Book Title: Karnataka Jain Sahtiyachi Prachin Parampara
Author(s): Vardhaman Parshwanath Shastri
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 7
________________ कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा 329 ___ याचप्रमाणे वैद्यक, ज्योतिष आणि सामुद्रिकादि विषयांवरही कर्नाटकातील कवींनी ग्रंथरचना केली आहे. यांतील अनेक ग्रंथ उपलब्ध नाहीत. काही उपलब्ध आहेत. कल्याणकारक वैद्यक (सोमनाथ ), हस्त्यायुर्वेद (शिवमारदेव ), बालग्रहचिकित्सा ( देवेंद्रमुनि ), मदनतिलक (चंद्रराज ), स्मरतंत्र (जन्न ) आदि ग्रंथही उल्लेखनीय आहेत. याशिवाय ध्यानसारसमुच्चय आदि योगविषयक ग्रंथांची रचनाही झाली आहे. याचप्रमाणे ज्योतिषासंबंधी ग्रंथांमध्ये श्रीधराचार्य विरचित जातकतिलक (1049), चाउण्डरायाचे लोकोपकारक (सामुद्रिक), जगबंधुनंदनचे सूप शास्त्र, राजादित्याचे गणितशास्त्र, अर्हद्दास कवीचे शकुनशास्त्र आदि ग्रंथांचाही उल्लेख येथे नमूद करणे जरूर आहे. अनेक ग्रंथकारांची नावे येथे स्थलाभावी आम्ही व्यक्त करू शकलो नाही. एवढयावरूनच या भाषेतील ग्रंथसंपत्तीची कल्पना येईल. उपसंहार यावरून स्पष्ट होते की कर्नाटक प्रांतीय प्राचीन जैन कवींनी फार प्राचीन काळापासूनच साहित्यपरंपरेची जोपासना केली आहे आणि साहित्याच्या माध्यमाने जगाच्या विविध अंगांची सेवा केली आहे. पुष्कळसे साहित्य नष्टभ्रष्ट झाले, विकृत झाले. उरलेले साहित्यही अल्पप्रमाणात नाही. कोणत्याही समाजास अभिमान वाटावा, आणि साहित्यिक समाजाने आदराने स्मरण करावे या प्रमाणात आज कर्नाटक जैन साहित्य उपलब्ध आहे. ही परंपरा कर्नाटक जैन कवींनी निर्माण केली आहे. खरोखर जैन समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट मानली जाईल. परंतु या पावन परंपरेचे रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. ती पार पाडण्यास आपण समर्थ ठरलो तर भूषणावह आहे. नाही तर फक्त पूर्वजांचे नाव घेऊन जगणाऱ्या पुरुषार्थहीन संततीचेच स्थान आमचे आहे. आम्ही त्या परंपरेकरिता काय करीत आहोत ? प्रकाशनाची आवश्यकता या भाषेतील उत्तम साहित्याचा अनुवाद होऊन इतर भाषेमध्ये प्रकाशित होणे जरूर आहे. त्यामुळे वाचक वर्गास विशेष लाभ होईल, इकडे समाजामधील श्रीमंत वर्गाचे लक्ष्य जाणे जरूर आहे. इत्यलम् ! Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7