Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 6
________________ ३२८ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ श्लोक आहेत. कवीचे वर्णनचातुर्य, पदलालित्य, भोगयोगाचे प्रभावक वर्णन आदि उल्लेखनीय आहे. या ग्रंथाला कवीने भोगविजय, दिग्विजय, योगविजय, मोक्षविजय आणि अर्ककीर्तिविजयच्या नावाने विभक्त करून पंचकल्याणाचे रूप दिले आहे. याचा काळ इ. स. १५५७ चा आहे. या महाकाव्यात आदिप्रभूचा पुत्र भरतेश्वरास आपला कथानायक निवडून त्याच्या दिनचर्येचे वृत्त अत्यंत आकर्षक शैलीने वर्णिले आहे. हे महाकाव्य म्हणजे आध्यात्मिक सरस कथा आहे. या ग्रंथाचा समग्र हिंदी अनुवाद या लेखाच्या लेखकाने केला आहे आणि अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या सरस काव्याचा मराठी, गुजराती अनुवादही झाला आहे. इंग्रजी अनुवादही होत आहे. भारत सरकारने या ग्रंथास भारतीय गौरव ग्रंथाच्या रूपाने स्वीकृत केला आहे. यावरून या ग्रंथाची महत्ता सहज कळून येईल. या महाकवीने या बृहद्ग्रंथाशिवाय रत्नाकर शतक, अपराजित शतक आणि त्रिलोक शतक नामक शतकत्रय ग्रंथांची रचना करून आध्यात्मिक जगावर मोठा उपकार केला आहे. त्याचप्रमाणे सुमारे २००० चे ही वर आध्यात्मिक पदांची रचना या कवीने केली आहे. सांगत्य युगातील अन्य कवि यानंतर सांगत्य छंदामध्ये अनेक कवींनी ग्रंथरचना केली आहे. बाहुबली कवीने (१५६०) नागकुमार चरिते, पायण्ण व्रतीने (१६०६) सम्यक्त्व कौमुदी, पंचवात (१६१४) भुजबलि चरिते, चंद्रभ कवीने (१६४६) कारकल गोम्मटेश चरिते, धरणी पंडितने (१६५०) विजणराय चरिते, नेमि पंडिताने (१६५०) सुविचार चरित्र, चिदानंद कवीने (१६८०) मुनिवंशाभ्युदय काव्य, पद्मनाभ पंडिताने (१६८०) जिनदत्तराय चरिते, पायण कवीने (१७५०) रामचंद्र चरिते, अनंत कवीने (१७८०) श्रवण बेळगुळ गोम्मटेश चरिते, धरणी पंडिताने वरांगचरित्र, जिनभारत, चंद्रसागर वर्णीने (१८१०) रामायण या ग्रंथाची रचना केली आहे. याच सुमारास चारू पंडिताने भव्यजन चिंतामणि आणि देवचंद्र कवीने राजाबली कथाकोष नामक ऐतिहासिक ग्रंथांची रचना केली आहे. पंप महाकवीच्या युगाला चंपूयुग म्हणता येईल तर रत्नाकर वर्णीच्या युगाला सांगत्य युग म्हणता येईल. हे दोघेही महाकवी निस्संदेह युगपुरुष आहेत. विभिन्न विषयांतील कर्नाटक साहित्य नृपतुंगविरचित कविराजमार्ग हा लक्षण ग्रंथ आहे. यात कवींना राजमार्गच दाखविला आहे. त्याचप्रमाणे नागवर्माचे छंदोदधि नामक ग्रंथात छंदविषयक आणि दुसरे नागवर्माच्या भाषाभूषणामध्ये व्याकरणविषयक प्रतिपादन आहे. काव्यावलोकन (काव्यालंकार ), वस्तुकोष (कोष), भट्टाकलंकाचे शब्दानुशासन (व्याकरण), केशीराजचे शब्दमणिदर्पण, साळ्व विरचित रसरत्नाकर, देवोत्तम रचित नानार्थ रत्नाकर (कोष), शृंगार कवीचे कर्नाटक संजीवन, (कोष) आदि ग्रंथ आपआपल्या विषयाचे समीचीन ज्ञान देणारे आहेत. यावरून कर्नाटक साहित्यकारांच्या विविध विभागाच्या सेवा व्यक्त होतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 4 5 6 7