपरेत वाढले. त्याचप्रमाणे भारतात वैदिक (हिंदू), जैन आणि बौद्ध धर्म हे एकाच सांस्कृतिक पार्श्वभूमीवर विकसित झाले. किंबहुना आजची भारत संस्कृती या तीन धर्मांच्या परस्पर प्रभावातून निर्माण झाली आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे या धर्मात आपणास साम्यभेदांची व संघर्षसमन्वयाची अनेक स्थळे आढळून येतात. व्यापक आणि तटस्थ दृष्टिकोन असल्याशिवाय ती लक्षात येणार नाही. डॉ. जोशी यांच्या लेखामधून हा दृष्टिकोन आढळतो. त्यामुळे प्रस्तुत लेखसंग्रह वाचल्यानंतर जैनजिज्ञासेचे समाधान तर होतेच परंतु एकूणच भारतीय संस्कृतीविषयीची आपली जाणीव समृद्ध होते. जैनविद्या या विषयाचा आवाकाच व्यापक असल्यामुळे त्यात जैन तीर्थंकर, ग्रंथ, इतिहास, समाज इ. अनेक बाबींवरील लेखन समाविष्ट झालेले आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण ज्या काळात वावरत आहोत त्या काळाचे भान कोठेही सुटलेले दिसत नाही. किंबहुना जैनांची प्रत्येक गोष्ट डॉ. जोशी आधुनिक संदर्भात उजळून घेतात. साहजिकच पुस्तक वाचल्यानंतरची वाचकांची प्रतिक्रिया पुराणवस्तुसंग्रहालय पाहून होत असते, तशी न होता, ‘वर्तमान वास्तवाशी आपण जोडले गेलो आहोत', अशीच होते. विशेषतः सद्य:काळातील युवक-युवतींची भूमिका, अवस्था व अपेक्षा यांची दखल घेऊनच डॉ. जोशी मांडणी करताना दिसतात. विशेष म्हणजे या मांडणी पुरेशी स्पष्टता आहे. अनावश्यक गौरवाची व उदात्तीकरणाची त्यांना कोठेही आवश्यकता वाटलेली दिसत नाही. डॉ. जोशी यांचे हातून अशा प्रकारचे लेखनसंशोधन यापुढेही विपुल होत राहो, अशा शुभेच्छा देण्यात माझ्यासारख्या जिज्ञासू वाचकाचा फायदाच आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हांला विनासायास समजतील. सदानंद मोरे तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, ३ ऑगस्ट २०११

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28