Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 22
________________ २. जैन परंपरेतील स्त्रीविचार ('समाज-विज्ञान-कोशा'साठी लिहिलेली विशेष नोंद, पुणे, एप्रिल २००९) हिंदू, बौद्ध व जैन हे तीनही धर्म भारतात उद्भवलेले, रुजलेले व परिवर्धित झालेले आहेत. या तीन परंपरांनी भारतीय संस्कृतीचे सलग वस्त्र विणलेले आहे. जैन परंपरेतील स्त्रीविचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानात से की जैन स्त्री ही समकालीन हिंद किंवा बौद्ध स्त्रीपेक्षा फारशी वेगळी नाही. सामान्यतः जैन स्त्रीचे कौटंबिक. आकि आणि सामाजिक वातावरण तिच्या समकालीन इतर स्त्रियांसारखेच आहे. पुरुषप्रधान संस्कृती, विवाहाचे वय व प्रकार, बहुपत्नीत्वाची पद्धती इ. बाबत भारतात प्राचीन आणि मध्ययुगीन कालात जी स्थित्यंतरे झाली त्यानुसारच जैन स्त्रीमध्येही स्थित्यंतरे दिसून येतात. प्राचीन काळापासून आजपर्यंत हिंदू कायदेपद्धतीच जैन समाजालाही लागू होत आली आहे. जैन स्त्रीचे वेगळेपण दिसून येण्याचे विशेष क्षेत्र म्हणजे धार्मिक क्षेत्र होय. समकालीन हिंदू अगर बौद्ध स्त्रीपेक्षा तिला धार्मिक अधिकार व स्वातंत्र्य निश्चितच अधिक आहे. म्हणून येथे जैन स्त्रीच्या धार्मिक स्थानावर आधारित अशी निरीक्षणे नोंदविली आहेत. १) स्त्रियांची कर्तव्ये, अधिकार इ. चे विवेचन करणारा म्हणजेच स्त्रीधर्मावर आधारित असा स्वतंत्र ग्रंथ जैन साहित्यात आढळत नाही. आचारधर्म सांगणाऱ्या ग्रंथाचा एक भाग म्हणूनही पतिव्रता, गृहिणी यांची कर्तव्येही सीतली नाहीत. परंतु साध्वी आणि श्राविका यांची आचारसंहिता सांगणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातही साधू आणि श्रावक असे पुरुषवाचक उल्लेखच येतात. ते साध्वी आणि श्राविकेसाठी आहेत असे दुय्यमतेनेच जाणावे लागते. या आचाहतेतून केवळ धार्मिक मार्गदर्शन मिळते. धार्मिक आचाराबाबत प्राचीन काळापासून आजपर्यंत जैन स्त्रियांचा पुढाकार विशेष दिसून येतो. परंतु स्त्रियांनी लिहिलेला ग्रंथ मात्र आढळून येत नाही. जैन इतिहासात अनेक धर्मपरायण दानी स्त्रियांचे उल्लेख मात्र दिसतात. २) जैन स्त्रियांना धार्मिक संघात नव्याने प्रवेश देण्याचा प्रश्न जैन परंपरेत उद्भवला नाही. कारण आरंभीपासूनच हा धर्म चतुर्विध संघावर प्रतिष्ठित आहे. त्यामध्ये साधंबरोबर साध्वींना आणि श्रावकांबरोबर श्राविकांना स्थानदसते. प्रत्येक तीर्थंकरांच्या संघात किती साध्वी आणि किती श्राविका होत्या याची संख्या नोंदविलेली दिसते. (समवाया, त्रिलोकप्रज्ञप्ति) ३) तीर्थंकरांचे समवशरण, आचार्य-गुरुंचे प्रवचन इ. प्रसंगी स्त्रियांचा बरोबरीने सहभाग असलेला दिसतो. महावीरांच्या धर्मसभेत महावीरांबरोबर प्रश्नोत्तरे करण्याइतकी बुद्धीची प्रगल्भता आणि सामाजिक मोकळे वातावरण जैन परंपरेत दिसते. (भगवतीसूत्र, उपासकदशा) जैन धर्मोपदेशकांनी उपदेशासाठी प्राकृत बोलीभाषांचा वापर केल्यामुळे स्त्रिया धर्मचर्चेत सहजपणे सामील होऊ शकत. ४) प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांनी स्त्रियांसाठी ६४ आणि पुरुषशंसाठी ७२ कलांचे प्रणयन केले असे उल्लेख येतात. (आदिपुराण) त्यांच्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांनी लिपिविज्ञान आणि गणित यात प्राविण्य मिळविले होते. भारतातील मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासात स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था नसावी. त्यामुळेच या युगातील जैन स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाचे उल्लेख आढळत नाहीत. विवाहाचे घटते वय हेही याचे कारण असावे. दोन दशकांपूर्वी सामान्यत: जैन समाजातील स्त्रियांना उच्च शिक्षणाची संधी सहजपणे मिळत नसे. परंतु आधुनिक काळात त्या उच्च शिक्षणाकडे वळताना दिसतात. एक गोष्ट विशेष नोंदविण्यासारखी आहे की, स्त्रीसाक्षरतेचे प्रमाण मात्र जैन समाजात अन्य समाजापेक्षा कितीतरी अधिक आहे असे सामाजिक सर्वेक्षणावरून दिसते. ऋषभदेवांनी

Loading...

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25 26 27 28