________________
१
२
३
(१०)
(३) प्राकृतच्या या अर्थाला अनुकूल पण थोडेसे वेगळे स्पष्टीकरण असे
:
(अ) संस्कृत नाटकांत अनेक भाषा वापरल्या जातात. नाटकांत देव, राजे, ब्राह्मण इत्यादी पात्रे संस्कृत भाषा बोलत, तर इतर पात्रे प्राकृत भाषा बोलत. नाटकांत जे लोक प्राकृत बोलत, ते सर्व लोक दर्शविण्यास संस्कृतमध्ये 'प्रकृति' हा शब्द आहे. 'प्रकृति' म्हणजे राजाचे प्रजाजन, नागरिक, स्त्रिया इत्यादी ; प्रकृती (प्रजे) मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय येत नाहीत. तेव्हा प्रकृतीची - स्त्रिया इत्यादी प्रजाजनांची भाषा म्हणजे प्राकृत होय.
(आ) नमिसाधु प्राकृत शब्दाची आणि एक व्युत्पत्ती अशी देतो :- प्राकृत म्हणजे प्राकृत. म्हणजे पूर्वी केलेले व बाल, स्त्रिया इत्यादींना कळण्यास सुलभ असणारे ते प्राकृत होय.
(इ) प्राकृत शब्दाचे आणि एक स्पष्टीकरण असे :- संस्कृत भाषा असा शब्द प्रचारात आल्यावर प्राकृत हा भाषाबोधक शब्द प्रचारात आला असे दिसते. म्हणजे संस्कृतपासूनचे वेगळेपण दाखविण्यास प्राकृत शब्द वापरला जाऊ लागला. आता संस्कृत हा शब्द सम्+कृ या धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असून, संस्कारित केलेले वचन (वा भाषा) असा त्याचा अर्थ होतो. प्राकृत हा शब्दही प्र+आ+कृ या धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असून, बरेच (प्र) विरुद्ध किंवा भिन्न (आ) केलेले (वा झालेले) वचन (अथवा भाषा) असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे संस्कृतपेक्षा भिन्न स्वरूप असणाऱ्या भाषांचे वेगळेपण दाखविण्यास प्राकृत शब्द प्रचारात आला. संक्षेपाने, प्राकृत म्हणजे संस्कृतभिन्न भाषा.
राजा प्रकृतिरञ्जनात्।
आरिसवयणे सिद्धं देवाणं अद्धमागहा वाणी इत्यादिवचनाद् वा प्राक् = पूर्वं कृतं प्राक्कृतं बाल-महिलादिसुबोधं सकलभाषानिबन्धनभूतं वचनमुच्यते। नमिसाधु. संस्कृतस्य विपर्यस्तं संस्कारगुणवर्जितम् । विज्ञेयं प्राकृतं तत्तु (यद्) नानावस्थान्तरम्॥ अज्ञानकर्तृक प्राकृतपद्यव्याकरण.