Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 1
________________ कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा श्री विद्यावाचस्पति पं. वर्धमान पा. शास्त्री विद्यालंकार कर्नाटक प्रांतातील प्राचीन विद्वानांनी जैन संस्कृती व साहित्य यांच्या रक्षणार्थ सतत योगदान व प्रयत्न केले आहेत. आजही पुरातत्त्व, साहित्य, स्थापत्य आदि प्रांतांमध्ये जैन लोक विपुल प्रमाणामध्ये आहेत. त्यांच्या दर्शनाने समस्त जग आश्चर्यकित होते. भगवान् बाहुबलीची विशालकाय मूर्ती, बेलूर येथील कलामय सोमनाथ मंदिर, हळेबीड येथील दर्शनीय शांतिनाथ देवालय, मूडबिद्री येथील नवरत्न निर्मित प्रतिमा आणि त्रिभुवनतिलक चूडामणी बसदि आदि आजही या प्रांताची प्रेक्षणीय स्थळेच नव्हे तर या प्रांताचे वैशिष्ट्य व्यक्त करतात. जैन साहित्याचा प्रसार आणि संरक्षण करण्याचे श्रेय बह्वशाने या प्रांताला दिले पाहिजे. कारण, षट्खंडागम सदृश सिद्धांत ग्रंथाची सुरक्षा, केवळ या प्रांतातील श्रद्धावान् बांधवांच्या कृपेने होऊ शकली. हा एक स्वतंत्र विषय आहे. या लेखाचा विषय फक्त कर्नाटक जैन साहित्याच्या परंपरेचा परामर्श घेणे हा आहे. कर्नाटक जैन साहित्याची परंपरा __कर्नाटक साहित्य परंपरेचा संबंध फार प्राचीन कालाशी जोडता येईल. भगवान् आदिप्रभूची कन्या ब्राह्मीने कन्नड लिपीची निर्मिती केली, हे कथन प्राचीन परंपरेपासून येत आहे. परंतु आज ऐतिहासिक दृष्टीने या साहित्याची परंपरा किती प्राचीन आहे याचा विचार करावयाचा आहे. अनेक ग्रंथांच्या अवलोकनाने हे ज्ञात झाले आहे की प्राचीन आचार्ययुगात कर्नाटक ग्रंथकर्त्यांचे अस्तित्व होते आणि कर्नाटक साहित्यनिर्मितीचे सर्वप्रथम श्रेय जैन ग्रंथकर्त्यांनाच मिळालेले आहे. या विषयात आजच्या साहित्य जगामध्ये कोणताही मतभेद नाही. केवळ प्राचीनतेबद्दलच नव्हे, तर विषयप्रतिपादन, सरस शैली आदि विषयीही आज कर्नाटक जैन साहित्यालाच प्रथम स्थान द्यावे लागेल, म्हणून आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात जैन साहित्यग्रंथच नियुक्त आहेत आणि जैनेतर विद्वानांनी या जैन साहित्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या दृष्टीने कर्नाटक जैन साहित्यपरंपरा फार प्राचीन आणि महत्त्वाची आहे हे निर्विवाद सिद्ध होते. प्राचीन काळात या साहित्यसेवी कवींना राजाश्रय मिळाला होता. गंग, पल्लव, राष्ट्रकूट, होयसळ, आदि राजवंशांच्या कारकिर्दीत या कवींना विशेष प्रोत्साहन मिळाले. या कवींद्वारा या राजेलोकांना राज्यशकट निर्वेधपणे चालविण्यासाठी बळ मिळाले होते, हे विविध प्रसंगांतील घटनांनी सिद्ध झाले आहे. ३२३ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7