________________
ती प्राकृत. प्राकृतचे मूळ' (योनि) संस्कृत आहे; संस्कृतरूप प्रकृतीची विकृति किंवा विकार प्राकृत आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, संस्कृत भाषेतून प्राकृत भाषा निघाल्या; संस्कृत ही प्राकृतांची माता
आहे.
(आ) वर दिलेला अर्थ काहींच्या मते अनैतिहासिक असून, तो अप्रामाणिक,
अव्यापक आणि भाषातत्त्वाशी असंगत आहे. या लोकांच्या मते प्राकृत हा शब्द प्रकृति शब्दापासून साधला आहे हे खरे; पण प्रकृति या शब्दाने संस्कृत भाषा मात्र अभिप्रेत नाही. (१) प्रकृति म्हणजे अविकृत असा मूळ स्वभाव आणि प्राकृत म्हणजे
मूलतः अथवा स्वभावतः सिद्ध असणारी भाषा होय. (२) प्रकृति म्हणजे जनसाधारण किंवा सामान्य लोक; त्यांची जी भाषा
ती प्राकृत होय. म्हणजे असे :- साधारण अथवा सामान्य जनांच्या ज्या भाषेवर व्याकरण इत्यादींचे संस्कार घडलेले नाहीत अशी सहज असणारी जी भाषा ती प्रकृति होय; तीच प्राकृत होय; किंवा त्या प्रकृतीपासून सिद्ध झालेली ती प्राकृत५ होय. सर्वसाधारण लोकांची संस्काररहित आणि अकृत्रिम भाषा म्हणजे प्राकृत आहे आणि सामान्य लोकांच्या मूळ प्राकृत भाषेवरच व्याकरण इत्यादींचे संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली. कारण संस्कृत हा शब्दच संस्कार अथवा सुधारणा सुचवितो. याउलट प्राकृत शब्द सामान्य जनांची मूळची सहज भाषा दाखवितो.
or
१ प्राकृतस्य तु सर्वम् एव संस्कृतं योनिः। प्राकृतसंजीवनी.
प्रकृतेः संस्कृतायास्तु विकृतिः प्राकृती मता। षड्भाषाचंद्रिका. ३ प्रकृत्या स्वभावेन सिद्धं प्राकृतम्। ४ प्रकृतीनां साधारणजनानाम् इदं प्राकृतम्।
सकलजगज्जन्तूनां व्याकरणादिभिः अनाहितसंस्कार: सहजो वचनव्यापारः प्रकृति:,
तत्र भवम्, सा एव वा प्राकृतम्। नमिसाधु. ६ पाणिन्यादि-व्याकरणोदित-शब्दलक्षणेन संस्करणात् संस्कृतम् उच्यते। नमिसाधु.
5