Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 24
________________ संघातील सर्व व्यवहार या नियमानुसार चाललेले दिसतात. गेल्या काही वर्षात मात्र या दुय्यम स्थानाविषयी साध्वीसा जागृतीची चिह्ने दिसू लागली आहेत. ११) २४ तीर्थंकरांपैकी ‘मल्ली' ही श्वेतांबर परंपरेनुसार एकमेव स्त्री- तीर्थंकर होऊन गेली. दिगंबर मान्यतेप्रमाणे मल्लीनाथ हे पुरुष-तीर्थंकर आहेत. याबाबत श्वेतांबरीयांचा स्त्रीविषयक उदार दृष्टिकोण दिसतो. १२) मल्लीसकट सर्व तीर्थंकरांचे 'गणधर' मात्र पुरुषव्यक्ती आहेत... १३) स्त्रियांना स्त्रीजन्मातून मोक्षप्राप्ती होते अगर नाही याबाबत जैन परंपरेत दोन भिन्न विचारधारा दिसतात. स्त्रियांच्या मोक्षाच्या अधिकाराबाबत श्वेतांबरीय विचारधारा अधिक उदार आहे. त्यांच्या मते स्त्रीवेद (स्त्रीलिंग) मोक्षाच्या आड येणारी गोष्ट नाही. प्रथम तीर्थंकरांची माता मरुदेवी, मल्ली, कृष्णाच्या पत्नी इ. स्त्रियांच्या तपश्र्चा आणि मोक्षगमनाचा स्पष्ट उल्लेख आहे. (अंतगडसूत्र, चउप्पन्नमहापुरिसचरिय) उत्तराध्ययनसूत्रात पुरुष अथवा स्त्रियांनाच नव्हे तर नपुंसक व्यक्तींना सुद्धा मोक्षाचा अधिकार सांगितला आहे. यावरून स्पष्ट दिसते की श्वेतांबर विचारधोनुसार कोणतेही लिंग हा मोक्षाचा अडथळा असू शकत नाही. માવાન મહાવીરાનંતર સુમારે રૂ00 વર્ષોંની શ્વેતાંવ-વિયંવર મેત અધિષ્ઠાધિજ સ્પષ્ટ હોત ોછે. શ્વેતાંવર-ાિંવર मतभेदाचे अनेक मुद्दे आहेत. (Outlines of Jainism, S. Gopalan. Pg. No. 21-27) परंतु त्यातील प्रमुख मुद्दे दोन आहेत. त्यापैकी पहिला आहे - नग्नत्व आणि संपूर्ण अपरिग्रह आणि दुसरा - स्त्रियांना स्त्रीजन्मातून मुक्ती. दिमीयांच्या मते, मोक्षप्राप्तीसाठी संपूर्ण अपरिग्रह अत्यावश्यक आहे. वस्त्र हा एक प्रकारचा परिग्रहच आहे. वस्त्राचा संपूर्ण त्या करून नग्नत्व स्वीकारल्याखेरीज मोक्ष संभवत नाही. स्त्रियांना स्वाभाविक लज्जा आणि सामाजिक मर्यादा यामुळे संपूर्ण वस्त्रत्याग करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मोक्षगती संभवत नाही. दिगंबरीयांच्या दृष्टीने स्त्रीच संहनन उत्कृष्ट ध्यानास असमर्थ आहे. (सूत्रपाहुड, कुंदकुंद गाथा क्र. २२ ते २७) श्वेतांबरीयांनी ‘संपूर्ण अपरिग्रह' या शब्दाचा संबंध नग्नत्वाशी जोडला नसून 'संपूर्ण अनासक्ती'शी जोडला आहे. ‘संपूर्णपणे अनासक्त अशी स्त्री मोक्षास पात्र ठरते' असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु श्वेतांबर ग्रंथात स्त्रीप्राप्त होण्याची जी कारणे दिली आहेत त्यात, 'पूर्वजन्मी कपटव्यवहार करणे', असे कारण नोंदविलेले दिसते. (ज्ञातीकथा) स्त्रियांविषयीच्या पूर्वग्रहापासून श्वेतांबरीय सुद्धा संपूर्णत: मुक्त नाहीत असे दिसते.

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28