________________
(१२)
काहींच्या मते पालि?, पैशाची व चूलिका पैशाची, जैनांच्या आगमग्रंथांची अर्धमागधी, जैनांच्या आगमेतर ग्रंथांची जैन२ माहाराष्ट्री, अशोक इत्यादींच्या शिलालेखांतील प्राकृत, अश्वघोषाच्या नाटकातील प्राकृत, भास-कालिदास इत्यादींच्या नाटकांतील शौरसेनी, मागधी व माहाराष्ट्री, दिगंबर जैनांच्या ग्रंथातील जैन शौरसेनी आणि अपभ्रंश या
भाषा प्राकृतने सूचित होतात. (३) इतरांच्या मते, माहाराष्ट्री, जैन माहाराष्ट्री, अर्धमागधी, मागधी, शौरसेनी,
जैन शौरसेनी, पैशाची (उपभाषा-चूलिका पैशाची) व अपभ्रंश (उपभाषा
उपनागर इ.) यांना प्राकृत हे नाव दिले जाते. (४) प्राकृत शब्दाने कोणत्या भाषा संगृहीत होतात याबाबत भारतीय प्राकृत
वैयाकरण (आणि आलंकारिक) यांचेही मतभेद आहेत :(अ) माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या चार प्राकृतांचे विवेचन वररुचि
करतो.
(आ) माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, आवन्तिका व प्राच्या या पाच प्राकृतांचा
निर्देश मृच्छकटिकाचा टीकाकार करतो. (इ) माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची व अपभ्रंश या सहा
प्राकृत लक्ष्मीधर४ सांगतो. प्राकृतचंद्रिकाही याच सहा प्राकृत देते.
‘पालि' ही हीनयान बौद्धांच्या धर्मग्रंथांची भाषा आहे. जैन माहाराष्ट्री हे नाव भारतीय प्राकृत वैयाकरण उल्लेखित नाहीत. हे नाव पाश्चात्य पंडित वापरतात. काव्य, नाटक, व्याकरण इत्यादींतील माहाराष्ट्रीच्या स्वरूपापेक्षा श्वेतांबर जैनांच्या आगमेतर ग्रंथांतील प्राकृतचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन, उत्तरोक्त भाषेला जैन माहाराष्ट्री हे नाव दिले गेले. या जैन माहाराष्ट्रीत माहाराष्ट्री व अर्धमागधी या दोन्ही भाषांची वैशिष्ट्ये आढळतात. सुपासनाहचरिअ, महावीरचरिय, निशीथचूर्णी इत्यादी ग्रंथांची भाषा जैन माहाराष्ट्री आहे. जैन शौरसेनी हाही शब्द भारतीय प्राकृत व्याकरणकार वापरीत नाहीत; हा शब्द आधुनिक पंडित वापरतात. दिगंबर जैनांच्या द्रव्यसंग्रह, प्रवचनसार इत्यादी ग्रंथांत वापरलेल्या प्राकृतमध्ये श्वेतांबर जैनांची अर्धमागधी व प्राकृत वैयाकरणांनी वर्णिलेली शौरसेनी या दोहोंचे मिश्रण आढळते. म्हणून तिला जैन शौरसेनी असे नाव देण्यात आले आहे. षड्विधा सा प्राकृती च शौरसेनी च मागधी। पैशाची चूलिका पैशाच्यपभ्रंश इति क्रमात्॥ लक्ष्मीधर
४