Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 4
________________ ३२६ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ कवि पोन महाकवि पंपानंतर पोन्न नावाचा कवी झाला. इतिहासज्ञ विद्वानांच्या मते याचा काळ इ. स. ९५० मानला जातो. यानही पंपाप्रमाणे दोन धार्मिक आणि एक लौकिक अशा ग्रंथांची रचना केली आहे. या कवीच्या रचनेमध्ये मुख्यतः शांतिनाथ पुराणाचा उल्लेख करता येईल. यात पंचमचक्रवर्ती भगवान् शांतिनाथ तीर्थंकराचे चरित्र अत्यंत सरस शैलीने वर्णित आहे. या कवीचा दुसरा लौकिक ग्रंथ भुवनैक रामाभ्युदय आहे. तो उपलब्ध नाही. याशिवाय जिनाक्षरमाला नामक स्तोत्रग्रंथाचीही या कवीने रचना केली आहे. याचेही कर्नाटक साहित्यक्षेत्रात उच्चतर स्थान आहे. यास कवि-चक्रवर्ती, उभयभाषा--कवि-चक्रवर्ती, आदि पदव्या होत्या. नंतरच्या कवींनी याचे समादरपूर्वक स्मरण केले आहे. कवि रन पोन्नानंतर महाकवि रन्नाचा नामोल्लेख करणे उचित आहे. तो इ. स. ९९३ मध्ये झाला. हा जैन वैश्य होता. मुधोळ येथे सामान्य कासार कुलात उत्पन्न होऊनही संस्कृत आणि कन्नड भाषेमध्ये गंभीर पांडित्य मिळविले होते. या कवीने अनेक सुंदर ग्रंथांची रचना करून कर्नाटक साहित्याची कीर्ती जगभर पसरविली होती. साहित्यजगावर महान् उपकार केले होते. याच्या काही रचना उपलब्ध आहेत. अजितपुराण हे याचे सुंदर कलापूर्ण साहित्य आहे. या ग्रंथाची महत्ता जाणून त्या वेळच्या राणी अत्तिमव्वे यांनी या ग्रंथाच्या एक हजार प्रती ताडपत्रावर लिहून घेऊन वितरण केल्या आहेत. यावरून तिचे साहित्यप्रेम आणि रन-साहित्याची उच्चता सहज कळून येईल. याचे परशुरामचरित, चक्रेश्वर पुराण आदि ग्रंथ उपलब्ध नाहीत. हाही कवी कर्नाटक साहित्यातील कविशिरोमणी आहे. पंप, रन्न आणि पोन्न हे कविरत्नत्रय म्हणून कर्नाटक साहित्यक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. यावरूनही यांची महत्ता कळून येईल. कवि चामुंडराय याच वेळचा एक कवि चामुंडराय हा इ. स. ९६१ ते ९९४ पर्यंत गंगवाडीचे राजा मारसिंह राचमल्लचा सेनापति होता. याने चामुंडराय पुराणाची रचना केली आहे. हा चतुर्विंशती तीर्थंकरांचे वर्णन करणारा गद्य ग्रंथ आहे. कदाचित् शुद्ध गद्य ग्रंथाची निर्मिती करण्याची प्रथा या कवीनेच पाडली असावी. याप्रमाणे शिवकोटीनेही वड्डाराधने नावाच्या गद्य ग्रंथाची रचना केली आहे. काही अन्य कविगण यानंतर जवळ जवळ अकराव्या शतकात धर्मामृताचा कर्ता कवि नयसेन, लीलावती प्रबंधाचा कर्ता नेमिचंद्र, कब्विगर काव्य निर्माता अंडय्या यांचा उल्लेख करता येईल. या कवींनी धर्मोपदेश देण्याच्या निमित्ताने विविध प्रमेये निवडून ग्रंथ निर्माण केला आहे. कथासाहित्याच्या रूपाने अहिंसादि धर्मांचे पोषण या ग्रंथामुळे होते. याच काळात इतर अनेक कवि होवून गेले. त्यांनी आपल्या जीवनातील पुण्यमय काळाला चतुर्विंशती तीर्थंकरांचे चरित्रनिर्मितीमध्ये घालविला. त्यांपैकी काही कवींचा नामोल्लेख मात्र येथे आम्ही Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7